बाकलावा
By Mohana on पाककृती from globalfoodcooking.blogspot.com
बाकलावा हा जीभेवर मधुर चव रेंगाळत ठेवणारा पदार्थ नक्की कुठून आलेला आहे याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. मध्यपूर्वेतील देशांना बाकलावा हा त्यांचा पदार्थ वाटतो. पण असूर त्याचे खर्या अर्थी त्याचे मालक आहेत. सणासुदीला हा पदार्थ करण्याची प्रथा होती. श्रीमंताची चैन म्हणून बाकलावाची ओळखला जाई.नंतर हळूहळू मुळ पाककृतीत थोडा थोडा बदल होत गेला. आता ग्रीक आणि टर्कीश दोघंही बाकलावावर आपला हक्क सांगतात. टर्कीमध्ये तर म्हण प्रचलित आहे, "बकलावा रोज रोज खाण्याइतकी श्रीमंत नाही आपल्याकडे." फिलो डोव्ह हा शब्द पान या ग्रीक शब्दापासून आला आहे. पानासारखं पातळ या अर्थी.__________________________________________________________साहित्य: १ पाकिट (16 ounce) फिलो डोव्ह (phyllo dough) (कोणत्याही दुकानात फ्रिझर भागात मिळतं६ औंस ची तीन सुका मेव्याची पाकिटं (पिस्ते, अक्रोड, बदाम, पिकॅन्स) आवडीप्रमाणे एकच किंवा एकत्रित१ बटर स्टिक१ चमचा दालचिनी कुटून२ लवंगा कुटून१ कप पाणी१ कप किंवा त्यापेक्षा थोडी कमी साखर१ चमचा व्हॅनिला अर्क/ वेलची पावडर१/२ कप मध लिंबू किंचित मीठकृती:फिलो डोव्ह पाकिटावरील सूचनेप्रमाणे बाहेर काढून ठेवा.अक्रोड, बदाम, पिस्ते कॉफी ग्राईंडर मधून सरबरीत करा. बारीक बारीक तुकडे रहायला हवेत. मिश्रणात कुटलेल्या लवंगेतील अर्धा भाग, दोन चमचे साखर, किंचिंत मीठ दालचिनी पावडर घालून मिश्रण एकत्र करा.बटर स्टिक मायक्रोव्हे्वेबल भाड्यांत घालून १ मिनिटं गरम करा. तूप पातळ व्हायला पाहिजे.फिलो डोव्ह पाकिटातून काढा. ((पाकिटात २ गुंडाळ्या असतात. एकच गुंडाळी वापरा).फिलो डोव्ह सुकू नये म्हणून ओलसर फडक्याने झाकून ठेवा.बेकिंग ट्रे मध्ये फिलो डोव्हच्या दोन sheets घाला. ३ qt बेकिंग डिश असेल तर sheets बाजून कापाव्या लागत नाहीत. ट्रे छोटा असेल तर बाजूने sheets कापाव्या लागतील. खूप नाजूक असतात त्यामुळे हातानेच कापता येतात. सहज फाटू नयेत म्हणून हाताळताना काळजी घ्या.ब्रशने तूप लावा. एक ते दोन चमचे अक्रोड, बदाम, पिस्ता, पिकॅनचं मिश्रण फिलो डोव्हच्या sheets वर पसरा.शेवटी ८ sheets रहायला हव्यात. त्याचा अंदाज घेऊन दोन दोन sheets आणि मिश्रण वापरा. 2 sheets, बटर, मिश्रण असा प्रत्येकवेळेला क्रम ठेवा.शेवटी सर्वात वर ६ ते ८ sheets असायला हव्यात.धारदार सुरीने चौकोनी किंवा पाहिजे त्या आकारात तुकडे कापा. तुकडे कापताना सुरील तूप लावून घेतलं तर sheets न फाटता व्यवस्थित कापता येतात. बाजूने कापून उरलेल्या sheets चे तुकडे असतील तर तेवरती नुसतेच घाला. आवरण म्हणून. नाही घातले तरी चालेल.३० ते ४० मिनिटं किंवा बाकलावाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत ३५० डिग्री फॅरेनहाईट्वर भाजा.बाकलावा तयार होईपर्यंत साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर विरघळली की व्हॅनिला आणि मध घाला, लिंबाचे एक दोन थेंब, कुटलेली लवंग आणि अगदी किंचिंत मीठ. २० मिनिटं मंद आचेवर राहू द्या.बाकलावा झाला की ओव्हनमधून काढून जर आवरण म्हणून sheets चे तुकडे घातले असतील तर ते काढा. ताबडतोब तयार झालेला मधाचा रस चमच्या चमच्याने त्यावर घाला. थंड होऊ द्या. बेकिंग ट्रे झाकू नका. थंड झाल्यावर बाकलावाचा आस्वाद घ्या.साधारण ४० बाकलावा तयार होतात. उरलेला बाकलावा फ्रिजमध्ये दोन तीन दिवस दिवस चांगला रहातो. त्यापेक्षा अधिक रहात असेल तर कल्पना नाही कारण आमच्या घरातली मंडळी गोड खाऊ असल्याने दोन तीन दिवसही उरत नाही :-).____________________________________________________________ _______________________________________________________