कर्ज बाजार..........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

कृतिका ऑफिसला जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती. दहा मिनिटं झाली तरी तिला हवी ती बस काही येतच नव्हती. बसच्या नावाने मनातल्या मनात जयजयकार सुरू असतानाच तिचा फोन वाजला. आता मेलं कुणाला सुचलं मला फोन करायला, असं म्हणत तिने फोन उचलला.समोरून विचारणा झाली, Can I talk to miss Krutika? I am Calling from xxx bank. येssस ....... तिने हो बोलताच फोनवरचा म्हणाला, मराठीत कम्फर्टेबल आहात का मॅडम तुम्ही!!एखाद्या बँकेतुन आलेल्या फोनवर अशी विचारणा झाली म्हटल्यावर कृतिकाला जरा जास्तच आनंद झाला. एरवी कुणाला जास्त एंटरटेन न करणाऱ्या तिला याचे किमान दोन तरी शब्द शांतपणे ऐकून घ्यावे वाटले. ती हसत म्हणाली, मराठीतच कम्फर्टेबल आहे बोला.........मॅडम आमची बँक तुम्हाला सर्व प्रकारचे लोन देऊ इच्छिते. आवडेल का तुम्हाला लोन घ्यायला?नाही, मुळीच नाही, कृतिका अगदी ठामपणे म्हणाली.मात्र यावर तो फोनवरचा आश्चर्याने म्हणाला, का हो मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का?कृतिकाला ते ऐकूनच हसायला आलं. बसस्टॉपवर होती तरी भान राहीलं नाही तिला, मोठंमोठ्याने हसत ती म्हणाली, अहो काय विचारताय काय तुम्ही? माझ्या समजुतीप्रमाणे काही प्रॉब्लेम झाला तर लोन घेतात लोकं!!उलट झालंय का आता सगळं?लोन घेणं नॉर्मल आणि लोन न घेणं अँबनॉर्मल झालं का आता? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); तसच म्हणा काहीसं!! गरजा नाहीत का वाढल्यात लोकांच्या? बघितलेली प्रत्येक गोष्ट घ्यावीशी वाटते जवळपास प्रत्येकालाच. आणि बँकांनी नियम पण शिथिल केलेत हो हल्ली. फटकन् अप्रुव्ह होतं लोन तुमचं. तुम्ही फक्त 'हो' म्हणा!!, बोलता बोलताच लोन देऊ करणाऱ्याला उगीचच स्फूर्ती चढली. आणि तो तिने लोन घ्यावं म्हणून आणखी काय काय सांगू लागला. कृतिका अशी सहजासहजी जाळ्यात ओढली जाणारी नव्हतीच. ती म्हणाली, तुम्हाला काय जातंय हो लोन द्यायला. फेडायचं तर आम्हाला आहे ना? जरा एक हप्ता इकडचा तिकडं झाला तर तुम्ही याच फोनवरून आमची ऐशी की तैशी कराल. प्रसंगी घरी येऊन धमकवायला पण मागे पुढे पाहणार नाहीत. आता मार साखरेत घोळल्यासारखं गोड गोड शब्द बाहेर पडतायत तुमच्या तोंडातून, नंतर घरचा दारचा सगळा राग काढायला आम्हालाच बकरा बनवाल.त्याचा विचार आत्ता कशाला मॅडम? बोला कितीचं करायचं अप्रुव्ह? लोन देणारा निर्ढावलेपणाने बोलला. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  तुम्हा लोकांना गप्पा मारायला वेळ असेल भरपूर, मला कामं आहेत. माझी बस आली गुडबाय असं म्हणत कृतिकाने फोन ठेवून दिला.बसमध्ये चढली, अनायसे बसायला जागाही मिळाली. तसे लोन नको म्हटल्यावर प्रॉब्लेम आहे का विचारणाऱ्या त्या बाब्याचं पुन्हा हसू आलं तिला.तिच्या मनात विचारांची गर्दी भरू लागली.एकेकाळी कर्ज घेणं लाजिरवाणी गोष्ट मानली जायची. आई बाबांनी पै पै साठवून वस्तू घेतलेल्या तिने बघितलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तिच्या डोळ्यात अजूनही साठून होता. तरी स्वतःचं घर घेताना बाबाना कर्ज काढावच लागलं होतं, पण कर्जाची रक्कम फिटेपर्यंत त्यांच्या जिवात जीव नव्हता. सतत डोक्यावर डोंगर असल्यासारखं वाटायचं त्यांना. तेव्हा कर्ज देताना पण सहज सोपं काही नव्हतं. होता मंजूर व्हायची नाहीत लोकांची कर्ज!!आणि आता मात्र दिवसातून किमान निरनिराळ्या बँकांचे पाच फोन तरी येतात, कर्ज हवंय का विचारायला! फुक्कटात क्रेडिट कार्ड गळ्यात मारायला.......देणारे एका क्लिकवर लोन देतात, घेणारे हुरळून घेतात. कर्जावर कर्ज काढून स्वतःच साधं सोपं जीवन उगीच अवघड करून घेतात. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); कृतिकाने बघितलं होतं, तिची स्वतःची मैत्रिणीच ह्या चुटकीत कर्ज देणाऱ्यांच्या जाळ्यात अडकून धुळीला मिळाली होती. तीही महत्प्रयासाने दूर राहिली होती या सगळ्यांपासून. मोह तिलाही व्हायचा, पण ती तिच्या बाबांना आठवायची.  अगदी नवऱ्यालाही तंबी देऊन ठेवली होती तिने. त्यालाही वाटायचं आधी क्रेडिट कार्ड म्हणजे प्रेस्टिज आहे, सगळ्या मित्रांच्या खिशात असायचच ते. पण नंतर त्याच मित्रांना क्रेडिट कार्ड होतं म्हणून विनाकारण केलेल्या खर्चाचं बिल भरताना मात्र नाकेनऊ झालेलं पाहिलं, आणि त्याला आपल्या बायकोचं म्हणणं पटलं. कंडक्टरने आवाज दिला तशी कृतिका विचारातून बाहेर आली, आपल्या स्टॉपवर उतरली. ऑफिसमध्ये पोहोचतेच आहे, तोवर दुसरा फोन आला, नंबर न बघताच तिने घाईत कानाला लावला, तर समोरची आवाज टेप करून ठेवलेली बाई, उत्साहाने तिच्या कानात ओरडली , Congratulations!! we have pre-approved personal loan for you!!आज यांचा दिवस आहे वाटतं, म्हणत कृतिकाने झटक्यात फोन बंद केला. बया अशी ओरडली जशी काही मला लॉटरीच लागलीये!! काय मेल्या ट्रिका काढतात एकेक!! व्याजावर व्याज चढवून हे चौपट कमावणार, आणि दाखवतातय असे की आम्ही कर्ज देऊन तुमचं किती भलं करणारे!!त्याच विचारांंत ऑफिसमध्ये शिरली, दर्शनी देवाची मूर्ती शांत हसत होती. कृतिकाने नेहमीप्रमाणे नमस्कारासाठी हात जोडले, अन् कधी काही न मागणारं तिचं मन म्हणालं, देवा, लोकांना या कर्जबाजाराच्या भुलभुलैयात न अडकण्याची सद्बुद्धी दे रे बाबा!!©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!