भाग -८ गीता आणि चॉकलेट बरणी.. | Marathi story

By shejwalabhay on from https://www.softwarefukat.in

 आज सकाळी जरा बाहेरच्या आवाजाने जाग आली शेजारी ठेवलेला मोबाईल हातात घेऊन टाईम बघितला तर ७.४५ वाजले होते . आणि झोपित अर्धे बंद असलेले डोळे खडकन पूर्ण उघडले. आज उशीर होणार हे तर मला कळून चुकल होत. घाई घाईत अंघोळ करून मी गेस्ट रूम वरून कंपनी कडे निघालो. आणि सरळ रिक्षा करून कंपनीत गेलो जाता जाता ८.४५ झाले होते . कॅन्टीन ८.३० ला बंद होत हे मला आधीच माहिती असल्या मुळे सरळ माझ्या डिपार्टमंटमध्ये गेलो. आणि लॅपटॉप चालू करून कामाला सूर्वात केली . भूक तर खूप लागलेली होती पण पर्याय नव्हता उशिरा उठल्याचे दुष्परिणाम दुसरं काय !   लॅपटॉप मध्ये  डोकं खुपसून बसन मला आधी पासून जास्त आवडत नाही. नेहमी च्या सवयी प्रमाणे  मेल तपासायला सुरवात केली.पण नेहमीचेच मेल  होते काही विशेष नाही महणून मी मेल बॉक्स बंद करतच होतो की इतक्यात माझ्या इनबॉक्स मध्ये  congratulation gita नावाचा एक नवीन मेल दाखल झाला  आणि त्या वर  माझी नजर गेली. गीता डेप्युटी मॅनेजर वरून आता मॅनेजर झाली होती ,थोडक्यात तिला प्रमोशन भेटलं होत . ते बघतच माझ्या डोळ्या वरच्या भवाया उंचावल्या आणि लगेच त्या मेल ला .congratulations चे अनेकायचे रिप्लाय यायला सुरवात झाली.  खर तर मला तिच्या अकडू वागण्यामुळे मला तिचा राग होताच पण आज तिच्या प्रमोशन ची बातमी वाचून आनंद वाटला, मी ही "अभिनंदन गीता" असा रिप्लाय त्या मेलला करून. बाकी चे मेल तपासत बसलो. थोड्या वेळाने गीताने  ने सगळ्यांना धन्यवादचा रिप्लाय केला .    माझ्याकडे प्रेझेंटेशन बनवायचं काम असल्याने मी ते करायला सुरवात केली . आणि ते करत असताना मला माझ्या केबिन समोरून गीता जातांना दिसली. तिने जाताना माझ्या कडे बघितलं असाव किंव्हा असा भास झाला असावा पण लागलीच तिथे सगळेच तिला congratulations करायला आले . आता सगळे congratulation करत असताना. मी कॅबन मध्ये बसून राहणं चागल वाटलं नसत  म्हणून  मी पण बाहेर जाऊन त्या टोळीत शामिल झालो .   गीता चा चेहरा आज खूप फ्रेश आणि आनंदित दिसत होता आणि का होणार नाही मेहनतीचं फळ जेंव्हा मिळत तेंव्हा प्रत्येकजण खूप खुश असतो. आज उशीर झाला वाटत ? गीता ने मला विचारलं  हो .. उठायला जरा वेळ झाला आज .मी तिच्या कडे बघत उत्तर दिलं. ती हसली .. लवकर उठायची सवय नाही वाटत तुला.!  मी फक्त हसलो... नाष्टा भेटला नसेल मग आज उशीर केल्या मुळे? तिने विचारल. भूक लागलेली आठवणं आता कुठे मी विसरलो होतो आणि तिने पुन्हा त्याची आठवण करून दिली. नाष्ट्याच्या  आठवणीने पुन्हा माझा चेहरा जरा व्याकूळ झाल्या सारखा झाला. इथे महाराष्ट्रीयन जेवण भेटत नाही आणि साउथइंडिअन ज्यास्त खाऊ वाटत नाही |  म्हणून रात्री फक्त मसाला डोसा खालेला होता आणि आता खरच खूप भूक लागलेली होती. कॅन्टीन बंद झालं होत , मी पडलेल्या चेहऱ्याने गीताला म्हणालो.. चॉकलेट खायला आवडतात का ? आता तिच्या या प्रश्नाचं मागचा  उद्देस तिला मला फक्त विचारायचं होत की ती मला चॉकलेट ऑफर करणार होती, हे मला समजण्या पलीकडचं होत , कारण गीता नावाच्या वादळाची कल्पना मला आता पर्यंत बऱ्याचदा आली होती. मी ज्यास्त काही नाही मानेने हम्म केल . पण ती मला चॉकलेट देईल याची अपेक्षा ठेवली नाही . कारण पुन्हा मला  माझा भुकेने व्याकूळ झालेल्या मनाचा अपेक्षाचा भंग करून घ्यायचा नव्हता.  चल तिने मला तिच्या कॅबन कडे बघत खूनवल. आणि आम्ही दोघे तिच्या केबिन मध्ये गेलो . तिने मध्ये गेल्यावर ती चॉकलेट ने भरलेली बरणी उघडली आणि माझ्या हातावर किटकॅट नावच चॉकलेट ठेवलं. तिने जेंव्हा हे केलं ना त्या वेळेस मला वाटल पळत पळत बाहेर ग्राउंड वर जाव  आणि तपासाव  आज नक्की सूर्य पूर्वेलाच उगवला ना कि मी स्वप्नात वैगेरे आहे. खडूस गीताने आज मला चक्क  चॉकलेट ऑफर केल होत.   गीता चॉकलेट देऊन हसली.. तिच्या हसण्यात आज मला कमालीचं तेज जाणवत होत.गीता अशी पण आहे हे मनाला अजून पटायला खर तर अवघड जात होत पण जे घडलं त्या धक्क्यातून स्वतःला सावराव कि वाहत जाव ह्या भानगडीत पडण्या आधी.  मी चॉकलेट खात गीताला thank you केलं .  ती परत एक छान सी स्माईल  म्हणाली , कधी मी कुणाला चॉकलेट ऑफर करत नाही कारण ते माझ औषध आहे  . पण आज माझा मूड चागला आहे म्हणून तुला ऑफर केलं . गीता तिच्या तामिळ इंग्रजीत बोलली. तुला चॉकलेट खूपच आवडतात वाटत. पण इतके चॉकलेट एकट्याने खायची सवय चागली नसते.आणि हो बरणीच उचलून आणलीस वाटत दुकानातून ? दुकानदार मामा का तुझा ..हसत मी म्हणालो.  मामाबिमा काही नाही मजबुरी आहे  ? असी मजबुरी तुझीच नाही जगातल्या सगळ्याच मुलींची असते , म्हणून काय कुणी बरणी आणत नाही .. मी मस्करीच्या बोलण्यात बोलून गेलो. .मला डॉक्टरने सगितालय . चॉकलेट खायला .. . गीता म्हणाली मला वेड्यात काढताय का ? मी सरळ बोलून गेलो .  गीता ची ख़ुशी एकदम कमी झाली, डोळे पापण्यांनी हळुवार झाकले. हळूच जरा हुंदका असलेला मोठा श्वास घेत गीता म्हणाली.. मला लो  शुगर चा त्रास आहे...खर तर कंटाळे मी या चॉकलेटला आणि या गोष्टी मुळे खूप काही सहन केलाय मी जीवनात ..तिच्या शांत भावना मनाला भिडत होत्या. इतक्या कमी वयात शुगर ? मी न राहून एकदम शांत होत विचारल. पण तिने बळजबरीची स्माईल करत ..जावू दे ...मोठी ट्रॅजेडी केली या शुगर ने माझ्या लाइफची.  महाराष्ट्रात तीलगुळ एक सन असतो तेंव्हा सगळे तिळगुळ खा गोड गोड बोला अस म्हणतात .पण गीता गोड खायून.. गोड बोलू शकत नव्हती मजबुरी का नाम......असच काही माझ मनोमन  सुरु होत.  तिच्या जीवनात अस काय झाल जे  इतक्या आनंदाच्या वेळेस हि इतकी दुखी होयून बोलली, मी तर विचार करत होतो इतका मोट्टा पगार , चागला जॉब मस्त लाइफ एन्जोय करत असणार आणि त्या घमंड  मध्ये असा अकडू पणा तिच्या स्वभावात भिनला असणार , पण प्रत्येकची एक दुखेरी बाजू असते..ती नकळत ती आज बोलून गेली होती. ऐकून वाईट वाटलं , पण त्या बद्दल खूप काय विचारणार .आणि माझी एक चांगली म्हणा किंव्हा वाईट एक सवय आहे मी कधी कुणाच्या दुखणाऱ्या नसेवर हात ठेवत नाही. कारण बरेचं लोक त्यावर बोलायला जातात पण समोरचा त्या गोष्टी वर कधीही अधिक बोलू इचछीत असतो किंव्हा  नसतो,आपल्याला माहित नसत. आता पर्यंत मी छान हसत चॉकलेटचां आनंद घेत होतो ,पण तीच हे बोलण ऐकताच मला त्याचॉकलेट मधला गोडवा संपल्या सारखं वाटायला लागल. सगळेच आनंदाच्या वेळेस सगळेच गोड खायून सिलेब्रेट करतात. पण आज कुणी आनंदात हि गोड च्या नावाने दुखी होताना मी आज बघत होतो. शुगर मुळे लाइफ ची ट्रॅजेडी झाली का म्हणाली असेल ती ? ..हा विचार ऑफिस च्या छताला लटकलेल्या जोरात फिरणाऱ्या फॅन सारखा माझ्या मनात तेवढ्याच प्रचंड स्पीड ने फिरत होता...????????????  सगळे  भाग  वाचा ...????????कथा परिचय  - अभय शेजवळभाग १- बँगलोरचा पहिला भीतीदायक दिवस .....भाग २- माझी नवी कंपनीभाग ३- गीता आज वेगळीच वाटलीभाग ४ - गीतावर मनसोक्त रागवायची संधी भेटलीभाग ५ -  माझ्या  ट्रेनिंगची सुरवात  भाग - ६ इलेक्ट्रोप्लेटिंग लॅब आणि चंद्राप्पाभाग ७ - कॅन्टीन आणि  सेल्स ॲक्टिविटी  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!