देश म्हणजे कागदाचा नकाशा नसतो - देश कागज पर बना नक्शा नहीं होता
By SameerBapu on मन मोकळे from https://sameerbapu.blogspot.com
जर तुमच्या घराच्याएका खोलीत आग लागली असेलतर तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपू शकता का?जर तुमच्या घराच्याएका खोलीत प्रेतं सडत असतील तरी ही तुम्ही दुसऱ्या खोलीत प्रार्थना करू शकता का? जर उत्तर होय असेलतर मला तुमच्याशी काही बोलायचे नाही.देश म्हणजे कागदावर बनवलेला नकाशा नसतोज्यातला एक भाग फाटला गेला तरी बाकी भाग तसेच शाबूत राहतील आणि नद्या, पर्वत, शहर, गावपूर्ववत आपल्याच जागी दिसतीलखिन्न नसतील. जर तुम्ही असं मानत नसाल तर मला तुमच्या सोबत राहायचे नाही.या जगात अद्याप तरी मानवाच्या जिवापेक्षा काहीच मोठं नाहीना ईश्वरना ज्ञान ना निवडणूक. कागदावर लिहिलेली कोणतीही रचना फाडली जाऊ शकते आणि मातीच्या सातही थरांमध्ये गाडली जाऊ शकते. जो विवेक प्रेतांच्या टेकूवर उभा असेल तो अंध असेल. जे शासनबंदुकीच्या नळीवर चालत असेलतो शस्त्रांचा व्यापार असेल. जर तुम्ही असे मानत नसाल तर मलाआता एक क्षण देखील तुम्हांस सहन करायचे नाही याद राखाएका बालकाची हत्या,एका स्त्रीचा मृत्यू,एका माणसाचागोळ्यांनी चाळण झालेला देहम्हणजे कुठल्या सरकारचे पतन नसून पतन संपूर्ण देशाचे. असा रक्तपात केल्याने धरतीत आत्मा राहत नाहीनि आकाशात फडकणारे झेंडेकाळे होऊन जातात. ज्या भूमीवर सैनिकांच्या बुटांचे ठसे असतील आणि त्यांच्यावरकलेवरं पडत असतीलती भूमीजर तुमच्या धमन्यात आग बनून वाहत नसेलतर समजून जाकी तुम्ही बंजर झाला आहाततिथे तुम्हाला श्वास घेण्याचा देखील अधिकार नाहीयेतुमच्यासाठी नाही राहिली ही दुनिया. अखेरची गोष्टअगदी स्पष्ट,कोणत्याच खुन्याला कधीही माफ करू नका मग असला जरी तुमचा दोस्तयार, धर्माचा ठेकेदार वा असला जरी लोकशाहीचा स्वयंघोषित चौकीदार! देश म्हणजे कागदावर बनवलेला नकाशा नसतोदेश असतो कोट्यवधी माणसांनी बनलेला एकसंध देहज्यात नांदतात तुमचे आमचे यांचे त्यांचे सर्वांचे संसार!नोंद - विख्यात हिन्दी कवी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या 'जर तुमच्या घराच्या एका खोलीत आग लागली असेलतर तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपू शकता का?जर तुमच्या घराच्याएका खोलीत प्रेतं सडत असतील तरी ही तुम्ही दुसऱ्या खोलीत प्रार्थना करू शकता का? जर उत्तर होय असेलतर मला तुमच्याशी काही बोलायचे नाही.देश म्हणजे कागदावर बनवलेला नकाशा नसतोज्यातला एक भाग फाटला गेला तरी बाकी भाग तसेच शाबूत राहतील आणि नद्या, पर्वत, शहर, गावपूर्ववत आपल्याच जागी दिसतीलखिन्न नसतील. जर तुम्ही असं मानत नसाल तर मला तुमच्या सोबत राहायचे नाही. या जगात अद्याप तरी मानवाच्या जिवापेक्षा काहीच मोठं नाहीना ईश्वरना ज्ञान ना निवडणूक. कागदावर लिहिलेली कोणतीही रचना फाडली जाऊ शकते आणि मातीच्या सातही थरांमध्ये गाडली जाऊ शकते. जो विवेक प्रेतांच्या टेकूवर उभा असेल तो अंध असेल. जे शासनबंदुकीच्या नळीवर चालत असेलतो शस्त्रांचा व्यापार असेल. जर तुम्ही असे मानत नसाल तर मलाआता एक क्षण देखील तुम्हांस सहन करायचे नाही याद राखाएका बालकाची हत्या,एका स्त्रीचा मृत्यू,एका माणसाचागोळ्यांनी चाळण झालेला देहम्हणजे कुठल्या सरकारचे पतन नसून पतन संपूर्ण देशाचे. असा रक्तपात केल्याने धरतीत आत्मा राहत नाहीनि आकाशात फडकणारे झेंडेकाळे होऊन जातात. ज्या भूमीवर सैनिकांच्या बुटांचे ठसे असतील आणि त्यांच्यावरकलेवरं पडत असतीलती भूमीजर तुमच्या धमन्यात आग बनून वाहत नसेलतर समजून जाकी तुम्ही बंजर झाला आहाततिथे तुम्हाला श्वास घेण्याचा देखील अधिकार नाहीयेतुमच्यासाठी नाही राहिली ही दुनिया. अखेरची गोष्टअगदी स्पष्ट,कोणत्याच खुन्याला कधीही माफ करू नका मग असला जरी तुमचा दोस्तयार, धर्माचा ठेकेदार वा असला जरी लोकशाहीचा स्वयंघोषित चौकीदार! देश म्हणजे कागदावर बनवलेला नकाशा नसतोदेश असतो कोट्यवधी माणसांनी बनलेला एकसंध देहज्यात नांदतात तुमचे आमचे यांचे त्यांचे सर्वांचे संसार!नोंद - विख्यात हिन्दी कवी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या 'देश कागज पर बना नक्शा नहीं होता’ या प्रसिद्ध कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे आणि यातले अंतिम कडवे स्वरचित आहे.सोबतची क्लिप इंटरनेटवरून साभार.https://fb.watch/eUgR8DiJco/’ या प्रसिद्ध कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे आणि यातले अंतिम कडवे स्वरचित आहे.सोबतची क्लिप इंटरनेटवरून साभार.https://fb.watch/eUgR8DiJco/