ज्यांच्याकडे जन्मकुंडली नाही किंवा ज्यांना जन्मतारीख, जन्मवेळ, आणि जन्मठिकाण माहिती नाही, अशा लोकांसाठी...

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

तुमच्याकडे कुंडली नसेल आणि तरी एखाद्या विषयाबाबत मार्गदर्शन हवे असेल तर प्रश्न कुंडली शास्त्र उपयुक्त ठरते.बऱ्याच वेळा लोक ईमेल करतात कि आम्हाला मार्गदर्शन हवे आहे पण आमच्याकडे कुंडली नाही किंवा मला माझी जन्मतारीख माहित नाही, किंवा नुसतीच जन्मतारीख माहिती आहे पण जन्मवेळ आणि जन्मठिकाण माहित नाही, वगैरे. तर अशा सगळ्या लोकांसाठी हि पोस्ट आहे.  जन्मकुंडली किंवा जन्मवेळ, ठिकाण, तारीख माहिती नसेल तरी आपल्याला ज्योतिषीय मार्गदर्शन मिळू शकतं. त्यासाठी प्रश्न कुंडली शास्त्र वापरतात. या लेखात त्याविषयीची माहिती पाहूयात. प्रश्न कुंडली शास्त्र म्हणजे काय? त्यानुसार कुंडली कशी तयार करतात?  प्रश्न कुंडली शास्त्र हा ज्योतिषाचाच एक भाग आहे.  प्रश्न कुंडली शास्त्रानुसार ज्यावेळी एखादा प्रश्न विचारला जातो ती वेळ, तारीख आणि ठिकाण घेऊन कुंडली बनवली जाते. जन्मकुंडलीत ज्याप्रमाणे आपला जन्म ज्यावेळी झाला ती वेळ, ठिकाण आणि तारीख घेतली जाते, त्याचप्रमाणे प्रश्न कुंडलीत प्रश्नाचा जन्म लक्षात घेऊन कुंडली मांडली जाते.  आणि काही विशिष्ट केसमध्ये गरज भासल्यास अंशात्मक कुंडल्यादेखील अभ्यासल्या जातात. प्रश्न कुंडली नुसार पत्रिका पाहण्याचे आणि फलादेश देण्याचे नियम हे काही प्रमाणात वेगळे असतात.   प्रश्न कुंडली नुसार कुठल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळू शकते?सर्वसाधारणपणे, ज्या गोष्टी जन्मकुंडली पाहून सांगता येत नाहीत, अशा गोष्टी प्रश्न कुंडली पाहून सांगतात. म्हणजे, लग्न कधी होईल , नोकरी कधी मिळेल, हरवलेली वस्तू किंवा व्यक्ती मिळेल का? कधी मिळेल? इत्यादी. पण त्याचबरोबर इतर कारणांकरता देखील प्रश्न कुंडली पाहतात. काही लोकांना दुसऱ्या कुणाविषयी प्रश्न विचारायचे असतात पण ज्यांच्याविषयी प्रश्न विचारायचा आहे त्याची कुंडली नसते. उदा. मागच्या महिन्यातील गोष्ट आहे. एक गृहस्थ होते. त्यांच्या मुलीसाठी एक स्थळ सांगून आलं होतं, पण मुलाकडचे दुसऱ्या देशातील असल्यामुळे त्यांच्याकडे त्याची पत्रिका नव्हती. या गृहस्थांचा पत्रिकेवर खूप विश्वास. त्यामुळे पत्रिका बघितल्याशिवाय लग्न करायचा नाही असा ते म्हणत होते. तेव्हा मी त्यांना प्रश्न कुंडली प्रमाणेच मार्गदर्शन केलं आणि मगच त्यांचं समाधान झालं, आणि त्यांनी लग्नाला होकार दिला.    तर अशा अनेक प्रसंगांमध्ये प्रश्न कुंडलीची खूप मदत होते :एखाद्या व्यक्तीची कुंडली नसेल तर त्याविषयीचे प्रश्न पाहण्यासाठी शेअर मार्केट विषयीचे प्रश्न: हा शेअर घेऊ कि नको? नफा होईल कि नुकसान ?अडकलेले पैसे कधी मिळतील?  घर सोडून गेलेली व्यक्ती परत येईल का? हरवलेली वस्तू सापडेल का? कधी ?व्हिसा मिळेल का? कधी?चालून आलेली संधी फायद्याची निघेल का तोट्याची? चालून आलेले स्थळ चांगले आहे का? घटस्फोट घेऊ का थांबू?राहते घर विकावे का? नवीन घर घेऊ का?नवीन गाडी आता घेऊ कि थांबू? लाभेल असा मुहूर्त कधी? नवीन उद्योगाला आता सुरुवात केल्यास चालेल का? आता ज्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे तो किंवा ती पुढे यशस्वी व भाग्यकारक ठरेल का?कोर्टात केस चालू आहे यश मिळेल का? केस मागे घेऊ का? कुठल्या शाखेचे शिक्षण घ्यावे? परदेशी गेल्यास चांगले कि देशातच उत्कर्ष होईल? अशा विविध प्रकारच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे प्रश्न कुंडली देऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर जन्मकुंडली नसेल किंवा जन्मवेळ, ठिकाण आणि तारीख यापैकी काही चुकीचं असेल किंवा माहित नसेल, तर अशा सर्व बाबतीत तुम्ही प्रश्न कुंडलीच्या आधारे मार्गदर्शन घेऊ शकता. अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!