भाग -१० गीताची शॉपिंग
By shejwalabhay on तंत्रज्ञान from https://www.softwarefukat.in
गाडी हळूवार पणे पुढे जात होती .. आकाशात पाऊसाचे ढग चागलेच गर्दी करून होते . हो ना हो आज पाऊस येणार याची मला खात्रीच झाली होती. गीता मात्र निर्धास्त मोबाइलमधे फेसबुक बघत होती आणि मी बाहेर कन्नड मध्ये लिहालेल्या पाट्या वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. फेसबुक वर आहेस का ? गीता ने कुहुतुल्या नजरेने बघत विचारलं. आता सांगू काय ? कारण आधीच मी बरच काही तिच्या बद्दल फेसबुक वर लिहून बसलोय . आणि त्यात तिने ते बघितलं तर रशिया आणि उक्रेनच तिसर महायुद्ध होओ ना होओ मात्र भारतात एका कार मध्ये तिसर महायुद्ध नक्कीच भडकल असत. याची मला पुरेपूर कल्पना होती. पण आता उत्तर काय द्यायचं . आहे ना ? पण ना पण ते काय आहे मी खुप दिवसांच लॉग इन नाही केलं. तर फेसबुक ने बंद केल वाटत मी अचानक सुचलेल्या मनाच्या भावना वेक्त केल्या सारखं दाखवलं. का? तिने विचारलं . पासवर्ड विसरलो होतो ना ..हा विसलो होतो बघा .. आणि मला सोशल मीडिया ज्यास्त आवडत नाही. ..मी उत्तरलो . का? तिचा पुढचा हा प्रश्न तय्यार होता . जेंव्हा तुम्ही सरळ खोटं बोलता तेंव्हा त्या गोष्टी खऱ्या आहेत हे पटवण्यासाठी तुम्हाला खोट बोलायची लिस्ट तय्यार करावी लागते आणि मी आता त्या कामाला नकळत लागलो होतो . कारण मी मोदीच्या विचार फॉलो करतो न मी .. तिच्या त्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर माझ्या लिस्ट मध्ये मला काही सापडलं नव्हत म्हणून काही तरी बोलायचं विषय बदलायचा म्हणून मी बोलून गेलो . ते कसं काय ? गीता चे प्रश्न काही संपत नव्हते. मोठ्या उद्धाच्या आधी छोटे मोठे अग्निबाण सोडतात तसे ती प्रश्नांचे अग्निबाण माझ्या दिशेने डागत होती. ते “make in india” नाही म्हणून . खर सांगायचं तर या सारखं फालतू उत्तर जगात दुसरं कुठलं नसेल.पण आता काही सुचतच नव्हत तर करणार तरी काय ..नाही का . गीता हसायला लागली ...काय तर म्हणे make in India नाही..तिच्या त्या हसुवार बोलण्या कडे मी फक्त बघत होतो .खूप निरागस एखाद्या लहान मुला सारखं ती हसत होती . तू फॉलो करतो त्यांना ? तिने हसत विचारलं एव्हाना त्या फालतू उत्तरा मुळे फेसुकवरुन मोदिसाहेबांन कडे विषय वळला होता ते तिच्या प्रश्नावरून समजलं होत ..नाही नाही खर तर मी विषय बदलण्यात यशस्वी झालो होतो. तिच्या या प्रश्नाचं उत्तर फक्त मी एक छोटी सी स्माईल करून दिलं . उगाच खोट्या उत्तरात मी कुठे पकडला गेलो तर स्वतःच च हसू व्हायचं. म्हणून मी फक्त तेवढ्यावर विषय संपवला होता . त्या नंतर गाडी मध्ये काही वेळ शांतता होती आणि थोड्या वेळातच आम्ही एका मोठ्या मार्केट मध्ये उभे होतो. गीता ची लंबी लिस्ट तर तय्यार होती ..एक एक करत समान आम्ही समान खरिदी चालू केली . सुरवातीला मला काही वाटलं नाही पण जस जस आम्ही समान खरीदी करत होतो ..माझे मात्र खूप वाईट अवस्था होत होती .कारण गीता ते सगळ समान ज्या पिशवीत ठेवत होती ती पिशवी माझ्या हातात होती ... आधून मधून ती वरचे वर विचारायची म्हणा “खूप जड तर नाहि ना पिशवी” पण मी आता कसं सांगू ..माझा तु हमाल केलंय म्हणून . त्यात आणखी एक २०-३० रुपयची वस्तू घेताना ही ती भाव करायची.. भाव ही असा की समोरचा ..ते ऐकून कधी कधी भडकायचाच आता तो काय रागात बोलायचा हे मात्र मला कळत नव्हत पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग माझ्या व्याकूळ नजरेतून मला स्पष्ट कळायचा. २० वस्तू घेण्यासाठी आम्ही कमीत कमी त्या रस्त्यावरचे ४०-४५ दुकानं फिरलो असणार . मी पिशवी कधी डाव्या तर कधी उजव्या हातात पकडत मनाच्या आकांताने मनातल्या मनात देवाला म्हणत होतो कि एक सदा सुदा मुलगा नोकरी करायला आला होता आणि तू आज त्याचा हमाल करून टाकला कुठल्या पापाचा बदला घेतोयस सोबतच माणसाला आणखी ३-४ चार हात का नाही याची चक्क मी देवाला तक्रार करून टाकली होती . लिस्ट मधली वस्तू घेतली की त्यावर टिक करायचं काम पण माझ्याकडेच होत. पूर्ण २ घंटे आम्ही फिरत होतो आणि आता शेवच्या वस्तू वर टिक करून मी खूप वेळाने मोकळा श्वास घेतला . आता शॉपिन संपली म्हणून .. . खुश होत डोक्यावर बऱ्याच वेळेचा आलेला घाम मी रुमालाने पुसला .तोच गीता ने २-३ गोष्टी लिहायच्या राहून गेल्या म्हणत माझ्या निवांत झालेल्या चेहऱ्यावरचा आनंद हिरायुन घेतला. त्या दोन तीन वस्तुत एक झाडाची कुंडी होती नशीब ते लिहायची ती सुरवातीला विसरली नाही तर आज माझ काही खर नव्हत. आता माझ्या एका हातात पिशवी आणि दुसर्या हातात कुंडी होती शेवटी तिच्या मनासारखं सगळ खरिदी करून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवसासाठी निघालो . एव्हाना ६ वाजून गेले होते आकाशात गर्दी करणारे ढग आता पाऊस बनून जमिनीवर पडायला लागले होते . गाडी मध्ये ड्रायव्हर ने एफएम चालू केला होता . आणि त्यावर बरेच से गाणे पावसावरती लागत होते. भाषा कळत नसली तरी भावना आणि संगीत सगळ सागून जात होत आणि त्यातच मध्ये मध्ये हिंदी गाणे लागत होते .काही तामिळ गाण्या सोबत गीता ही गुणगुणत होती .हळू हळू सुरू झालेला पाऊस खूप जोराचा होत गेला . बाहेर खूप जोराचा वादळ वारा चालू झाला होता पण गाडी मध्ये एक वेगळ प्रसन्न वातावरण बनत चालाल होत . तितक्यात अचानक टिप टिप बरसा पाणी .. हिंदी सोंग त्या एफएम वर लागलं . कुणाची तरी ते गाणं "फरमाईश" होत वाटत . तिकडच टीप टीप पाणी जरी पावसाच असल तरी माझ्या डोक्यातून कानाच्या मार्गाने येणार टीप टीप घामाच पाणी अजुन काही थांबल नव्हत... ते गान संपत न संपत अमिताब बच्चन च कुली चित्रपटातील गाण सुरु झाल ,” सारे दुनिया का भार मै उठता हुं...............???????????? सगळे भाग वाचा ...????????कथा परिचय - अभय शेजवळभाग १- बँगलोरचा पहिला भीतीदायक दिवस .....भाग २- माझी नवी कंपनीभाग ३- गीता आज वेगळीच वाटलीभाग ४ - गीतावर मनसोक्त रागवायची संधी भेटलीभाग ५ - माझ्या ट्रेनिंगची सुरवात भाग - ६ इलेक्ट्रोप्लेटिंग लॅब आणि चंद्राप्पाभाग ७ - कॅन्टीन आणि सेल्स ॲक्टिविटीभाग -८ गीता आणि चॉकलेट बरणी..भाग ९- मैत्रीची सुरवात