थरार (वजा) तर्क (बरोबर) फोर्स-२ (Movie Review - Force -2)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
'तो येतो, एकेकाला बदडतो किंवा ठोकतो आणि जिंकतो', हे एकमेव सूत्र 'फोर्स-२' पहिल्यापासून शेवटपर्यंत पाळतो. मग तो त्याच्या एन्ट्रीचा टिपिकल फिल्मी प्रसंग असो की सिनेमाच्या शेवटची एक नॉन-फिल्मी नोट असो. अर्थात तो हे सगळं करू शकतो, ह्याविषयी बघणाऱ्याला तिळमात्र शंका वाटत नाही. घायल, घातक वगैरे राजकुमार संतोषीच्या सिनेमांत सनी देओल जेव्हा एका हाताने ६-७ आणि दुसऱ्या हाताने ६-७ लोकांना एकटाच झुलवताना