बदल!
By Mohana on मन मोकळे from https://mohanaprabhudesai.blogspot.com
दरवर्षी जानेवारी महिन्यात मुलं बदलली नाहीत तर जिथून आणली तिथे सोडायची हा माझा संकल्प असतो. कचराकुंडी, रस्ता, जत्रा असा त्यांच्या जन्माचा उगम. सोडायचं तर नक्की कुठे त्यामुळे ती अजूनही इथेच. त्यांना नाही तर नवर्याला बदलावं, म्हणजे कुठेतरी सोडून यावं असं वाटतं पण त्याच्या आईने दिलेला माल परत घेतला जाणार नाही या बोलीवर पाठवलेलं त्यामुळे...नशिब एकेकाचं. दुसरं काय. तरी बदला रे बदला हा धोशा लावावा लागतोच. ते म्हणताना इतके टॉमेटो चिरले की पुढच्यावेळी अशा भूमिका मुलांना आणि नवर्याला देऊन त्यांची भूमिका मी करणार आहे. बघा तर - बदल!With Subtitles - https://youtu.be/euQplHxatks