पंडित गजाननराव
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
श्री. गजाननबुवांच्या वयाला ६१ वे वर्ष लागत असल्याच्या प्रसंगी त्यांचा गौरव करण्याची योजना केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन. मी पुण्याला कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासूनचा म्हणजे सुमारे तीस वर्षांपूर्वीपासूनचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. टिळक रोडवरील गोखल बिल्डिंगमध्ये बुवांचे बिन्हाड असे, तळमजल्यावर. समोर बहावा टिळक रोड. हल्लीच्या इतका धोधो वाहणारा नसला तरी वर्दळीचाच रस्ता. बुवांची