नक्षत्रांचे देणे २५

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 'आपल्याला त्या दोघांनी पाहिलेले नाही, आणि पाहूही नये असे भूमीला वाटले. ती आणि क्षितीज शांतपणे तिथून बाहेर आले. निधीच्या बाबतीत असं का घडावं ? तिची बेस्ट फ्रेंड होती ती... आणि माणूस म्हणूनही अगदी प्रेमळ, जीवाला जीव लावणारी. भूमी फारच अपसेट होते. तिला हि सिचवेशन हान्डेल करन अवघड झालं होत. निधी खरतर पार्टीला येणार नव्हती, आपण मेसेज केला आणि ती भूमीला घेऊन आली. त्यामुळे पाहिलेल्या प्रसंगाचे क्षितिजलाही वाईट वाटले. त्या दोघांनाही निलची फार चीड येत होती.'''आय कान्ट बिलिव्ह... बेस्टफ्रेंड म्हणते, आजपर्यंत तिने मला यातलं काहीही कळू दिल नाही. ''भूमी ''विश्वास ठेवणं कठीण आहे, पण आयुष्य म्हंटल कि असं होत असत.'' क्षितीज ''तिला तो मुलगा भेटला... काय म्हणून? दुसरं कोणीही असत तर ठीक होत... हा निल दर दोन महिन्यांनी नवीन मुलीसोबत फिरणारा. कशावरुन तो म्हणतो ते खरं आहे... संजनाला तर त्याने फसवलच पण अजूनही तो निधीला फसवतोय.'' भूमी ''त्याच्या बोलण्यावरून तरी मला तस नाही वाटतं. मुलींबरोबर फिरणं वेगळं आणि एखादीवर खरोखर प्रेम करण वेगळी गोष्ट आहे... तो सिरिअस वाटला.  '' क्षितीज ''काही कळत नाही. यातून ती कशी बाहेर पडेल देव जाणे.'' भूमी ''वेळ... वेळ हेच सगळ्यावर उत्तर आहे.'' क्षितीज ''तिला सावकाश येउदेत. मला इथे थांबणं आता शक्य नाही. मी निघते...'' भूमी ''लेट्स गो... मी पण निघतोय.'' म्हणत त्याने बाजूलाच उभ्या असणाऱ्या आपल्या कारचा दरवाजा उघडला. भूमी आत जाऊन बसली आणि ते दोघेही निघाले. ***** ''आयुष्य आहे, आपल्या हातात आहेच काय म्हणा. स्टार्स, ते नक्षत्र आहेत ते ठरवतात, कोणाला काय द्यायचं आणि कोणाकडून काय हिरावून घयायच.'' चालत्या गाडीतून समोर वर दिसणारे चांदणे बघत भूमी म्हणाली. ''स्टार्स। स्टार्स वगैरे असं काही असत यावर माझा विश्वास नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आल्याला प्रयत्न करावे लागतात. फ्रीमध्ये कुठे काय मिळत.'' क्षितिज ''मिळत ना. बऱ्याचद असं होतं, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, प्लनींग करतो, पण आपल्याला यश येत नाही. आणि अचानक केव्हातरी ती गोष्ट अकस्मीत घडून येत, आपण काहीही न करता आपल्याला पाहिजे ते मिळत. दॅट्स कॉल्ड  गिफ्ट फ्रॉम स्टार्स.  'माझी आई म्हणायची तुझे स्टार्स चांगले आहेत. ते देतील, आयुष्यात मिळेल ते घ्यायला शिक, तक्रार करू नको.' '' भूमी ''खरं आहे. गोष्टी ठरवल्याप्रमाने घडत नाहीत, पण आयुष्यात अचानक घडणाऱ्या गोष्टी खूपच ठराविक असतात. '' क्षितीज ''मला नाना-माईंसारखी जीव लावणारी माणसं मिळाली. निधी सारखी फ्रेंड मिळाली. ''काही गोष्टी अचानक हिरावूनही घेतात, हेही तितकंच खरं आहे.''  भूमी आकाशाकडे बघत म्हणाली. ''स्काय गेझिंग करायला आवडत का?'' क्षितीज ''हो... खूप... मी तासंतास बघत बसते ताऱ्यांना. मूड खराब असेल तर अख्खी रात्र तारे मोजत बसते.'' भूमी ''ओके, मग मूड खराब आहेच. घरी जाऊन तोच तो विचार करण्यापेक्षा तुला आवडत ते करूया.''म्हणत गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन दोघेही  खाली उतरले. गाडीला टेकून उभी असणारी  भूमी त्या चांदण्यांना बघण्यात गढून गेली होती. आणि क्षितीज भूमीला बघण्यात.   ''you are the most precious gift of my life, which i got from stars.'' क्षितीज हळू आवाजात नकळत बोलून गेला होता. ''काय?'' भूमी आश्चर्याने. ''आपली भेट देखील अचानक झाली ना. म्हणून म्हणालो.'' क्षितिज भूमी त्याच्याकडेच बघत होती. तो काय बोलला हे तिने व्यवस्थित ऐकलेलं होत. 'इट्स नॉट राइट टाइम... हे ओळखून ओठावर आलेले वाक्य न बोलता क्षितीज शांत राहिला होता. रात्र मध्यावर आली होती. तारे तारकांनी भरलेले आकाश अगदी नयनरम्य दिसत होते. ती जणू भान विसरून त्याच्याशी मूक संवाद साधत होती. नकळत तिच्या उजव्या हातात आपला डावा  हात गुंफून तोही आकाशाचा नजारा बघण्यात मग्न झाला. गाडीमध्ये चालू असणाऱ्या रेडिओने गोल्डन इराच्या आठवणी जाग्या केल्या होत्या. मंद प्रकाशात आशा ताईंचा गोडं आणि गूढं आवाज ऐकू येत होता. ‘इस पल के साए में अपना ठिकाना हैइस पल की आगे की हर शय फ़साना हैकल किसने देखा है कल किसने जाना है,इस पल से पाएगा जो तुझको पाना है,जीनेवाले सोच ले यही वक़्त है कर ले पूरी आरज़ूआगे भी ...आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू…जो भी है, बस यही एक पल है.’ गाणं सुरु असताना दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. 'बस यही एक पल हैं...' म्हणत क्षितिजने त्याच्या हातात गुंफलेला तिचा हात वरती घेतला. तोपर्यंत तिला हि गोष्ट माहीतही नव्हती. तिने आपल्या हाताकडे बघून क्षितिजकडे पहिले. त्याने आपला उजवा हात तिच्या हातावर ठेवला. ''काही नात्यांना नाव देता येत नाही. नावाची गरजही नसते. आपल्यामध्ये तसच काहीतरी आहे समज. there is something between us. आयुष्यात तुला कधीही कोणत्याही कारणाने माझी हेल्प लागली तर मी नेहमी तिथे असेन. आणि मला आवडेल तुझ्यासाठी काहीही करायला.''क्षितिज तिच्याकडे बघत बोलत होता. तिला प्रश्न पडला. याला अप्रत्यक्षपणे प्रपोजल म्हणावं का? फारतर काळजी म्हणता येईल किंवा भावना. ती दोन मिनिट स्तब्ध आणि कमालीची शांत झाली. काय करावं, काय बोलावं ते कळेना. ''थँक्स.'' एवढाच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडला. आणि तिने खाली पहिले. ''पण का? लोकांना मदत करायला आवडत का?'' भूमी ''लोकांना नाही, तुला.'' क्षितिज आपल्या वाक्यावर अगदी ठाम होता. ''कारण?'' भूमी ''सांगेन केव्हातरी... तुझ्याभाषेत सांगायचं तर 'विनाकारण'.'' क्षितीज ''मान्य आहे ना... काही गोष्टी अचानक घडतात किंवा अचानक मिळतात?'' भूमी ''येस, आपली भेट सुद्धा अशीच होती. अचानक मिळालेल्या गिफ्ट सारखी.'' क्षितीज '' यालाच तर म्हणता, नक्षत्रांचे देणे.'' भूमी ''गिफ्ट फ्रॉम स्टार्स.'' क्षितीज  थोडावेळ दोघेही तिथेच उभे राहिले. एकमेकांशी मूक संवाद साधत... सोबतीला होती अंधारी रात्र, ताऱ्यांचा नयनरम्य देखावा, गाडीमध्ये वाजणारे मंद-धुंद संगीत आणि शांत अंकात. अजून काय पाहिजे आयुष्यात. ''निघायचं?'' क्षितीज ''होय.'' भूमी पार्टी नंतर घडलेल्या प्रसंगाने डाऊन झालेला मूड बऱ्यापैकी ठीक झाला होता. दोघेही गाडीत बसून घरी जायला निघाले. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी क्षितिजला चांगली संधी मिळाली होती, पण त्यापेक्षा त्याला भूमीची काळजी जास्त होती. आणि विश्वास... विश्वास असल्याशिवाय कोणतेही नाते टिकत नाही. त्यामुळे घाई न करत तिच्या कलेनुसार घायचा, असं ठरवून तो शांत राहिला. 'प्रेम करायला काळ, वेळ, ठिकाण पाहण्याची गरज नसते. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी या गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास क्षण असतो तो. त्यामुळे तो क्षण असा साजरा करावा कि कायम स्मरणात राहील. क्रमश https://siddhic.blogspot.com/ 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!