घटस्फोट आणि अनैतिक संबंध वास्तू-ज्योतिषानुसार ओळखायचे कसे? सविस्तर मार्गदर्शन

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

तुम्हा दोघांमध्ये काही बिनसल्यासारखं वाटतंय का? वागण्यात काही बदल जाणवतोय? तुमच्या जोडीदाराचे बाहेर कुणाशी प्रेमप्रकरण चालू आहे का हे जाणून घ्यायचंय का? तुमहाला असं वाटतंय का कि तुमच्या वैवाहिक जीवनातील मजा आता निघून गेली आहे?   कि तुम्हाला स्वतःलाच कुणाबरोबर तरी प्रेम प्रेमकरं करावंसं वाटतंय?हे असं का होतंय माहिती आहे? तुमच्या घरामुळे...मी मागे एकदा एका पोस्टमध्ये म्हणालो होतो, कि तुमचं घर तुम्हाला काहीतरी सांगत असतं, तुम्हाला ते ऐकता आलं पाहिजे.  म्हणजे काय ते बघूया...घटस्फोटाचे अचंबित करणारे कारण तुमचा लग्न झालंय आणि तुम्ही दोघं तुमच्या घराच्या ईशान्येला झोपत असाल तर तुमच्या घटस्फोट होण्याची शक्यता वाढते. कारण माहिती आहे?कारण ईशान्य हि देवाची आणि अध्यात्माची दिशा आहे. गुरु हा त्या दिशेचा स्वामी आहे. तेव्हा तिथे देवघर किंवा ध्यानकेंद्र  असायला हवंय, बेडरूम नाही. आणि समजा असलीच बेडरूम, तर तिथे आजी आजोबा किंवा लहान मुलांची खोली असायला हवी. विवाहित जोडप्यांनी या दिशेला कधीही झोपू नये. विवाहित जोडप्यांसाठी सर्वात आदर्श बेडरूम हि नैऋत्येला असावी.तुम्ही जर ईशान्येला झोपलात, तर ती अध्यात्मिक दिशा असल्यामुळे तुमच्या मनात हळूहळू वैराग्य निर्माण होईल. वैवाहिक आयुष्यात आणि बेडरूम मधल्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमणार नाही. लैंगिक आकर्षण निघून जाईल. एकमेकांशी वाद होतील. लग्न करून पश्चाताप केल्याची भावना निर्माण होईल आणि शेवटी पर्यायाने घटस्फोट होईल.    जे जे लोक संसार-घरदार सोडून संन्यास घेतात, त्यांच्या घरात या तत्त्वाला बळ देणारा ईशान्येचा वास्तुदोष असतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल कि तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी आकर्षण वाटण बंद झालंय किंवा तुमच्या जोडीदाराला तुमच्या विषयी आकर्षण  वाटण बंद झालंय तर तुमच्या घरातील ईशान्य दिशा त्याला कारणीभूत आहे.  तो दोष जागृत होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे झोपणे. तेव्हा तिथे जर झोपत असाल, तर आजपासून बंद करा. आणि तिथे झोपत नसाल आणि तरी आकर्षण कमी झालं असेल, तर मग तिथे इतर काही दोष निर्माण झाले असतील, त्याचा अभ्यास करावा लागेल.अनैतिक संबंध, विश्वासघात, एकटेपणा, आणि  घर सोडून जाणे   वर नमूद केलेल्या ईशान्येच्या दोषाला जोडून आणखी एक दोष घरात असतो तो म्हणजे वायव्येच्या दोष. वायव्येच्या दोष म्हणजे इथे जर पाण्याचा साठा असेल, किचन असेल, किंवा या दिशेला जर कट असेल, तर मग अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, विश्वासघात, या गोष्टी घडतात. घरातील एखादी व्यक्ती (साधारणपणे पुरुष) या संबंधांना कंटाळून घर सोडून निघून जातात. वायव्य दिशा वायू तत्त्वाची कारक आहे. त्यामुळे तिथले वायुतत्त्व बिघडले, तर असे टोकाचे परिणाम बघायला मिळतात. या दिशेचा स्वामी चंद्र आहे जो मनाचा कारक आहे त्यामुळे इथे जर दोष निर्माण झाला तर मनावर ताबा रहात नाही त्या घरातील व्यक्ती वाटेल त्या थराला जाऊ शकतात मागे एका केसमध्ये तर एका व्यक्तीची पत्नी ड्रायव्हर बरोबर पळून गेलेली, आणि ती व्यक्ती स्वतः शेजारणीबरोबर अनैतिक संबंध ठेवून होती.त्यामुळे जेव्हा जेव्हा माझ्याकडे अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, किंवा घटस्फोटाच्या केसेस येतात, सगळ्यात आधी मी त्यांच्या घरातील या दोन दिशांचा अभ्यास करतो.  १० पैकी ८ घरात हेच दोष सापडतात.  या दोन दोषांमध्ये भर म्हणून इतर दिशांचे दोष जसजसे वाढत जातात तसतसे गंभीर परिणाम दिसून येतात. विकृत अत्याचार, हत्या, आत्महत्या, किंवा यापेक्षा भयंकर काहीतरी. हे वास्तुदोष जन्मकुंडली पाहून सुद्धा कळतात. ज्योतिषानुसार सप्तम स्थान लग्नाचे आहे. त्याचा ६ व्या किंवा १२ व्या स्थानाशी वाईट संबंध आला किंवा सप्तमेशाचा षष्ठेशाशी आणि व्ययेशाची संबंध आला, शनि किंवा राहू-केतू ची दृष्टी त्याच्यावर असेल, पत्रिकेत चंद्र आणि शुक्र निर्बलीअसतील, आणि या सगळ्यांपैकी सर्वात वाईट योगात असलेल्या ग्रहाची जर महादशा सुरु असेल तर घटस्फोट निश्चितपणे होतो.  सारासारविचार करण्याची क्षमता गमवायला लावणारा निर्बली चंद्र, बलवान मंगळ, दूषित शुक्र आणि बुध हे अनैतिक व विवाहबाह्य संबंध दाखवणारे ग्रह आहेत. त्यांचे विविध योग व दृष्टी या घटना त्यांच्या भ्रमणानुसार घडवून आणतात. थोडी जरी शंका आली तरी वेळीच जर कुंडली दाखवून घेतलीत तर प्रकरण हाताबाहेर जाण्यापासून वाचू शकतं व गंभीर घटना टळू शकते. तेव्हा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीत कुणी घटस्फोटाचा विचार करत असेल, किंवा त्यांना जर त्यांच्या जोडीदाराविषयी संशय असेल, तर त्यांची पत्रिका एकदा दाखवून घ्या. त्यासाठी इथे संपर्क करा 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!