ज्योतिष शास्त्र "- बाण लागला तर लागला

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

. ."ज्योतिष शास्त्र "- बाण लागला तर लागला ????अगदी अशीच  एक प्रतिक्रिया मध्यंतरी मला  मिळाली. त्यावर मनात आलेले हे विचार.हे एक दैवी शास्त्र आहे.कुणी कितीही याचे ज्ञान घेतले / अभ्यास केला तरी तो कमीच आहे कारण याची व्याप्ती समुद्रा सारखी  प्रचंड आहे. त्यामुळे मी " अगदी प्रत्येक वेळी, कुठल्याही प्रश्णाचे अगदी अचूक भविष्य सांगू शकतो " असा गर्व कुठलाही ज्योतिषी करत नाही/कुणी करत असेल तर तसा करु नये. त्यामुळे या शास्त्राबद्दल एखाद्याला ' बाण मारणे ' असे वाटणे चुकीचे नाही. कारण एवढ्या व्यापक असलेल्या या शास्त्रात एखाद्या प्रश्णाबाबत दोन ज्योतिषी त्यांच्या पद्धतीने वेगळे नियम लावू शकतात ,जसे एखाद्या कोर्ट केसमधे दोन वकील कायद्याचे अनेक बाण सोडतात. पण विजय एकाचाच होतो. मग हरलेला पुढच्या न्यायालयात जातो तिथे कदाचित परत कायद्याचे अनेक बाण सोडले जातात.साधारण तसेचमग तरीही ज्योतिषांकडे मार्गदर्शनासाठी का जावे?  किंवा का जातात.बाण अचूक लागेल हे जरी सांगता आले नाही तरी निदान कुठल्या दिशेला बाण सोडायचे हे कळले तरी आयुष्याच्या वाटचालीत खूप फरक पडतो.खरं म्हणजे काही कुलकर्णी / जोशी * घराण्याचा हा परंपरागत व्यवसाय , उदरनिर्वाहाचे साधन हे होते.  अजूनही खेडेगावात  लोकं यांच्याकडे मार्गदर्शन मिळावे म्हणून जातात. यात त्यांना फार दक्षिणा मिळते असेही नाही पण चरितार्थ चालू शकतो. आज त्यांची पुढची पिढीच ( अपवादात्मक)   चार पुस्तकं  शिकली काय या शास्त्राला नावे  ठेऊ  लागली हे दुर्देव.तर जोपर्यंत लोकांना१) अमेरिकेत/ परदेशात  २४ तासाच्या आत जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याची अद्याक्षर पाहिजे असतील२) नवीन गाडी,घर, पायाभरणी, दुकान चालू करणे ,वस्तू खरेदी करणे या करता लागणारा मुहुर्त माहिती पाहिजे असेल३) शेतकरी बंधूंना पावसाळी वाहन समजून घ्यायचे असेल४) अनेक धार्मिक गोष्टींसाठी,  लग्न- मुंज यासाठी मुहूर्त लागणार असतील५) आपल्या मुला-मुलींचे / बेसिक शिक्षण/ परदेश शिक्षण/ नोकरी-का व्यवसाय  / लग्न / संसार असे प्रश्ण मनात येत असतील  आणि याबाबत सल्ला हवा असेल६) कोट्यावधी फी वकिलाकडे भरून ही मला जामीन मिळेल का / माझी आरोपातून सुटका होईल का / मला शिक्षा होईल का? हे जाणण्याचा प्रयत्न करु असे वाटेल७) मी  कुठल्या दैवताची  उपासना करावी ? हे जाणून घ्यायची इच्छा होत असेल८) सध्याचा वाईट काळ केंव्हा बदलेल?  हे जाणून घ्यायची इच्छा होईल, आणि असेच इतर अनेक प्रश्ण पडतील तेंव्हाजगाच्या अंतापर्यत कुलकर्णी/ जोशी*  ( प्रातिनिधीक नावे * ) आपले  बाण सोडण्याचे काम इमाने इतबारे करतच राहतील यात शंका नाही .आधी उल्लेख केल्याप्रमाणे या बाणांना योग्य दिशा देण्याचे काम मात्र सर्वच ज्योतिषांनी प्रयत्नपूर्वक केले पाहिजेशहाण्या माणसाने" कोर्टाची पायरी चढू नये " असे म्हणले गेले आहे, पण ज्योतिषाच्या घरची ( किंवा कार्यालयाची)   पायरी चढू नये असे कधी ऐकलंय?फरक स्पष्ट आहेतर  या ना त्या कारणाने मार्गदर्शनासाठी माझ्या घरची पायरी चढलेल्या, पायरीवर असणा-या आणि पुढेही येणा-या सर्वांना सदर लेखन कृतज्ञतापुर्वक समर्पित. ???? ????( ????) अमोलभाद्रपद. कृ द्वितीया, रेवती नक्षत्र२२/०९/२१kelkaramol.blogspoLoading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!