नक्षत्रांचे देणे २६

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

‘भूमी सावंतांचा घरी सगळ्यांना आवडली होती. क्षितिजला ती आवडते, एवढंच नाही तर तो तिच्यावर प्रेम करतो, हे मेघाताईंना समजायला वेळ लागला नाही. त्यामुळे तिला लग्नाबद्दल विचार, असं त्या क्षितिजला सांगत होत्या. तिचे कोणी नातलग नाहीत, मानलेले कोणी जवळचे असतील तर त्यांच्या कानावर घालून आपण पुढची बोलणी करूया असेही त्या म्हणाल्या. क्षितिजला वाटत होते, एवढी घाई करण्याची काही गरज नाही. आधी दोघांनीही एकमेकांशी बोललं पाहिजे, तिच्या मनात नक्की काय आहे, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर लग्नाचा विषय येतो.’ ***** निधीने क्षितिजला 'कालचा प्लॅन स्पॉईल झाला, त्यासाठी सॉरी.' असा मेसेज केला होता. क्षितिजला पार्टीमध्ये घडलेल्या प्रसंगबद्दल तिला विचारायचे होते.  त्याने तिला संध्याकाळी भेटण्यासाठी बोलावले. तिने 'ओके.' असा रिप्लाय केला आणि तो ऑफिसला जायला निघाला. ***** '' मॅडम काही नवीन माहिती?'' मिस्टर सावंत सकाळी-सकाळी भूमीच्या केबिनमध्ये येऊन भूमीला विचारत होते. ''सर काही फाईल्स गायब आहेत त्या शोधतेय, एकदा का मिळाल्या, की मग केस सॉल्व व्हायला वेळ नाही लागणार.'' भूमी ''काही मदत लागली तर सांगा, पण लवकरात लवकर शोध घ्या.'' मिस्टर सावंत ''होय, सर मी पूर्णपणे प्रयत्न करते.'' भूमी ''किती वर्षे तो कंपनीची फसवणूक करतोय माहित आहे. एखादा का त्या फ्रॉडरची माहिती मिळालाय ना, मग मी फ्री होईन. सगळ्या कंपनीला पार्टी देतो का नाही बघा.'' मिस्टर सावंत ''फक्त पार्टी का सर?'' भूमी हसत-हसत म्हणाली. ''तुम्ही मागाल ते बक्षीस मिळेल तुम्हाला. हे प्रॉमिस आहे माझं.''  ठाम विश्वासाने बोलत ते बाय करून निघाले. ''सर मग प्रॉमिस लक्षात ठेवा हं, लवकरच ती वेळ येणार आहे.'' भूमी त्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणाली. आणि 'येस, येस...'म्हणत ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. ***** क्षितिजचा वाढदिवस जवळ आला होता. मेघाताई क्षितिजच्या वाढदिवसाची  जय्यत तयारी करत होत्या. मैथिली प्रकरणामुळे दोन वर्ष वाढदिवस साजरा झाला नाही. त्याला इच्छाही नव्हती. या वर्षी मात्र मेघाताईंनी काही खास सरप्राइज प्लॅनींग केले होते. तेही क्षितिजच्या नकळत. मिस्टर सावंत आणि आज्जो देखील त्यांच्या सरप्राइज प्लॅनमध्ये सामील झाले होते.  ***** '' मॅडम काय शोधताय इकडे?'' संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ ती गुपचूप कोणीनाही ते पाहून फाइल्स शोधत होती, तेही कोणाची परवानगी न घेता.  कंपनीच्या गोडाऊनमधून अचानक आलेल्या आवाजाने भूमी घाबरली. मागे क्षितीज उभा होता. त्याला बघून तिला हायसे वाटले. ''काही महत्वाच्या फाइल्स मिळत नाहीत, त्या शोधते.'' भूमी ''इथे, आणि असं एकटीने.? कोणत्या फाईल्स सांगितले असते तर कोणीही केबिनमध्ये आणून दिल्या असत्या.'' क्षितिज ''तोच तर प्रॉब्लेम आहे, कोणत्या फाइल्स महत्वाच्या आहेत हे सांगितल्यावर त्या फाइल्सच गायब होतात.'' भूमी ''आता काय शिपाई वगैरे सगळेच या फ्रॉडमध्ये सामील आहेत कि काय?'' क्षितीज ''नक्की माहित नाही, पण बरेच एम्प्लॉई सामील आहेत एवढं मात्र नक्की, म्हणून तर मी गपचूप येऊन इथे शोधाशोध करतेय.'' भूमी काही फाइल्स हातात घेत म्हणाली. ''काही महत्वाचं मिळाल का?'' क्षितीज ''काही फाइल्स मिळाल्या आहेत, महत्वाच्या निघाल्या उद्याच हि केस संपून जाईल.'' भूमी ठाम विश्वासाने म्हणत होती. ''उद्या। मग मला एखादा फ्रॉड करावा लागेल असं दिसतंय.'' क्षितीज तिच्याकडे बघत बोलत होता. ''म्हणजे.'' ती न कळल्याने. ''हे काम संपले, तुम्हाला नवीन काहीतरी काम नको का? काम नसेल तर लगेच कंपनीला डच्यु द्याल ना.'' तो मस्कारी करत म्हणाला. ''तुमची कंपनी खूप फ्रॉडर आहे, अजूनही बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. त्या सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार का?'' भूमी ''तसही त्या केसेस सॉल्व्ह केल्यानंतरही नाही सोडणार.'' क्षितिज तिच्या हातातल्या फाइल्स बघत म्हणाला. ''आ?'' ती आ करून त्याच्याकडे बघत होती. ''आय मिन, माझ्या पर्सनल सुद्धा काही केसेस आहेत, फारच गुंतागुंतीच्या अश्या... कंपनीचे काम संपले की आपण दोघांनी त्या केसेस सोडवुया.'' क्षितीज ''एवढा गुंता करायचाच कशाला? काही गोष्टी अगदी सहज सोप्या असतात. दिसत तेवढ अवघड वगैरे नसत काही.'' भूमी ''मग कसं असतं? ती तुमची चैन माझ्या लॉकेटमध्ये गुंतली होती तसं का? अगदी सहजसोपा गुंता, पण सोडवणे अवघड.'' क्षितीज तिला चिडवत होता. ''झालं का? ऑफिसमध्ये प्रोफेशनल वागावं. आत्ताच तुम्ही म्हणालात ना, आधी कंपनीची केस सोडवायची. मग आपण सावकाश तुमच्या गुंतागुंतीच्या केसेस बघुयात.''  म्हणत तिने क्षितिजच्या हातातील दोन-तीन फाइल्स आपल्या हातात घेतल्या. त्या दिवशीचा प्रसंग आठवून तिच्याही नकळत तिच्या गालावर हसू उमटले होते. आणि ती गोडं लाजली. आपल्या चेहेरा त्याला दिसू नये म्हणून तिने क्षितिजकडे मुद्दामहून पाठ फिरवली होती. त्याला हे समजले होते.  '' प्रोफेशनल वागतोय म्हणून तर मॅडम म्हणालो ना.  बाय द वे, त्यादिवशी सांगायचं राहून गेलं, ती साडी सुंदर दिसत होती. आणि तू पण...'' म्हणत तो हसून तिथून बाहेर पडला. ती अजूनही तशीच उभी होती. क्षितीज गेला त्या दिशेने बघून तिने खात्री केली आणि आपल्या गोऱ्यागोबऱ्या गालावर पसरलेली लाजेची लाली लपवत ती तिच्या केबिनकडे निघाली. *****हातातल्या फाइल्स एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी आणि स्वतःची पर्स भूमीने उचलली. ड्रॉव्हर लॉक करून ती घरी जायला निघाली. आज लेट होईल असे निधीने सांगितले होते. त्यामुळे ओला बुक करून ती वाट बघत उभी होती. हातातील फाइल्सची जड पिशवी लपवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला पण बाजूने जाणाऱ्या मुखर्जीच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही. वर त्यांनी संध्याकाळी भूमीला तळमजल्याकडे जाताना पहिले होते. पिशवीत भरलेल्या फाइल्सचे टोक वरती आल्याने त्यांनी ओळखले कि, या ऑफिसच्या फाइल्स आहेत. मॅडम घरी घेऊन जात आहेत म्हणजेच नक्की महत्वाचे काहीतरी असणार. त्यामुळे संध्याकाळपासून ते दुरूनच तिच्यावर लक्ष ठेवून होते. कोणालातरी मेसेज करून त्यांनी याची माहिती दिली आणि ते तिथून निसटले. निधी गाडी घेऊन तिथे टच झाली होती. खरतर ती क्षितिजला गुपचूप भेटायला आली होती. भूमी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समोरच कॅबची वाट बघत असलेली तिने पहिले आणि त्याच वेळी भूमीचे लक्ष तिच्याकडे गेले. तिथेच गाडी पार्क करून ती भूमीच्या जवळ आली. तोपर्यंत क्षितिजही खाली आला होता. निधी ऑफिसखाली आल्याचा मेसेज त्याने वाचला होता. दोघींनाही समोर बघून त्याचा गोंधळ उडाला, आपली गाडी बाजूला उभी करून तो उभा राहिला. क्रमश अजून सुंदर प्रेमकथांची फॉलो करा माझा ब्लॉग. https://siddhic.blogspot.com/
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!