दृश्यकथन - प्रारंभ!

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

Youtube - https://youtu.be/qx6hWY8E7jcFacebook - https://fb.me/e/dh9sXu2QKअमेरिका: २१ ऑगस्ट २०२१ - सकाळी ११:३० वाजता (EST) भारत: २१ ऑगस्ट २०२१ - रात्री ०९:०० वाजताआमच्या youtube वाहिनीचे सभासद (Subscribe) नक्की व्हा. सत्य घटनेवर आधारित! कथा तरुण मुलाच्या फाजील उत्सुकतेची, अकल्पित वळणाची, समाज माध्यमांच्या उथळपणाची, उठलेल्या वादळाची आणि निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्नांची! गुंतवून टाकणारं दृश्यकथन - प्रारंभ!सत्य घटनेवर आधारित! कथा तरुण मुलाच्या फाजील उत्सुकतेची, अकल्पित वळणाची, समाज माध्यमांच्या उथळपणाची, उठलेल्या वादळाची आणि निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्नांची! गुंतवून टाकणारं दृश्यकथन - प्रारंभ!  या नाट्याचा प्रारंभ आम्ही गेल्यावर्षी अगदी जोरात केला. जोरात म्हणजे पार अगदी zoom गिरी रत्नागिरीलाच पोचली. रत्नागिरीत मी असतानाचे कलाकार आणि काही नव्या दमाचे कलाकार सज्ज झाले. सराव सुरु झाला. आनंदीआनंद पसरला आणि मग आला पाऊस, मग आला पाऊस, मग आला पाऊस. काहीवेळा कलाकार पावसाने गारठले तर काहीवेळा zoom!प्रारंभचा शेवट होण्याची काही लक्षणं दिसेनात पण सुरू केलं आहे तर शेवट हा झालाच पाहिजे. इथेही रत्नागिरीशिवाय काही पान हलेना. रत्नागिरीच्या अनुप बापटचा मी ’आऽऽऽ’ ऐकला होता गाण्यातला. त्याला म्हटलं आता गद्यातला ’आ’ जमव. तो ’आ’ करुन बसला. पंकज शेट्ये, मिलिंद डबली, महेश जोशी सगळे एकापेक्षा एक. आम्ही एकत्र कामं केलेली पण आता वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावलो. उत्साहाने सगळे प्रारंभचा शेवट करण्यासाठी सज्ज झाले. निलेश माझा लेखक मित्र. तो सामील झाला आणि जोरदार प्रारंभ पाहून त्याने त्याच्या भूमिकेचा शेवट करुन टाकायचं ठरवलं. त्याचे दोर तोडून टाकल्यावर राहिला बिचारा शेवटपर्यंत. विक्रांत आणि अभिजय या दोघांनीही ढाणढाण संगीत द्यायला आणि कात्री मारायला सुरुवात केली. आम्ही आपले आमचे संवाद म्हणून मोकळे झालो पण त्यांच्या मनाला येईपर्यंत त्यांनी प्रारंभचा शेवट होऊ दिला नाही. एकेक भन्नाट कल्पना लढवत ते धावत होते. इतके की कधी थांबतायत तेच कळेना. थांबले तेव्हा उत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि संकलनाची अनोखी भेट आम्हा कलाकारांना त्यांच्याकडून मिळाली. प्रारंभचा शेवट होणे नाही असं वाटायला लागलं असतानाच जी काही अफलातून कामगिरी सर्वांनी केली आहे ती पाहायला या हे आमचं सगळ्याचं आग्रहाचं निमंत्रण.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!