काकड आरती- गोंदवलेकर महाराज

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

.देवाचिये द्वारी, उभा क्षणभरीतेणे मुक्ती चारी साधिलिया !!.ज्ञानेश्वर माऊलींच्या हरीपाठाची सुरवातच या ओवीने आहे. परिस्थितीने  तो ' क्षण ' मात्र आज हिराऊन घेतलाय. सरकारने नवीन 'अनलाँक दान ' जाहीर केले असले तरी अजूनही  ज्या क्षणासाठी भाविक / भक्त उत्सुक असतो म्हणजेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे याबद्दल मात्र अजूनही उल्लेख नाही. या सगळ्या भावनेतूनच मध्यंतरी गोंदवल्याला' काकड आरतीला' जायची इच्छा व्यक्त करणारे मनोगत   लिहिले होते. शनिवारी आँफीस मधून निघायचे, मुक्कामाला गोंदवले आणि रविवारी पहाटेची आरती असा पुर्वी एकदा घडलेला कार्यक्रम परत घडावा अशी इच्छा व्यक्त केली होती.गुरु / परमेश्वर/ माऊली तुमच्या मनातील इच्छा केंव्हा आणि कशा पध्दतीने पूर्ण करेल हे सांगता येत नाही.जायला मिळालं गोंदवल्याला ?  नाही, मग? तर आज वैशाख कृष्ण एकादशीला म्हणजेच ६ जूनला गोंदवलेकर महाराजांची काकड आरती झुम अँप द्वारे अनुभवण्याचा एक आगळावेगळा योग आला.  *ते ही रविवारीच*श्री अनंत लेले आणि इतर काही जण दर एकादशीला हा उपक्रम करतात. आपल्या घरीच केलेली ही 'काकड आरती',  झुम अँप द्वारे अनेकांना उपलब्ध करुन देऊन एक आगळी वेगळी सेवा ते देत आहेत.यात मला आज सहभागी होता आले हे माझे भाग्य. याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद, खूप छान पद्धतीने  हा  धार्मिक सोहळा सादर केला गेला. सर्वांनी खूप छान भक्ती गीते सादर केली.????दर एकादशीला अशी झुम अँप द्वारे आरती अनुभवता येते हे कळणे, श्री लेलेंशी  संपर्क होणे,  त्यांनी त्यांच्या समुहात समावेश करुन घेणे, ते आज काकड आरतीला उपस्थित राहता  येणे आणि हे इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच दिवसात घडणे  "धन्य ती माऊली ????*काकड आरती ब्रह्मचैतन्य नाथा,स्वामी चैतन्यनाथा**प्रेमानंदे सद्गुरू चरणी,प्रेमानंदे सद्गुरू चरणी, ठेवीला माथा*!!????मनोगत आवरता घेताना परत एक आठवण, "नाम सदा बोलावे घ्यावे " हा सुबोध गुरुंनी सांगितलाच आहे तसा आजच्या परिस्थितीत वैद्यांनी सांगितलेला सुबोध लक्षात असू द्या. कारण अजूनही संकट टळलेले नाही*मास्क' सदा घालावे,**जावे भावे, जनांसि सांगावे |**हाचि सुबोध वैद्यांचा,*' *मास्का' परते न सत्य मानावे!*????#स्वामी माझा पाठीराखा माणगंगा तिरी " ????????#अपरा एकादशी ????६/६/२१#देवा_तुझ्या_द्वारी_आलोwww.kelkaramol.blogspot.com  Loading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!