झटका........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

सकाळची सगळी कामं आटपून तेजल निवांत सोफ्यावर बसली. मोबाईल घेतला, सहज तारखेवर नजर गेली आणि पुटपुटली, हे असं होतं. दोन दिवसांपूर्वीच बोलणं झालं, लग्नाचा वाढदिवस आला जवळ. आणि आता सकाळच्या गडबडीत गेलं डोक्यातून उडून!!मी एक विसरले कामात, ह्याला काय झालं विसरायला?, सारंगकडे बघत तिने तोंड वाकडं केलं. पण त्याचं कुठं लक्ष होतं तिच्याकडं. तो ऑफिसला जाण्याच्या गडबडीत हे राहिलं ते राहीलं करत घरात भिरभिरत होता. त्याला मधेच अडवून दात ओठ खाऊन, आज तारीख कुठली आहे रे?, असं चढ्या आवाजात विचारावं वाटत होतं तेजलला. पण तेवढयातल्या तेवढ्यात तिने कूट कारस्थान रचलं. आणि ती स्वतःशीच म्हणाली, बघू तरी याच्या कधी लक्षात येतंय ते. अगर ये आज भी मुझसे सच्ची मोहब्बत करता होगा, तो उसे जरूर याद आयेगा!!डायलॉग मनात आला तशी फार मज्जा वाटली तेजलला. तिने ठरवलच, बघूच आता!!सारंगचं सर्व आवरलं तसं त्याने तेजलला बाय केलं, त्यावर तोंडावरची रेषही न हलवता त्याच्याकडे दुर्लक्ष करून मान झटकली. सारंग आश्चर्याने म्हणाला, अगं आत्ता तर चांगली होतीस. झपकन् काय रंग पालटतेस सरडयासारखी!सकाळ सकाळी नवरेशाहीबद्दल भडक विधानं केली का कुणी? बरं केली जरी कोणीही, तरी तुला डोळे फाडून वाचायला कोण सांगत लगेच? अन् वाचते ते वाचते मला कशाला त्याच्याशी जोडतेस उगाच. ते सुद्धा आपल्या घरात बायकोशाही असताना!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सोड, मी पळतो आता. तुझ्या नादात उशीर झाला मला.सारंग गेला तरी तेजलच्या डोक्यात मात्र तेच चक्र सुरू होतं, लग्नाच्या पंधरा वर्षानंतर आज तिला आपल्या प्रेमाची परीक्षा घ्यायची दुर्बुद्धी सुचली होती. बघूया दिवसभरात तरी येतं का नाही लक्षात याच्या, असं म्हणत तिने समोरचा पेपर वाचायला घेतला. पण जे काय वाचत होती ते डोक्यापर्यंत जातच नव्हतं तिच्या. सारंग विसरला तर त्याला कसं धारेवर धरायचं, याचं प्लॅनिंग करण्यात, लग्न झाल्यापासून काय काय अन् किती किती म्हणून सोसलय हे उकरून उकरून काढण्यात तिचं डोकं जास्त इंटरेस्ट घेत होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); विसरु दे तर खरा, बघतेच मी त्याला,असं ती म्हणायला आणि मोबाईलवर मेसेजची बीप वाजायला दोघांची एक वेळ झाली.पहाते तर, सारंगकडून शुभेच्छाचा मेसेज येऊन धडकला होता.क्षणात चित्र पालटलं. उगीचच आलेल्या रागाची जागा नवऱ्याबद्दलच्या अपार प्रेमाने तुडुंब भरून गेली.आतापर्यंत सोसलेलं सगळं पुन्हा मनात खोल खोल गाडलं गेलं.हाँ ये आज भी मुझसे सच्ची मोहब्बत करता है, याची ग्वाहीही मिळाली.तेजलचं मन आनंदाच्या तरंगात उड्या मारत असतानाच सारंगचा फोनही आला.शेवटी नेहमी मीच लक्षात ठेवायचं ना? खरंतर यावेळी मी बोलणारच नव्हतो पहिले. विचार केला, बघू हिच्या किती लक्षात राहतय? घेऊ यावेळी प्रेमाची परीक्षा. असेल अजूनही तेवढंच प्रेम तर तिला नक्की आठवेल. तसं मी पण सकाळी विसरलोच होतो ग, ऑफिसमध्ये आलो, तारीख बघितली आणि म्हटलं, ओsह आजच तो दिवस नाही का भाग्य फळफळण्याचा!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); फोन उचलला लगेच, पण परत विचार आला. आज घेऊच हिच्या प्रेमाची परीक्षा. मात्र मनच लागेना झालं ग. तुझा तो सकाळचा रागवलेला चेहरा डोळ्यासमोर आला. म्हटलं जाऊदे आपल्या माणसांची काय ती परीक्षा घ्यायची. आणि बरं पास नाही झाली तरी ऑप्शन आहे का काही? एवढं करते ती माझ्यासाठी, एखादा दिवस विसरला म्हणून काय झालं?सारंग नॉनस्टॉप बोलत सुटला, आणि तेजल फक्त ऐकतच राहिली. ऐकता ऐकताच हरवली.ती काही बोलेना म्हणून सारंग मोठ्याने म्हणाला, चार वाजता येतो घरी. मग प्लॅन करूया. तेजलने भानावर येत 'हो' म्हटलं आणि फोन ठेवला.तिला वाटलं, कित्ती वेडी मी!! विसरला तर कसं सोलून काढावं याला असा विचार करत होते मी एकीकडे. आणि हा?? लक्षात दोघांच्याही नव्हतं, पण त्याने किती सहज कबूल केलं सगळं. परीक्षा घ्यावीशी त्यालाही वाटली, पण राहवलं नाही म्हणून मेसेज आणि फोनही करून मोकळा झाला. खरंच, एवढं साधं सरळ का वागता येत नाही मला?बघावं तेव्हा मन वाकड्यातच शिरायला का टपलेलं असतं कोण जाणे!!तेवढ्यात परत सारंगचाच फोन आला. आता काय झालं याला म्हणत तिने फोन उचलला, तर तिकडून तो म्हणाला, अगं मगाशी विचारेन म्हटलं आणि विसरलोच, सकाळी नक्की तुला झालं काय होतं अचानक?तेजल त्यावर मोठ्याने हसली, आणि म्हणाली, काही नाही रे झटका आला होता असाच.....तुझ्याशी काही नाही त्याचं!! चला सुटलो, असं म्हणत सारंगने फोन ठेवला खरा.पण बिचारा नक्की कशाकशातून सुटला होता हे त्याला माहीतही नव्हतं.........कितीही झालं तरी बायकोचा झटका होता तो, नवऱ्याच्या जीवाला भावनिक, मानसिक, शारीरिक वा आर्थिक यासम कोणत्याही प्रकारचा फटका न देता गेला, ही काय छोटी गोष्ट झाली म्हणता.......??©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!