नाजूका भाग - १

By Preeti on from gajbhiyepreeti72.blogspot.com

आज वाड्याच्या शाळेत नवीन मास्तर येणार होते.
जुन्या मास्तरची बदली दुसऱ्या गावाला झाली होती.
जिल्हापरिषदची चवथीपर्यंतची शाळा.
गावापासून जरा लांबच होती. आजूबाजूला गर्द झाडे आणि मध्ये छोटीशी शाळा. शाळेजवळच एक एस.टी. स्टॕण्ड .ते पण छोटेच. गावच छोटे.त्या गावात येणेजाणे तरी कोण करणार? सामानसुमान आणायचे असेल किंवा दवाखान्यात जायचे असेल तरच त्या एस.टी.ची गरज.उगाच तिकिटवर पाच रुपये कोण खर्च करणार?
शाळेत मुले कमीच राहायची. शाळेत जाऊन मुलांचे खूप काही भले होते हे मत कालबाह्य वाटावे अशीच त्या शाळेची परिस्थिती. मास्तरला घरोघरी जाऊन पोरांना शाळेत या म्हणून विनवणी करावी लागायची.
पण तरीही मास्तरला खूप मान द्यायचे सगळे.
मुलाला एकदा शाळेत टाकले कि त्या मुलावर हक्क मास्तरचा. मास्तर म्हणजे शाळेचे सर्वेसर्वा.
जुन्या मास्तरची पाच वर्षांनी बदली झाली होती.
दोनेक महिन्यानंतर गावाला नविन मास्तर मिळाले होते.
पंधरा,सोळा वर्षाची नुकतीच यौवनात पदार्पण केलेली नाजूका रोज शाळेची साफसफाई करायला यायची.
चवथीपर्यंत ती याच शाळेत शिकली होती.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 0
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!