भाग 2- माझी नवी कंपनी

By shejwalabhay on from https://www.softwarefukat.in

 पण ते काही असो आज मी कंपनीत उभा होतो. आपल्या खेड्यातल्या भाषेत सागायचं म्हणजे एक-दीड एक्कर चा हा ऑफिस चा पूर्ण परिसर यात ७ ते ८ वेवेगळ्या इमारती आणि त्यात वेगवेगळे डिपार्टमेंट पूर्ण परिसर वेगवेगळ्या झाडांनी सजलेला . बऱ्या पैकी आंब्याची झाड आणि त्यांना लटकलेल्या कैऱ्या गावाकडची आठवण करून देत होत्या. गेट जवळून थोड पुढे आल कि संगमरवरी एक पहिली इमारत त्यात कंपनी बनवते ते सगळे प्रोडक्ट्स काचे मध्ये खूप छान सजवून ठेवलेले. सगळ्यात भारी तर प्रत्येक डिपार्टमेंट कडे जाणारी छोटीसी सिमेंट ची वाट आणि त्या वाटेच्या आजूबाजूला फुलांची ,फळांची झाड खूप निसर्गरम वातावरण आणि त्यात आणखी एक अच्छार्याची गोष्ट मेन बिल्डिंग कडून जेंव्हा वाट वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडे जाते ना वळणावर एक मोठी जाळी आहे आणि त्यात ससे खेळताना तर बदक छोट्याच्या बनवलेल्या तळ्यात सकाळची अघोळ करताना दिसतात . कंपनी कमी आणि सिद्धार्थ उद्यान ज्यास्त असी माझी नवी कंपनी. सगळ बघत बघत केंव्हा मी माझ्या डिपार्टमेंट मध्ये दाखल झालो काळच नाही , आणि अचानक डोक्यात चक्र चालू झाली ..अभय आज आधीच थोडा उशीर झालाय गीता कडून कंपनी च्या प्रोडूक्ट्स ची ३० दिवसाची ट्रेनिंग घ्याचीय . आणि हि बाई तुला काही भाव देत नाही ....उशीर झाला म्हणून ओरडायची परत म्हणून पटकन बॅग माझ्या टेबल वर ठेयून तिच्या कॅबीन च्या दिशेने निघालो .May I come in madam? गीता च्या कॅबीन च्या बाहेरून मी जरा दबक्या आवाजात म्हणालो. ती कॉम्पुटर वर काही काम करत असावी तिने हातानेच मला आत ययला सागितलं. तिच्या टेबलच्या समोर ठेवलेल्या दोन खुर्च्यांपैकी एका वर मी जायुन बसलो. ती आणखी हि तिच्या कॉम्पुटर मध्ये काम करत होती .. बघता बघता 5 मिनिट झाले ..१० मिनिट झाले ही बाई काही माझ्या कडे बघायला तय्यार नव्हती. पण मी तिच्याकडे बघत होतो आज ती जरा वेगळीच वाटत होती त्या दिवशी सारखा कंपनी चा ड्रेस ऐवजी आकाशी कलर असलेला आणि त्यावर मोरपंखी डिझाईन केलेला पंजाबी ड्रेस तिने घातलेला होता. पण काल सारखा गजरा मात्र तसाच केसात लोंबकळत होता. कपाळावर सफेद अडवा गंध आणि त्या खाली छोटीसी टिकली लाल रंगाचे छोटेस कानातले तिच्या कानांवर आलेल्या केसांमुळे नीट काही दिसत नव्हते.ती तिच्या कामात अताना मी हि या कामात होतो,असा गैसमज कुणाचा हि झाला असता पण गीता समोर बसून आता १५ मिनिटांच्या वर झाले होते आणि ती आणखी हि कॉम्पुटरवर मध्ये अडकलेली होती .कुणाला बोलवून कशी बैजत्ती करावी हे आता पर्यंत आम्हा औरंगाबादकरांच येत हा गैरसमज आता पूर्ण दूर होताना दिसत होता .मी खुर्चीवर जरा ज्यास्तच टेकून बसलो. म्हंटल आता हि काही बोलतच नाही तर थोडा पाठीला आराम द्यावा . पण खुर्चीत ज्यास्त मागे टेकताच ..जोरात कर्र..आवाज झाला आणि तिने चष्मा च्या कोपर्यातून माझ्यावर नजर टाकली.So Mr.Abhay do you know our company’s product ? माझ्या मते आता पर्यंत शांत असणाऱ्या वातावणात थोडा तणाव यायला तिच्या या बोलण्याने सुरवात झाली होती. मी आधी हो म्हणून मान हलवली पण लगेच माघार घेतली उगाच “ मारकी म्हैस अंगावर का घ्यायची “ कारण प्रोडूक्ट्स बद्दल विचारल तर मला काही ज्यास्त सागता आल नसत. Not much madam मी म्हणालो .तिने माझ्या गरीब केलेल्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली take this brochures and read it . अस म्हणत तिने तिच्या टेबल च्या खालच्या कप्प्यातून काही brochures काढली आणि एक प्लास्टिक ची बाटली हि काढली ...त्या बाटलीत खूप सारे चोकलेट भरलेले होते . त्यातील तिने दोन चोकलेट पण काढले पण माज्या हातवार फक्त प्रोडूक्ट्स brochures देयून तिने कॉम्पुटर कडे चेहरा वळवला. प्रोडूक्ट्स brochures घेयून मी तिच्या कॅबीनच्या बाहेर आलो. पण तिने चोकलेट ऑफर न केल्याच दुख मनात खूप ज्यास्त होत. सगळे brochures एक एक वाचायला सुरवात केली. माझ्या साठी नवीन असलेले हे प्रोडूक्ट्स मला काही नीट समजेना.परत तिच्या कॅबीन मध्ये जायुन तिला विचारव समजून घ्याव अस वाटल. पण धीर काही होईना...पुन्हा थोड्या वेळाने तिने जर विचारलच कि झाल का वाचून तेंव्हा काय सागाव, पुन्हा मी कॉलेजमध्ये तर नव्हतो आलो ना ... submission च्या वेळेच्या त्या कटू आठवणी आता पुन्हा आठवायला लागल्या होत्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!