कोरोनावर लस बनविल्याचा इस्राईलचा दावा : लवकरच पेटंट घेणार
By marathimann001 on तंत्रज्ञान from https://marathi-mann.blogspot.com
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. यावर अजूनतरी कोणतेही औषध बनविण्यात यश आले नाही. मात्र या विषाणूंवर लस बनवल्याचा दावा इस्राईलचे सुरक्षा मंत्री नफताली बेन्नेट यांनी केला आहे. इस्राईल मधील डिफेंस बायोलॉजिकल इंस्टीट्यूट यांनी या विषाणूवरील लस संशोधन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.