नक्षत्रांचे देणे १९

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 माईंचा फोन येऊन गेल्यापासून भूमीचे चित्त थाऱ्यावर नव्हते.' त्या म्हणाल्या काही दिवसांनी विभास भारतात येणार आहे. पण का? नाना आणि माईंनी त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. माझ्याशी तर त्याचा काही संबंध आलाच नाही.  मग सगळी सत्य परिस्थिती डोळयासमोर असूनही तो कुणासाठी येतोय इकडे?'  याचा विचार करत ती बसली होती. एवढ्यात दाराची बेल वाजली. पाहते तर निधी दारात उभी होती. सकाळीच तिचा फोन आला होता. आज येणार आहे म्हणून. ''हाय. कशी आहेस?'' तिला मिठी मारत भूमी म्हणाली. ''मी मस्त ग. तू?'' निधी खुर्चीवर बसत भूमीला विचारत होती. ''मी मजेत. बस मी पाणी आणते.'' म्हणत भूमी आता गेली किचन मधून एक पाण्याचा ग्लास भरून तिने तो निधीला दिला. '' काय ग पाण्यावर भागवणार. चहा-कॉफी काही देणारेस का?'' निधी ''सगळं देते. अगदी जेवण पण तयार आहे. आधी पाणी तर घेशील?'' भूमी ''गंमत केली ग. बाय द वे... तुला आवडेल ना, काही दिवस मी तुझ्यासोबत राहिली तर?'' निधी ''ए असं का विचारते ग. होस्टेलला आपण दोघी रूममेट होते ना. मग आता का नाही आवडणार, आणि तू झाली एकुलती एक बेस्टी आहेस.'' भूमी ''ओह थँक्स डिअर.'' निधी उठून फ्रेश व्हायला गेली. भूमीला फार बर वाटलं. एवढे दिवस एकट राहण्याचा कंटाळा आला होता. आता निधी देखील तिच्या सोबतीला असणार होती. मस्त पैकी फ्रेश होऊन दोघीही घराबाहेर बाहेर पडल्या. भूमी ऑफिसला निघाली तर निधी तिच्या क्लासला.*****ऑफिसमध्ये पोहोचल्यावर क्षितीजने भूमीच्या केबिनकडे नजर टाकली. बरेच दिवस तो जाणून बुजून तिथे जायला अव्हॉइड करत होता. पण भूमी देखील आपल्याला कशी काय भेटायला आली नाही. याचे त्याला नवल वाटत होते. तिच्या केबिनमध्ये कोणीतरी शिपाई साफसफाई करत होते हे पाहून क्षितीज तिथे पोहोचला. ''काय चाललंय हे?'' त्याने प्रश्न केला.''सर, ते मॅडमची केबिन व्यवस्थित लावायला सांगितली आहे,  जुन्या फाइल्स बाहेर काढत होतो. खाली फाईल हाऊसमध्ये ठेवून देतो.'' तो शिपाई हातातील काही फाइल्सचा गठ्ठा उचलत म्हणाला. ''कोणी सांगितलं हे तुम्हला? मॅडमनी?'' क्षितीज ''नाही. मुखर्जी साहेबांनी.'' शिपाई ''ज्यांची केबिन आहे त्यांना विचारा, आणि मग काय ते चेंजेस करा. आधी त्या फाइल्स होत्या तिथे ठेवा.'' क्षितीज जवळ जवळ ओरडलाच आणि घाबरून तो शिपाई बाहेर काढलेल्या ढीगभर फाइल्स पुन्हा आतमध्ये कपाटात ठेवू लागला. एवढ्यात भूमी तिथे हजार झाली होती. ''मॉर्निंग.'' भूमी ''गुड मॉर्निंग.'' क्षितीज ''काय चाललं आहे हे? काही कळेल का मला ?'' तिने त्या शिपाईकडे बघत विचारले. ''ते कपाट साफ करत होतो. बाकी काही नाही. झुरळ वगैरे होऊ नये म्हणून.'' तो शिपाई चाचरत म्हणाला. '’ काही झुरळ वगैरे नाही इथे, आणि मला विचारल्या शिवाय एकही वस्तू इथून हलवायची नाही.'' भूमी त्याच्यावर चिडलीच होती. तिला तसे बघून क्षितिजलाही आश्चर्य वाटले. शिपाई निघून गेल्यावर दार ओढून घेत तिने आधी ड्रॉवरमधील एक पिवळी फाइल काढून भराभर तिची आतील  पाने चेक केली. पुन्हा फाइल आत ठेवून  त्या ड्रॉवरला लॉक करून ती चावी आपल्याकडे ठेवून घेतली. ''काही प्रॉब्लेम झाला आहे का?'' तिच्याकडे बघत उभ्या असलेल्या क्षितिजने तिला विचारले. ''नाही, पण मी काही दिवस पाहते आहे, काहीही शुल्लक कारण देऊन मला न विचारता ही केबिन का साफ केली जाते.? काही कळत नाही. नक्की काय प्रकार आहे?'' भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली. ''तुम्ही त्या लीगलच्या फ्रॉड बद्दल शोध घ्यायला सुरुवात केली?'' क्षितीज ''होय, पण इथे त्याच काय?'' भूमी ''बी केअरफूल, तुम्हाला हवे असलेले महत्वाचे पेपर्स आणि फाइल्स लॉकर मध्ये ठेवत जा.'' क्षितीज ''ओह, हे माझ्या लक्षात कसं आलं नाही.  हि गोष्ट सरांच्या कानावर घातली पाहिजे. कारण इथल्या बर्याचश्या जुन्या फाइल्स मला लागणार आहेत. त्या कुठेही जात काम नयेत. नाहीतर मला त्या केसच्या पाहणीमध्ये पुढे जाता येणार नाही.'' भूमी ''मी सांगतो.'' क्षितिज ''आधी या केबिनमध्ये कोण बसायचं? आय मिन आधी कोणीतरी या केसशी निगडित स्टडी करत होते ना.. त्यांची काही माहिती मिळू शकते. भेटता आलं तर बर होईल. ''  भूमी ''मैथिली बघायची सगळं. ती इथेच बसायची, तिला भेटता येन शक्य नाही.'' तो क्षणाचाही विलंब न करत बोलला. ''का नाही? त्यांनी बरेच डायग्रॅम्स तयार केले आहेत, त्यांची जुळवणी मला जमत नाही, आयमीन लक्षात येत नाहीय. त्यांच्याशी बोलता आले तरीही पुष्कळ. हि केस एका चुटकीसरशी सॉल्व होईल.'' भूमी ''शी इस इन कोमा. बोलता येणेही शक्य नाही.'' क्षितीज ''ओह, सो ब्याड. एनी वे हे घ्या.''  म्हणत भूमी आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधू लागली. सापडल्यावर तिने क्षितिजचे लॉकेट त्याच्या समोर धरले.''कामाच्या गडबडीत खूप दिवस आपली भेट झाली नाही. त्यामुळे हे माझ्याकडेच राहील होत.''लॉकेट हातात घेऊन क्षितिजने ते खिशात टाकलं. ''इट्स ओक. कॅरी ऑन, काही मदत लागली तर सांगा.'' म्हणत तो केबिन बाहेर पडला. तो निघत असताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भूमी बघत होती. तिने जाणून बुजून ऑफिस व्यतिरिक्त कोणताही विषय काढला नव्हता. सध्या फक्त कामाकडे लक्ष द्यायचं, बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. असं तिने ठरवलं होत. पण क्षितिजही आपल्याशी कामाव्यतिरिक्त  जास्त काही बोलला नाही. याच तिला नवल वाटलं. *****दिवसभर ती बऱ्याच फाइल्स चेक करत होती. तिने आज लंच सुद्धा केले नाही. सकाळी जो शिपाई कपाट साफ करत होता, त्याने कपाटातून काढलेल्या काही फाइल्स टेबलवर तश्याच राहिलेला होत्या. भूमीच्या मनात काहीतरी शंका आली आणि तिने त्या फाइल्स चेक करायला सुरुवात केली. हवी असणारी बरीच माहिती तिला मिळाली होती. तिने तडक जाऊन पॅन्ट्री हाऊसमध्ये त्या शिपाईला शोधून काढले.  'माझी केबिन साफ करण्याची ऑर्डर तुम्हाला कोणी दिली?' असे विचारल्यावर त्या शिपाई काकांनी मुखर्जींचे नाव घेतले. आता तिच्या शोधला एक दिशा मिळाली होती. संध्याकाळचे सहा वाजून गेले तरीही ती त्या फाइल्स आणि मैथिलीने काढलेल्या बजेट अँड प्रपोजल च्या डायग्रॅमची RND करत बसली होती. दोन-तीन वेळा क्षितीज केबिन बाहेरून येऊन गेला. काचेतुनच तिला काम करताना पाहून तो आत आला नाही. भूमी उशिरा पर्यंत ऑफिस मध्ये आहे हे लक्षात आल्यावर क्षितिजही त्याचे काम करत थांबून होता. तिचे डोळे फार थकले होते, डोकंही जड झालं होत. अगदीच कंटाळा आला तेव्हा भूमीने घड्याळाकडे पहिले. संध्याकाळचे आठ वाजले होते. आपल्याला फार उशीर झाला आहे. निघायला हवं. हे लक्षात आल्यावर तिने सगळे पेपर्स लॉक केले आणि आपली पर्स उचलली. रिसिप्शनवरती आऊट करून ती निघाली. क्षितिज तिच्या मागेच होता, हे तिच्या लक्षात आलं. ''आज लेट?'' भूमीने त्याला विचारले.''तुम्ही पण?'' क्षितीज''होय, कामाच्या गडबडीत लक्षात आलं नाही. आणि फार उशीर झाला.'' भूमी''चला सोडतो.'' क्षितीज''नको जाते ओला ने.'' भूमी''मला द्या ओला चे पैसे, मग तर झालं.'' क्षितीजत्याच्या वाक्यावर ती खूप हसली. ''ओके.'' म्हणत त्याच्याबरोबर निघालीही.क्रमश https://siddhic.blogspot.com/
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!