गूढ योग मुद्रा शिका: नकारात्मक शक्तींपासून संरक्षण, अध्यात्मिक प्रगती, आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी
By vedicjyotish on धार्मिक from https://vedicjyotishmail.blogspot.com
ईश्वराशी व अध्यात्मिक ऊर्जेशी संवाद साधण्याचा व मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा राजमार्ग गूढ योग मुद्रा कोर्सआतापर्यंत तुम्ही शिकलेल्या कोर्सेसपेक्षा थोडा वेगळा असलेला हा कोर्स आहे. हा देखील नेहमीप्रमाणे ऑनलाईन कोर्स आहे. ईमेलद्वारे सगळे धडे पाठवले जातील. यात पंचतत्त्वांच्या मुद्रा, देवतांच्या मुद्रा, मनाच्या मुद्रा, अशा विविध प्रकारच्या एकूण २४ मुद्रा शिकवल्या जातील. योग मुद्रा का शिकाव्यात? योग मुद्रा या आपल्याला ईश्वराशी व अध्यात्मिक विश्वातील ऊर्जेशी संवाद घडवून आणण्यास मदत करतात.ज्याप्रकारे चेहऱ्यावरच्या हावभावांद्वारे आपण आपल्या भावना व विचार व्यक्त करू शकतो, अगदी त्याचप्रकारे या हस्त मुद्रांच्या माध्यमातून आपण त्या वैश्विक ऊर्जेशी संवाद साधत असतो. मनात येणारे सगळेच विचार आणि गुंतागुंतीच्या भावना आपण शब्दांत व्यक्त करू शकत नाही. विचित्र विचारांमुळे व नानाविध शंकांमुळे मनाची काय अवस्था होते हे ज्याचं त्याला चांगलंच माहिती आहे. तर अशा सगळ्या प्रकारच्या नियंत्रणाबाहेर वाटणाऱ्या भावना आणि विचार यांची उत्तरे मिळवण्यासाठी, आध्यत्मिक विकासासाठी, नकारात्मक शक्तींपासून आपले रक्षण करण्यासाठी, आणि उच्चपातळीवरील संवादासाठी या योग मुद्रा आपल्याला मदत करतात. म्हणून प्रत्येकाने योग मुद्रा शिकाव्यात. आपल्याकडे प्राचीन काळापासून विविध मुद्रांद्वारे शरीरातील प्राणवायू हवा तसा हवा त्या भागात फिरवता येणारे सिद्ध योगीपुरुष होऊन गेले. देवाकडे प्रार्थना करताना आजही विविध मुद्रांचा वापर केला जातो. तुमच्या घरी पोथी-पुराणाचे पारायण किंवा पठण करायला आलेले गुरुजी सुद्धा आधी योग्य प्रकारच्या संरक्षक मुद्रांद्वारे स्वतः भोवती कवच करून घेतात आणि मग वाचनाला सुरवात करतात. गायत्री मंत्राची उपासना असो किंवा इतर कुठल्या प्रकारची उपासना, सात्त्विक मार्ग असो व वाममार्गाने जाणारी, सगळ्या उपासना पद्धतीत आपल्याला संप्रदायाप्रमाणे व गुरुच्या शिकवणीनुसार विविध मुद्रा दिलेल्या असतात. अगदी नृत्य, शिल्प आणि अभिनय कलेत सुद्धा विविध मुद्रांचा वापर केला आढळतो. शरीरातील नाड्या, सप्तचक्रे, उपचक्रे, प्राणवायू, पंचतत्त्व आणि अध्यात्मिक ऊर्जा या सगळ्या गोष्टी एकाच प्रकारे सध्या होणारे माध्यम म्हणजे योग मुद्रा. तेव्हा मुद्रांच्या माध्यमातून होणार संवाद हा सर्वव्यापी आणि वैश्विक आहे. मनातील नकारात्मक विचार काढून टाकणारी क्षेपण मुद्रा असो किंवा आयुष्यातील अडचणी व संकटे काढून टाकणारी गणपती मुद्रा असो, भीती घालवणारी काली मुद्रा असो किंवा आत्मविश्वास व उत्साह वाढवणारी मुद्रा असो, खंबीरपणा देणारी भैरव मुद्रा असो, मानसिक तणाव घालवणारी विष्णू मुद्रा असो, ध्यानापासून मोक्षापर्यंत सर्वकाही या मुद्रा साध्य करून देतात.बंदिस्त मंत्र, स्तोत्र व गूढ ज्ञान प्राचीन काळी मंत्र, स्तोत्र व इतर दैवी ज्ञानाचे दैत्य-दानवांपासून सरंक्षण व्हावे म्हणून ऋषीमुनी या सगळ्या मंत्रांना एका विशिष्ट योग मुद्रेने बंदिस्त करून ठेवायचे. ती योग मुद्रा तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळेल. हि मुद्रा माहित असलेली व्यक्ती या मुद्रेच्या आणि सोबतच्या मंत्राच्या साहाय्यानेच तो मंत्र किंवा स्तोत्र सिद्ध करू शकत असे. इतर कुणी त्या मंत्राचा कितीही जप केला किंवा स्तोत्राचे कितीही पठण केले तरी त्यांना त्याचे काहीही फळ मिळत नसे.म्हणूनच आजही आपल्याला उपलब्ध असलेले अनेक मंत्र व स्तोत्र हे प्राचीन काळापासून विविध प्रकारे बंदिस्त करून ठेवलेले असल्यामुळे फलद्रुप होताना दिसत नाहीत. तर अशी प्रभावी मुद्रा तुम्ही या कोर्स मध्ये शिकून तुम्ही स्वतः तयार केले गूढ ज्ञान अशा प्रकारे बंदिस्त करून ठेऊ शकता. किंवा तुम्हाला जर कुणी अध्यात्मिक गुरु असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जुने मंत्र व स्तोत्र या मुद्रेने कशाप्रकारे उघडतात याचा अभ्यास करू शकता. [ टीप : तुम्ही जर स्वतः ज्योतिषी, वास्तुविशारद, अंकशास्त्र, रेकी हिलर, टॅरो रीडर, किंवा इतर प्रकारचे अध्यात्मिक व्यक्ती असाल तर तुम्हाला तशाप्रकारची वेगळी विशेष प्रशिक्षणाची दीक्षा मिळेल. ज्यामुळे तुम्ही इतरांना या योग मुद्रा शिकवू शकाल. कोर्सला प्रवेश घेते वेळी तसे नमूद करा. ] कोर्सची फी व अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा.