पाहुनी तुला
By coolgraphica on मन मोकळे from anuvina.wordpress.com
पाहुनी तुला पापणीची ओलावली कडा जराशी डोळ्यात स्वप्न माझ्या आतुर होती जराशी धुंद कोवळ्या मिठीचा स्पर्श हळुवार झाला वेणीत मोगऱ्याच्या रंगून गेली जराशी घेता जवळी मला तू शब्द हरवून गेले निसटून बंध सारे बंदीनी तुझी जराशी ओढून आकाश सारे बरसले तुझ्यावरी मी ओंजळ चांदण्यांनी उजळून गेली जराशी