कोंकण - हर्णे आणि केशवराज मंदिर
By bhagwatblog on भटकंती | निसर्ग from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
काही प्रवास अचानक ठरतात. दोन आठवड्याखाली कोकणात जाण्याचा असाच योग आला. बऱ्याच दिवसांनी मित्र भेटला. दुसऱ्या मित्राच्या नातेवाईकाची कार प्रवासासाठी सज्ज झाली. ताम्हिणी घाटातून प्रवास योजला होता. मित्र ड्राइविंग सीट वर होता. ताम्हिणी घाटातून जाताना मन खुप प्रसन्न होत होते. मोकळा रस्ता.. बाजूला हिरवागार निसर्ग... ओळीनी जाणारे सायकल स्वार... मध्येच वाहणारे लहान-मोठे धबधबे, वर्षा विहारासाठी निघालेली कुटुंब... मित्र मैत्रिणी... वाटेत कोणी निसर्गाचा आस्वाद घेतोय... कोणी चहाचा... कोणी जेवणाचा... गप्पांचा आस्वाद... धबधब्या मध्ये एकमेक वर पाणी उडवून मैत्रीचा आस्वाद..