आपल्या मुलांचा विवाहाला उशीर होत आहे का ? यावर एक उपाय ब्रह्मणस्पती सुक्त हवन १७ सप्टेंबर ला करावे.
By gmjyotish on ज्योतिष from https://gmjyotish.blogspot.com
उपवर मुलांचा विवाह लांबलेला असतो तेंव्हा पालक चिंतीत असतात. जेव्हा मुलाचे अगर मुलीचे वय ३० ओलांडून गेले की हि चिंता अजूनच वाढते. अश्यावेळी विवाह होण्यासाठी एखादा खात्रीचा उपाय सांगा असे उपवर मुलांचे पालक म्हणतात.मी अश्या वय वाढत चाललेल्या आणि जन्मकुंडलीत सप्तमेश आणि शुक्र सुस्थितीत नसेल तर संकल्प करुन रुक्मिणी स्वयंवर याची ७ व्या अध्यायाचे संपुटयुक्त १८ पारायणे करायला सांगतो. अनेकदा मुली हे करायला तयार होतात. माझ्या अनुभवाने हा उपाय अत्यंत खात्रीचा आहे. अनेकदा रुक्मिणी स्वयंवर चे पाठ करण्यासाठी उपवर मुलांना वेळ मिळत नाही. त्यासाठी मानसीक स्वस्थता नसते. रोज १४- १६ तास काम करावे लागत असेल तर उरलेल्या वेळात रोज अर्धा तास काढून रुक्मिणी स्वयंवराचे पाठ करणे शक्य होत नाही. अनेकदा उपवर मुले इंग्रजी माध्यमातून शिकलेली असल्याने त्यांना मराठीमधील रुक्मिणीस्वयंवर सारखा ग्रंथ वाचणे कठीण होते. अश्या वेळी थोडा खर्चाचा पण एका दिवसात संपेल असा उपाय आहे का ? अशी विचारणा होते.आपल्या ऋषी मुनींनी कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी जप, स्तोत्रपठण, ग्रंथवाचन असे उपाय सांगीतले आहेत तसेच विधीवत षोडशौपचारे पुजन आणि यज्ञ याबाबतीत सुध्दा तंत्र आणि मंत्रांची निर्मीती केलेली आहे. षोडश म्हणजे सोळा प्रकारे पुजन ज्यात प्रमुख देवतेच्या आवाहन आणि स्थापनेनंतर विवीध मंत्राने व जल आणि पंचामृताने प्रमुख देवतेला अभिषेक केला जातो, मंगलद्र्व्याने पुजन केले जाते, विवीध पुष्प म्हणजे फ़ुले आणि पाने अर्पण केले जातात. धुप - दिव्याने आरती ओवाळली जाते याला षोडश उपचार असे म्हणतात. यांने मनाची एकाग्रता साधली जाते व त्यानंतर अग्नि प्रज्वलीत करुन विशीष्ठ मंत्रांच्या सह आहूती देऊन त्या त्या कार्यासाठी सहायभूत देवतेला आवाहन करुन प्रार्थना केल्यास कमी काळात त्याचे फ़ळ मिळते असे हे तंत्र आहे.परंतु हे तंत्र स्वत: नीट शिकले नसेल तर पुरोहीत यांच्या सहायाने हे करावे लागते. काही विशीष्ठ यज्ञांना आधी पुजा आणि मग हवनाचे क्रम ठरविले आहेत या क्रमाने ते केल्यास फ़ळ मिळते.ब्रह्मणस्पती सूक्ताने मंगळवारी येणार्या म्हणजे अंगारिका संकष्टी चतुर्थीस हवन केल्यास विवाहाच्या मार्गातील अडथळे दुर होतात. कारण गणपती ही विघ्नहर्ता किंवा संकट हरण करणारी देवता आहे. उपवर मुलांचा विवाह जमत नाही हे त्यांच्या सुखी संसाराच्या मार्गातील विघ्न किंवा संकट आहे. या विशीष्ठ हवनाने हे संकट दुर होते असा अनुभव आहे.ह्या हवनाचे आधी महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं हे विधी झाल्यावर अग्निस्थापन करुन मुख्य हवनास प्रारंभ होतो. एकूण १३०२ आहूती देऊन, पुर्णाहूतीने हा यज्ञ संपन्न होतो ज्यात दुर्वांकूर, लाह्या, मोदक आणि साज्य समिमद्द्रव्यं अर्थात तुप असलेली समिधा याचा उपयोग केला जातो. हा यज्ञ केल्याने श्रीगणपती ही देवता प्रसन्न होऊन त्याचे लवकर फ़ळ मिळणे अपेक्षीत आहे.मला माहित असलेला ब्रह्मणस्पती सुक्ताने हवनाचा विधी मी वर दिला आहे. ह्याबाबत लिहीण्यास मी अधिकारी नाही. या क्षेत्रातील जाणते शास्त्री हवनाच्या पध्दती बद्द्ल आणि उत्कृष्ट पध्दतीबाबत बोलावे. वरील माहिती विस्ताराने सांगण्याचा हेतू या यज्ञाबाबत जास्त माहिती देणे आहे. पुरोहीतांनी याबाबत उपलब्ध ग्रंथ पहावा, शास्त्री महोदयांशी चर्चा करुन श्रेयस्कर काय ते ठरवावे.यातील हवन सामग्री, लागणारा वेळ आणि तांत्रिक बाजू पहाता याला येणारा खर्च बराच आहे. ज्यांना हा प्रयोग करण्यासाठी खर्च करणे सहज शक्य आहे त्यांनी हा प्रयोग करुन आपला अनुभव कळवावा. हा यज्ञ नदीकिनारी करावा. अशी जागा उपलब्ध नसेल तर श्रेष्ठ जागा शोधावी तसेच या कार्यासाठी जाणत्या पुरोहीतांशी संपर्क करावा.येत्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी संकष्टी अंगारक योग येत असून ज्यांना विवाहाला विलंब होत आहे अश्यांनी आपल्या कुलपुरॊहीतांशी संपर्क करुन यज्ञा करता श्रेष्ठ जागा निवडून हे करावे व अनुभव कळवावा. पितृपक्ष आहे मग हे करावे की नको असा विचार मनात न आणता हे हवन करा. सकाळी उपवर मुलाचे आई-वडील हयात नसतील आणि त्यांची चतुर्थी ही तिथी असेल प्रथम श्राध्द करा. श्राध्दाचा लोप कधी करायचा नसतो.आपल्या ऋषी मुनींनी सांगीतलेले प्रयोग करुन पहावेत जेणे करुन हे उपाय जास्त जास्त प्रचलीत होतील हे सांगणे हा या पोस्ट चा उद्देश आहे.ज्यांना हा विधी कसा करायचा हे माहित नाही अश्या याज्ञीकांच्या साठी हा इंटरनेट वर उपलब्ध असलेला यज्ञविधी देत आहे. मी स्वत: याज्ञीक नसल्याने यावर अधिक मार्गदर्शन करु शकणार नाही अश्यावेळी याज्ञीकांनी आपल्या गुरुजनांशी चर्चा करुन हवन सामाग्री ठरवावी.ब्रह्मणस्पती सुक्ताचे एकूण श्लोक ६४ आहेत. ही सुक्ते संपुर्ण न देता फ़क्त सुरवात दिलेली आहे.तत्र महागणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचन नान्दीश्राद्धं मातृकापूजनं, तथाचार्यादिऋत्विग्वरणं करिप्ये । आचार्यादीन्यथाविधि वृणुयात्। वृत: आचार्य: स्थण्डिलपूर्वभागे गणपतिभद्रे वा सर्वतोभद्रे वा केवले स्वस्तिके बह्मादिमण्डलदेवता: संस्थाप्य पूजयेत्। तदुपरि धान्यपूरितमध्यभागे कलशं संस्थाप्य तस्योपरि पूर्णपात्रं निधाय यथाशक्ति निर्मितां सुवर्णमर्यी यथोक्तलक्षणां श्रीगणेशप्रतिमां संस्थापर्यत्। सा प्रतिमा पूर्णपात्रोपरि लिखिते अष्टदले “गणानां त्वा” इति मन्त्रेण संस्थाप्या । अनन्तरं यथामिलितषोडशोपचारै: यथाविधि पूजां कुर्यात् । पंचखाद्यं वा मोदकान्नैवेद्ये समर्पणं कृत्वा यथाशक्ति रत्नालङ्कारै: पूजयेत्। ततश्च स्थण्डिलान्तिके संस्कारपूर्वकं स्वगृह्योक्तविधिना अग्निं प्रतिष्ठाप्य स्थापितदेवताया: उत्तरभागे आदित्यादिनवग्रहादीनां आवाहयेत्संपूजयेच्च । ततश्चान्वाधानं कुर्यात्। तत्र च संकल्प: । मया क्रियमाणे ग्रहमखपूर्वकब्रह्मणस्पतिसुक्तहवनकर्मणि देवतापरिग्रहार्थमन्वाधानं करिष्ये । ततश्च अन्वाहिताग्नौ प्रधानदेवतां गणपर्ति द्विषष्टि-क्रमात्मकब्रह्मणस्पतिसूक्तेन प्रत्यर्चं जुहुुयात्। यथा काम: तथा द्रव्यमिति न्यायेन द्र्घाङ्कुरद्रव्यम्, मोदकद्रव्यम्, लाजाद्रव्यम्, साज्यसमिमद्द्रव्यं च गृह्णीयात्। एते मन्त्रा: हवनकाले ॐ कारयुक्ता: स्वाहान्ताश्च वक्तव्या: ।(१) ॐ सोमानं स्वरणं. औशिज: स्वाहा ।(२) ॐ यो रीवान्यो. तुर: स्वाहा ।(३) ॐ मा न: शंसो. ब्रह्मणस्पते स्वाहा ।(४) ॐ स घा वीरो. मर्त्यं स्वाहा ।(५) ॐ त्वं तं ब्रह्मण. त्वंहस: स्वाहा ।(६) ॐ उत्तिष्ठ. भवासचा स्वाहा ।(७) ॐ त्यामिद्धि. आचके स्वाहा ।(८) ॐ प्रैतु ब्रह्मण. नयंतु न: स्वाहा ।(९) ॐ यो वाघते. मनेहसं स्वाहा ।(१०) ॐ प्रनूनं. चक्रिरे स्वाहा ।(११) ॐ तमिद्वोचे. अश्नवत्स्वाहा ।(१२) ॐ को देव. क्षयं दघे स्वाहा ।(१३) ॐ उप क्षत्रं. वज्रिण: स्वाहा ।(१४) ॐ गणानां त्वा. सादनं स्वाहा ।(१५) ॐ देवाश्चित्ते. ब्रह्मणामसि स्वाहा ।(१६) ॐ आ विबाध्या. स्वर्विदं स्वाहा ।(१७) ॐ सुनीति. महित्वनं स्वाहा ।(१८) ॐ न तमंहो. ब्रह्मणस्पते स्वाहा ।(१९) ॐ त्वं नो. हरस्वती स्वाहा ।(२०) ॐ उत वा यो. कृधि स्वाहा ।(२१) ॐ त्रातारं. मुन्नशन्स्वाहा ।(२२) ॐ त्वया वयं. अनप्नस: स्वाहा ।(२३) ॐ त्वया व यमु. तारिषी महि स्वाहा ।(२४) ॐ अनानुदो. हर्षिण: स्वाहा ।(२५) ॐ अदेवे. शर्धत: स्वाहा ।(२६) ॐ भरेषु. रथाँ इव स्वाहा ।(२७) ॐ तेजिष्ठया. अर्दय स्वाहा ।(२८) ॐ बृहस्पते. धेहि चित्रं स्वाहा ।(२९) ॐ मा. न:. साम्नोविदु: स्वाहा ।(३०) ॐ विश्वेभ्यो. धर्मरि स्वाहा ।(३१) ॐ तव श्रिये. अर्णवं स्वाहा ।(३२) ॐ ब्रह्मणस्पते. सुवीरा: स्वाहा ।(३३) ॐ सेमा. नो मर्ति स्वाहा ।(३४) ॐ यो नं त्वा. पर्वतं स्वाहा ।(३५) ॐ तद्देवानां. व्यचक्षय स्वाहा ।(३६) ॐ अश्मास्य. समुद्रिणं स्वाहा ।(३७) ॐ सना ता. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(३८) ॐ अमिनक्ष. युरा विशं स्वाहा ।(३९) ॐ ऋतावान:. जहुर्हि तं स्वाहा ।(४०) ॐ ऋतज्येन. कर्णयोनय: स्वाहा ।(४१) ॐ स संनय. वृथा स्वाहा ।(४२) ॐ विभु प्रभु. विश: स्वाहा ।(४३) ॐ जोऽवरे. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(४४) ॐ विश्वं सत्यं. जिगातं स्वाहा ।(४५) ॐ उताशिष्ठा. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(४६) ॐ ब्रह्मणस्पते पृथक्स्वाहा ।(४७) ॐ ब्रह्मणस्पते. वेषे मे हवं स्वाहा ।(४८) ॐ ब्रह्मणस्पते त्वम. सुवीरा: स्वाहा ।(४९) ॐ इन्धानो. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(५०) ॐ वीरेभि. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(५१) ॐ सिन्हु. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(५२) ॐ तस्मा. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(५३) ॐ तस्मा इ. ब्रह्मणस्पति: स्वाहा ।(५४) ॐ ऋजुरि. भोजनं स्वाहा ।(५५) ॐ यजस्व. वृणीमहे स्वाहा ।(५६) ॐ स इज्ज. ब्रह्मणस्पर्ति स्वाहा ।(५७) ॐ योऽअस्मै. रद्भुत: स्वाहा ।(५८) ॐ तमु ज्येष्ठं. राजा स्वाहा ।(५९) ॐ इयं वा. मराती: स्वाहा ।(६०) ॐ चत्तो इत. द्दषन्निहि स्वाहा ।(६१) ॐ अदो य. परस्तरं स्वाहा ।(६२) ॐ अग्निर्येन. समिदं कुरु स्वाहा ।(६३) ॐ यत्र बाणा:. शर्म यच्छतु स्वाहा ।(६४) ॐ यदिन्द्र ब्रह्मणस्पते. पात्वंहस: स्वाहा ।एवं ब्रह्मणस्पतिसूक्तमन्त्राणां हवनं कृत्वा १३०२ आहुतिभि: ब्रह्मादिमण्डलदेवता: प्रत्येकं तिलैर्वा घृतेन-एकैकयाहुत्यादशदश वा यष्टव्या: ।(द्रव्यका: दूर्वाङ्कुरद्रव्यम्कीर्तिकाम: लाजाद्रव्यम्, इष्टमनोरथार्थसिद्धयर्थं मोदकद्रव्यम्, गृह्लीयात्। शेषेण स्विपृकृत्। अन्वाधानोक्तरीत्या होमं संपाद्य पूर्णाहुतिं दत्वा संस्रवादि कृत्वा होमशेषं समापयेत् । ततश्च प्रार्थयेत्। देहेन वाचामनसा कृतान्मे सांसर्गिकान्जागृतस्वप्नजातान्। सौषुप्ततौर्यान्सकलापराधान्क्षमस्व. हेरम्ब दयानिधे त्वम्॥१॥ततश्चाभिषेक: । ततश्चाभिषेक: । आचार्य: सदारं यजमानमभिर्षिचेत्। तथा च रजामान: अग्निपूजनं कृत्वा विमूतिधारणं कुर्यात्।कर्मण: साङ्गतासिद्धयर्थं यथाशक्ति गोप्रदानादिचदक्षिणां आचार्यादिभ्य: दत्वा ब्राह्मणभोजनसंकल्पं कुर्यात्। तथा च स्थापितदेवतादीनां विसर्जनं कृत्वा तत्सर्वं आचार्याय दत्व पीठदानादिकं कुर्यात्।प्रतिमाविसर्जनमन्त्र: । गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने त्वं गणेश्वर ॥ कर्मणानेन मे नित्यं यथोक्तफलदो भव ॥ प्रतिमादानमन्त्रा: । गणेशप्रतिमां श्रेष्ठां वस्त्रयुग्मसंमन्विताम्॥ तुभ्यं संप्रददे विप्र प्रीयतां मे गजानन: ॥१॥गणेश: प्रतिगृह्लाति गणेशो वे ददाति च ॥ गणेशस्तारको हात्र गणेशाय नमो नम: ॥२॥ विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत ॥ पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नं विनाशय ॥३॥ भूयसीदक्षिणादानं कृत्वा एतत्कर्म गणपतिप्रीत्यर्थं प्ररमेश्वरार्पणं कुर्यात्।ब्राह्मणेभ्य: कर्मसम्पूर्णतां वाचयित्वा तेभ्य: आशिष: गृहीत्वा सर्वै: आचार्यादिभि: साकं भुञ्जीयात्। भोजनोत्तरं ताम्बूलदक्षिणां दत्वा आशिष: गृह्लीयात्। ॥ ब्रह्मणस्पतिसूक्तहोमविधि: सुसंपुर्णं॥