जानकी के लिए ..
By SameerBapu on मन मोकळे from https://sameerbapu.blogspot.com
जानकी के लिए.. देह गतप्राण झलाय रावणाचास्तब्ध झालीय लंका सारी सुनसान झालीय किल्ल्याची तटबंदी कुठे कसला उत्साह नाहीनाही तेवला दिवा कुणाच्या घरी घर बिभिषणाचे वगळता! समुद्र किनारी बसलेले विजयी रामबिभिषणास राज्य लंकेचे सोपवताहेतजेणेकरून प्रातःकाळीच व्हावा त्याचा राज्याभिषेकसातत्याने ते लक्ष्मणास पृच्छा करताहेतआपल्या सहकाऱ्यांचे क्षेम कुशल जाणताहेतचरणापाशी त्यांच्या बसुनी आहे हनुमान! धुमसताहेत लक्ष्मण मनातूनच की, सीतेला आणण्यास का जात नाहीत राम अशोक वाटिकेत?पण बोलू काही शकत नाहीत. हळू-हळू सारी कामं निपटतातसंपन्न होतो राज्याभिषेक बिभिषणाचाआणि राम प्रवेश करतात लंकेमध्ये मुक्कामी एका विशाल भुवनात. अशोक वाटिकेस धाडतात हनुमानादेण्यास ही खबरकी, मारला गेला आहे रावण आता लंकाधिपती आहे बिभिषण. बातमी ती ऐकताच सीताहोऊन जाते दिग्मूढ बोलत काहीच नाही बसते वाटेकडे लावूनि डोळे वध रावणाचा करताच वनवासी राम झालेत का सम्राट? लंकेत पोहोचून देखील दूत आपला पाठवताहेत जाणू इच्छित नाहीत की, वर्षेक कुठे राहिली सीताकशी राहिली सीता?डोळ्यांना तिच्या अश्रूंच्या धारा लागतातजयांस समजू शकत नाहीत हनुमानबोलू शकत नाहीत वाल्मिकी. राम आले असते तर मी भेटवलं असतं त्यांनात्या परिचारिकांशीज्यांनी भयभीत करून देखील मला स्त्रीचा सन्मान सारा प्रदान केलारावणाच्या त्या अनुयायी तर होत्याचपरंतू माझ्यासाठी मातेसमान होत्या. राम जर आले असते तर मी भेटवलं असतं त्यांनाया अशोकांच्या वृक्षांशीया माधवीच्या वेलींशीज्यांनी माझ्या अश्रुंनाजपलंय दवबिंदूसम आपल्या देहावरपण राम तर राजा आहेतते कसे येतील सीतेला नेण्यास?बिभिषण करवतात सीतेचा शृंगारआणि पाठवतात पालखीत बसवूनी रामांच्या भुवनी.पालखीत बसलेली सीता करते विचार, जनकाने ही तिला असाच तर निरोप दिला होता!'तिथेच थांबवा पालखी',गुंजती रामांचे स्वरयेऊ द्या पायी चालत सीतेला, मज समीपजमिनीवरून चालताना थरकापते वैदेहीकाय पाहू इच्छित होते मर्यादा पुरुषोत्तम, कारावासात राहून देखील चालणं विसरतात का स्त्रिया?अपमान आणि उपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली सीताविसरून जाते पतीमिलनाचा उत्साहउभी राहते एखाद्या युद्धबंद्यासम!कुठाराघात करतात राम - सीते, कोण असेल तो पुरुषजो वर्षभर परपुरुषाच्या घरी राहिलेल्या स्त्रीचा स्वीकार करेल?मी तुला मुक्त करतोय, जिथे जायचेय तिथे तू जाऊ शकतेस. त्याने तुला कवेत घेऊन उचललंआणि मृत्यूपर्यंत तुला पाहत जगला. माझं दायित्व होतं तुला मुक्त करण्याचंमात्र आता स्वीकारु शकत नाहीत तुला पत्नीसारखं! वाल्मिकींचे नायक तर राम होतेते का बरे लिहितील, सीतेचे रुदनआणि तिची मनोवस्था?त्या क्षणांत सीतेने काय नि किती विचार केले असतीलकी, हे तेच पुरुष आहेत काज्यांना मी वरले होते स्वयंवरी,हे तेच पुरुष आहेत का ज्यांच्या प्रेमाखातर महाल अयोध्येचा त्यागला होता मीआणि भटकले होते वनोवनी! होय, रावणाने मला बाहूंत घेतलेले होय, रावणाने मला प्रेमाचा प्रस्ताव दिलेलातो राजा होता, इच्छा असती तर बलपूर्वक नेलं असतं आपल्या घरीपण रावण पुरुष होतात्याने केला नाही माझ्या स्त्रीत्वाचा अपमान कधीभलेही मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवलं नसेल त्याला इतिहासात! हे सर्व वाल्मिकी सांगू शकले नसतेकारण त्यांना तर रामकथा सांगायची होती!पुढची कथा तुम्ही जाणताच, सीतेने दिली अग्निपरीक्षा. कवीला होती घाई लवकर कथा संपवण्याचीपरतले अयोध्येस राम, सीता आणि लक्ष्मण नगरवासियांनी केली साजरी दीपावलीज्यात सामील झाले नाहीत नगरातले धोबी. आज दसऱ्याच्या या रात्रीस मी उदास आहे त्या रावणासाठी, ज्याची मर्यादा कुण्या मर्यादा पुरुषोत्तमाहून कमी नव्हतीमी उदास आहे कवी वाल्मिकींसाठी, जे रामाच्या जोडीने सीतेचे मनोभाव लिहू शकले नाहीतआज या दसऱ्याच्या रात्रीस मी उदास आहे स्त्रीच्या अस्मितेसाठीत्याचं शाश्वत प्रतीक असणाऱ्या जानकीसाठी!... ****** ***** **** विख्यात कवी राजेश्वर वसिष्ठ यांनी लिहिलेल्या 'जानकी के लिए' या गाजलेल्या हिंदी कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे. 'जानकी के लिए' या कवितेतून त्यांनी जी मांडणी केली आहे ती भेदक तर आहेच शिवाय प्रतिकांच्या उदात्तीकरणास आणि खलनायकाच्या व्याख्येस आव्हान देणारी आहे. आत्मचिंतन केलं तर यातला गर्भित अर्थ सहजी समोर येतो. ही कविता स्त्रीच्या अस्मितेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते आणि एक नवा दृष्टिकोन बहाल करते. अत्यंत मृदु नि नितळ लाघवी शब्दरचना असल्याने मनाचा वेध घेते. यातला आशय आणि रचनाशैली मनाला भावली.हा अनुवाद समग्र सीतांचरणी समर्पित.. - समीर गायकवाड