बिलोरी
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
क्षण एक असा येतो की सारे सरतेनिश्चेतन वस्त्रच केवळ मागे उरतेवाहून कुणी जाते भिजते वा कोणीनात्यांचे गलबत लाटांवर गलबलतेएकेक प्रयत्नाची जखमांना ओळखअपराधगंड बेसावध मन पोखरतोमानेवर बसतो भूतकाळ येणाराबंदिस्त हुंदका डोळ्यातच घुटमळतोथोडाच वेळ एकटे असावे म्हणतोसंवाद मनाशी थेट साधण्यासाठीमन मूक असे की रात्रीचे आकाशमी शोधुन थकतो शब्द बोलण्यासाठीदु:खाची काच खरोखर स्वच्छ बिलोरीदिसतात नव्याने जुने चेहरे