"गावगाड्यातले माईलस्टोन"

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की 'गावगाड्यातले माईलस्टोन' हे आपलं पुस्तक प्रकाशित झालय. शेता- मातीत राबणाऱ्या गावगाड्यातल्या आपल्या माणसा सारखंच ते साधं-सुधं असेल. पण यातली माणसं तुम्हाला नक्की आवडतील. नव्हे ती तुम्हाला झोपू देणार नाहीत. मग तुम्ही कितीही क्रूर असा, काळजावर दगड ठेवणारे असा, कारण गेली कित्येक वर्षे ही माणसं मलाच स्वस्थ झोपू देत नव्हती, मी जर ही माणसं पुस्तकात रेखाटली नसती तर ती भूत होऊन माझ्या मागे लागली असती. या माणसांची सुख-दुःखे तुमच्या डोक्यात शिरून त्यातील मेंदूला विचार करायला भाग पाडतील. या पुस्तकाला भलेही रेखाचित्रे नसतील, पण वाचताना ही माणसंच साक्षात तुमच्या डोळ्यांपुढं रेखाचित्रे बनून उभी राहतील.या पुस्तकात तुम्हाला दिवस उगवायला साऱ्या गावाच्या म्हशींवर रेडा सोडणारी खमकी सोनाबाई भेटेल. गावच्या बायका रंडक्या करून त्यांना नासवून पुढच्या पिढ्याही बरबाद करणारा रंगेल राजारामबापू भेटेल. चुलीतल्या रताळागत भाजलेल्या शेवंतीला चादरीत गुंडाळून तालुक्याच्या दवाखान्यात बैलगाडी घेऊन सुसाट निघालेला नामा बापू भेटेल. आयुष्यभर तमाशाच्या कलेला वाहून घेऊन साऱ्या जन्माचाच तमाशा करून घेतलेला मातंग वस्तीतला जगन्या भेटेल. तसेच नवरा सोडून देऊन आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेली रत्नप्रभाही भेटेल. कोयत्यानं कचा-कच इथल्या व्यवस्थेचंच पाय तोडणारी विधवा झालेली यल्लम्मा हातात कोयता घेऊन तुमच्या समोर येईल. एवढंच नाही तर डोक्यावर बांधलेल्या मंडवळ्या सुटायच्या आधीच मिलिट्रीतला नवरा मेल्यावर नुसत्या त्याच्या आठवणींवर म्हातारपणापर्यंत सत्तर वर्षे गर्भाशय जिवंत ठेवून गावगाड्यात नांदलेली हौसाआक्का तुमचं काळीज चिरत जाईल. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तेवीस माणसांच्या जीवघेण्या गोष्टी या एकाच पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील.हे शेवटच्या जुन्या पिढीतले माईलस्टोन आपण जरूर वाचावेत. आपल्या मित्र मैत्रिणींनाही हे पुस्तक भेट देऊन आपल्या नव्या पिढ्याना या पुस्तकाच्या रूपाने शेता- मातीत गाडून घेतलेल्या माणसांची ओळख करून द्यावी. पुस्तक विकत घेऊन ते संपूर्ण वाचा. तुमच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि हो पुस्तक वाचल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की या पुस्तकावर खर्च केलेले आपले पैसे फुकट गेले, तरीही आवश्य कळवा. आपण 1. Notionpress Store, 2. Amazon store, 3. Flipkart store या तिन्ही स्टोअरवरून पुस्तक ऑनलाईन खरेदी करू शकता. नोशनप्रेस स्टोअरवरून तुम्हाला कोरोनामुळे पुस्तक हातात येण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी दिसेल पण प्रत्यक्षात चार-पाच दिवसात पुस्तक तुमच्या हातात येईल. व पॅकिंगची चांगली कॉलिटी येथे मिळेल.संग्रहाची मूळ किंमत : रु. 200/- + 50 टपाल खर्चासहित आहे.(जास्त प्रती मागविल्यास टपाल खर्च सवलत) (तसेच Amazon, Flipkart मेंबरशिप असल्यास टपालखर्च फ्री असू शकतो)1. Notionpress Storehttps://notionpress.com/read/gaavgadyatle-milestone2. Amazon storehttps://www.amazon.in/.../ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc...3. Flipkart storehttps://dl.flipkart.com/s/_CNPSsNNNN © ज्ञानदेव पोळ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!