आमचा 42 वा लग्नवाढदिवस

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

आमचा ४२ वा लग्नवाढदिवस✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी        मे महिन्यात मोसमी पावसासारखा वळवाचा पाऊस बरसला. तापलेली धरती शांत झाली. वरच्या दुधाने सुकलेली झाडे व वेली नी आईच्या दुधाने बाळसे धरले. आमच्या दारी कर्दळीवर लाल, पिवळ्या झुबकेदार फुलांनी हजेरी लावली. कुंडीत वाढलेल्या गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या फुलांनी मन भरून आले. जिन्यावरच्या मोगऱ्याने घरात सुगंधाची उधळण केली अशा रम्य वातावरणात माझ्या दोन्ही लेकी अरमान व यास्मीन आपल्या लेकरांसह उन्हाळी सुट्टीतील माहेरपणासाठी आल्या आणि आमच्या घराचे गोकुळ झाले. रौनक व राहीबला खंदे सवंगडी मिळाले.       अशा या रम्य वातावरणात आमच्या लग्नाचा पंचवीस में हा बेचाळीसावा वाढदिवस आला. आदल्या दिवसापासूनच हीना सूनबाईंची लगबग सुरू झाली. तिने लोणी डोशांचा बेत केला. त्यामुळे आदल्या दिवशी हळदी मेहंदीची जशी गडबड असते ना तश्शी लगबग सुरु होती. सकाळी उठल्यानंतर सहा नातवंडाकडून शुभेच्छा मिळाल्या. सून, चिरंजीव, लेकींनी शुभेच्छा दिल्या. आठवण आजीची ग्रुपवर शुभेच्छांचा पाऊस पडला. उरलेल्या पीठाचे लोणी डोशांचा नाष्टा झाल्यावर सर्व नातवंडे शुभेच्छा पत्रे बनविण्यासाठी सज्ज झाली. कागद मिळविले, रंगाची जुळणी झाली आणि प्रत्येकाने आपले कौशल्य पणाला लावून सुंदर सुंदर कार्डस् तयार केले. अल्फीया नातीचे कार्ड अतिसुंदर कारण ती सर्वात मोठी शिवाय चित्रकार. सोहानेही फार सुंदर कार्ड तयार केले व दाखवून दिले हम भी कुछ कम नही. झियान व रौनक या दोघांनी एकच कार्ड तयार केले पण भले मोठे. या सर्वांचे हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो. मुलींनी अबोलीची फुले आणून गजरे केले. आम्ही दोघे वास्तुशांतीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून मुली आम्हाला गिफ्ट आणण्यासाठी बाहेर पडल्या. बऱ्याच वेळाने एक छानशी साडी व यांच्यासाठी कपडे घेऊन परतल्या. संध्याकाळचा बेत तिघींनी ठरवून टाकला. वडापाव, केक, कलाकंद, दाल खिचडीचा फक्कड बेत ठरला. चिरंजीव ऑफिसहून आल्यानंतर दोघे केक आणण्यासाठी बाहेर गेले. घरी राहणाऱ्यांनी कार्यक्रमाची तयारी केली. नव्या साडीसाठी मॅचिंगची तयारी झाली. साडी पिन्अप करण्यासाठी तिन्ही लेकी तयार होत्या. त्यामुळे बेचाळीस वर्षापूर्वीची आठवण झाली. मन भरून आले. आम्ही ही गोड नातवंडाना रिटर्न गिफ्ट आणून ठेवले. माझ्या मुलाच्या निरिक्षणशक्तीचे कौतुक वाटले कारण त्याने केक आणतांना पप्पांसाठी एक छानशी उन्हाळी टोपी आणली. केक कापल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. गोड केकचा आस्वाद घेतल्यानंतर मस्त वडा पाववर आडवा हात मारला. बेचाळीसावा लग्न वाढदिवस अविस्मरणीय केला माझ्या पिलांनी व लाडक्या नातवंडानी.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!