चंद्राची महादशा - अंतर्दशा आणि पत्रिकेतील निर्बली चंद्र यासाठी प्रभावी उपाय

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

 ज्यांच्या पत्रिकेत चंद्र पापग्रहांच्या युतीमुळे, योगामुळे किंवा दृष्टीमुळे कमकुवत आहे अशा सगळ्या लोकांसाठी एक अतिशय लवकर फळाला येणार उपाय इथे देत आहे. चंद्र-राहू, चंद्र-केतू, चंद्र-शनी, चंद्र-मंगळ किंवा चंद्र-रवी यांच्यामुळे बऱ्याचदा लोकांना प्रचंड मानसिक त्रासातून जावं लागतं. मानसिक आरोग्य बिघडवण्यासाठी हे योग नेहमीच कारणीभूत ठरतात. मनोरुग्ण असलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत तर चंद्र खूप जास्त बिघडलेला असतो. नैराश्य, मानसिक ताण, भीती, दडपण, घाबरटपणा, कशातही मन न रमणे, विरक्ती, वैराग्य, टोकाचा विचार करून थरथरणे, अनावश्यक विचार, नकारात्मक विचार, भास होणे, भीतीदायक स्वप्नं पडणे, अशा प्रकारांपासून ते फिट्स येणे, स्क्रिझोफेनिया, एपिलेप्सी, सारखे गंभीर मानसिक आजारांपर्यंत, सगळ्या प्रकारांना पत्रिकेतील बिघडलेला चंद्र जबाबदार असतो. अर्थात तो एकटाच जबाबदार नसतो. बाकीचे ग्रह त्यांच्या दृष्टी, त्यांचे आपापसात होणारे योग हे सुद्धा जबाबदार असतात. त्यामुळे संपूर्ण पत्रिका बघितल्यावरच कळेल कि नेमक्या कशामुळे अमुक एक आजार झालेला आहे, किती काळ तो अजून राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आजारातून मुक्तता कधी होईल. पण हि पोस्ट त्या आजारांविषयी नाही. हि पोस्ट अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या पत्रिकेत चंद्र बिघडलेला आहे.  त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात काही मनस्ताप होत असेल, वर नमूद केलेल्यापैकी कुठल्या मानसिक त्रासातून जात असाल, तर हि पोस्ट नक्की वाचा. लहानपणापासून आपण बऱ्याचशा गोष्टी घरातल्या वडिलधाऱ्यांकडून ऐकत आलेलो असतो. हे कर, ते करू नको. असं वाग, तसं वागू नको. रामरक्षा म्हण, वगैरे. लहानपणी आपण ते सगळं निमूटपणे ऐकतो, पण नंतर मोठं झाल्यावर (किंवा शिंगं फुटल्यावर म्हणा हवं तर) हळूहळू ते सगळं सोडून देतो.  आपल्या ऋषीमुनींनी स्तोत्रं, मंत्रांच्या रूपाने जे काही आपल्यासाठी ठेवलंय त्याकडे दुर्लक्ष करत राहतो.  असाच एक दिसायला अत्यंत साधा व सोपा पण प्रचंड महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे गणपती अथर्वशीर्ष !"गणेश" म्हणजे गणांचा ईश. असा अर्थ साधारणपणे लोक घेतात. पण प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये त्याचा अजून एक अर्थ दिला आहे तो असा: "ग" म्हणजे आपली पंचेंद्रिये, "ण" म्हणजे जागरूक असणे, अवसान असणे, आणि "ईश" म्हणजे यांचा अधिपती. म्हणजेच "गणेश" याचा अर्थ आपली पंचेंद्रिये जागरूक करणारा देव. त्याचप्रमाणे  :"शीर्ष" म्हणजे डोके, मस्तक. "थर्व" म्हणजे चंचलता व अस्थिरपणा, आणि "अ" म्हणजे नसणे. म्हणजेच "अथर्वशीर्ष" म्हणजे:  डोक्याची (मेंदूची व मनाची) चंचलता व अस्थिरता नष्ट करणारे असे स्तोत्र. त्यामुळे मेंदूचे व मानसिक अशा सगळ्या आजारावर गणपती अथर्वशीर्ष हा एक उत्तम उपाय आहे. ज्यांच्या पत्रिकेत चंद्र बिघडला आहे,  व ज्यांना चंद्राची महादशा किंवा अंतर्दशा सुरु आहे. अशा सगळ्या लोकांनी रोज किमान एकदा तरी मोठ्याने अथर्वशीर्ष म्हणावे. मनातल्या मनात म्हणू नये. उच्चारातून जी कंपने निर्माण होतात ती आपल्याला हवी आहेत. तुमच्याकडे जर कुणी मानसिक रोगाने त्रस्त व्यक्ती असेल तर त्यांच्याजवळ बसून देखील तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता जेणेकरून त्या कंपनांचा त्यांना फायदा होईल. आजार गंभीर असेल तर कृपया पत्रिका दाखवल्याशिवाय परस्पर उपाय करू नये. ज्या ज्या क्लायंट्सना  हा उपाय दिलेला आहे. त्या सगळ्यांचे अनुभव अतिशय सुंदर आलेले आहेत. तुम्हीसुद्धा महिनाभर म्हणून स्वतः अनुभव घ्या. प्रत्येक आजारावर संस्कृतातील अर्थपूर्ण स्तोत्र, श्लोक, मंत्र याचा खूप प्रभावी वापर होताना दिसतो. (मी म्हणत नाही कि डॉक्टरकडे जाऊ नका म्हणून. ते उपाय चालूच ठेवा. पण त्याच्या जोडीला हेदेखील करा.) विशेष करून परदेशात संस्कृत विषयी लोकांना खूप आदर आहे. तिथून येणारे भारतीय व अभारतीय क्लायंट्स देखील मंत्र-स्तोत्र-श्लोक यांच्यासाठी खूप विचारणा करतात. या गोष्टी अर्थ समजून घेऊन म्हटल्या कि त्याचा जो काही फायदा होतो त्याला मर्यादा नाही.  तुम्हाला देखील जर कुठल्या आजाराबाबत पत्रिका दाखवायची असल्यास इथे संपर्क करा.   
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!