कालसर्प योग आणि त्यावरचे सोपे उपाय जे याआधी तुम्ही कधीही ऐकले नसतील

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

कालसर्प योग: तुमच्या बाजूने फासे पडून डाव जिंकून देणारा योग  कालसर्प दोषाची शांती करूनही काहीही फरक पडलेला नाही, अशी अनेक मंडळी ईमेल करून सतत विचारत असतात कि आतापर्यंत ३-४ वेळा वेगवेगळ्या प्रकारे माझी कालसर्प योगाची शांती करून झाली आहे. आणि तरी मी त्रासात आहे, तर मी काय करू?  अशा सगळ्या लोकांसाठी आणि तसंच, ज्यांनी काळसर्प दोष हे नावच आता पहिल्यांदा ऐकलंय अशांसाठी सुद्धा ही पोस्ट आहे. कृपया लक्ष देऊन वाचा. कालसर्प योग शांतीचा फरक पडत नाही कारण लोक सरसकट एकाच प्रकारची कालसर्पयोगाची शांती करतात.कालसर्प योगाचे १२ प्रकार आहेत. तुमच्या पत्रिकेत त्यापैकी नेमका कुठला कालसर्पयोग आहे हे बघून त्याप्रकारचे उपाय करावे लागतात. तुमच्या पत्रिकेत राहू आणि केतू कुठल्या भावात स्थित आहेत, यावरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा कालसर्प योग आहे हे समजतं.  कालसर्प योग म्हणजे काय ?सगळ्यात आधी काळसर्प योग म्हणजे काय ते समजून घेऊया. जन्मपत्रिकेत महत्त्वाचे जे ७ ग्रह आहेत (रवी, चंद्र, बुध, मंगळ, गुरु, शुक्र, शनि ) ते जेव्हा राहू आणि केतू यांच्या मध्ये येतात. तेव्हा त्या पत्रिकेत कालसर्प योग आहे, असं म्हणतात. कालसर्पयोगाचे एकूण १२ प्रकार आहेत, ते पुढीलप्रमाणे : प्रथम स्थानात राहू आणि सप्तम स्थानात केतू असेल तर त्याला "अनंत कालसर्पयोग" असं म्हणतात. द्वितीय स्थानात राहू आणि अष्टम स्थानात केतू असेल तर त्याला "कुळिक कालसर्पयोग" असं म्हणतात. तृतीय स्थानात राहू आणि नवम स्थानात केतू असेल तर त्याला "वासुकी कालसर्पयोग" असं म्हणतात. चतुर्थ स्थानात राहू आणि दशम स्थानात केतू असेल तर त्याला "शंखपाल कालसर्पयोग" असं म्हणतात. पंचम स्थानात राहू आणि एकादश स्थानात केतू असेल तर त्याला "पद्म कालसर्पयोग" असं म्हणतात. षष्ठ स्थानात राहू आणि द्वादश स्थानात केतू असेल तर त्याला "महापद्म कालसर्पयोग" असं म्हणतात. सप्तम स्थानात राहू आणि प्रथम स्थानात केतू असेल तर त्याला "तक्षक कालसर्पयोग" असं म्हणतात. अष्टम स्थानात राहू आणि द्वितीय स्थानात केतू असेल तर त्याला "कर्कोटक कालसर्पयोग" असं म्हणतात. नवम स्थानात राहू आणि तृतीय स्थानात केतू असेल तर त्याला "शंखनाद कालसर्पयोग" असं म्हणतात. दशम स्थानात राहू आणि चतुर्थ स्थानात केतू असेल तर त्याला "घातक कालसर्पयोग" असं म्हणतात. एकादश स्थानात राहू आणि पंचम स्थानात केतू असेल तर त्याला "विषधर कालसर्पयोग" असं म्हणतात. द्वादश स्थानात राहू आणि षष्ठ स्थानात केतू असेल तर त्याला "शेषनाग कालसर्पयोग" असं म्हणतात. कालसर्प योगावर सोपा उपाय : आपल्या पत्रिकेत राहू हा आपल्या आईचे आई-वडील आणि केतू हा आपल्या वडिलांचे आई-वडील यांचा कारक आहे. त्यामुळे तुम्ही या मंडळींशी व्यवस्थित वागलात, वेळोवेळी त्यांची विचारपूस केलीत, त्यांची काळजी घेतलीत तर काळसर्प योगाचा त्रास कमी होतो.  ते जर वारले असतील तरी हात जोडून डोळे बंद करून रोज एकदा त्यांचं स्मरण केलंत आणि त्यांच्या आत्माच्या शांतीसाठी व सद्गतीसाठी प्रार्थना केलीत तरी खूप फरक जाणवेल. सव्य कालसर्पदोष आणि अपसव्य कालसर्पदोष:  वेगळी दिशा देणारे योग तुमच्या पत्रिकेतील ग्रह जर राहूपासून केतुकडे जात असतील तर त्यांना "सव्य कालसर्पदोष" असं म्हणतात. तसं जर तुमच्या पत्रिकेत असेल तर याचा अर्थ जे ग्रह केतूच्या तावडीत सापडले आहेत त्यांच्यावर केतूचा प्रभाव असतो. ही फारशी चांगली गोष्ट नाही. कारण केतू मोक्ष कारक ग्रह आहे. त्याला पैसा, प्रसिद्धी, लग्न, मुलं, करियर, यश, मान-सन्मान, प्रतिष्ठा, भौतिक सुख, यांमध्ये काडीचाही रस नाही. त्यामुळे केतू जर पत्रिकेत बलवान असेल तर हे सगळं मिळवण्यात तो अडथळे निर्माण करतो. आणि तुमच्या पत्रिकेतील जर ग्रह केतू पासून राहू कडे जात असतील तर त्यांना "अपसव्य कालसर्पदोष" म्हणतात. तसं जर तुमच्या पत्रिकेत असेल तर याचा अर्थ जे ग्रह राहूच्या तावडीत सापडले आहेत त्यांच्यावर राहूचा प्रभाव असतो. हि उत्तम गोष्ट आहे. कारण राहू म्हणजे पूर्णपणे भौतिक सुखाच्या आहारी गेलेला ग्रह आहे. विलासी आयुष्य, झगमगाट, जुगार, अमाप पैसा, प्रचंड यश, मान-सन्मान, मोठमोठी पदे, वगैरे सगळ्या प्रकारचं भौतिक सुख तो देतो. राहू जर पत्रिकेत कमकुवत असेल तर मात्र हे सगळं मिळवण्यात अडथळे निर्माण होतात. तर अशाप्रकारे दोन्ही प्रकारचे कालसर्पदोष शुभ आणि अशुभ फळे देऊ शकतात. आता तुमच्या पत्रिकेत यापैकी काय आहे? सव्य काळसर्प कि अपसव्य काळसर्प?   पत्रिका दाखवून मार्गदर्शन घेण्यासाठी ईच्छुक असाल तर इथे संपर्क करा    
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!