आपल्या जन्मकुंडलीत दडलेली रहस्य उलगडणाऱ्या अंशात्मक वर्ग कुंडल्या

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

अंशात्मक कुंडली विषयी खूप लोकांचे प्रश्न आले होते. त्यामुळे त्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी हि पोस्ट आहे. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक ईमेलला उत्तर देताना मी सांगत असतो कि अंशात्मक कुंडलीचा देखील अभ्यास करावा लागेल कारण त्याच ठरवतात कि आपल्याला ग्रहदशेचं नक्की काय फळ मिळणार आहे. अंशात्मक वर्ग कुंडल्या म्हणजे काय? आपली जन्मकुंडली आपल्याला आपल्या जन्माच्या वेळी अंतराळात ग्रहस्थिती कशी होती हे दर्शवते. त्यानुसार त्याविशिष्ट वेळी कुठले ग्रह कुठल्या राशीत व नक्षत्रात होते हे पाहून जन्मकुंडली तयार केली जाते. आणि मग त्या ग्रहस्थितीनुसार व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, व्यक्तिमत्व, देहयष्टी, कुटुंब, भावंडं, गृहसौख्य, संतती, रोग-आजार, विवाह, मृत्यू, भाग्य, कारकीर्द, लाभ आणि हानी, अशा विविध गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. पण त्या सगळ्या गोष्टींचं फळ आपल्याला मिळणार आहे कि नाही? मिळणार असेल तर कधी? चांगलं मिळेल कि वाईट? चांगले फळ कशाप्रकारे मिळेल? वाईट फळ कशाप्रकारे टाळता येईल? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला जन्मकुंडलीवर विसंबून राहून  मिळत नाहीत. म्हणून त्यासाठी अंशात्मक वर्ग कुंडल्या असतात. आता त्याचा वापर करून मार्गदर्शन कसं मिळतं ते पाहू... अंशात्मक कुंडली कशी तयार करतात? त्यासाठी जन्मतारीख वगैरे वेगळी माहिती द्यावी लागते का? कुठलीही वेगळी माहिती दयावी लागत नाही, कारण  जन्मकुंडलीवरूनच अंशात्मक कुंडली तयार करतात. जन्मकुंडलीचे सूक्ष्म भाग पाडून अंशात्मक कुंडल्या तयार केल्या जातात. जन्म कुंडलीत एकूण १२ स्थाने असतात. त्यातील एका स्थानाचे २ भाग केले कि त्याला होरा कुंडली असे म्हणतात. ३ भाग केले कि त्याला द्रेष्काण कुंडली, ४ भाग केले कि चतुर्थांश कुंडली, असे अनेक सूक्ष्म भाग असतात. त्यातील १६ भाग पाहण्याची एक प्रचलित पद्धत आहे. त्याला षोडषवर्ग असं म्हणतात.  इंग्रजीत याला डिव्हिजनल चार्ट्स (Divisional Charts) असं म्हणतात. शास्त्रकारांनी खूप खोलवर जाऊन ज्योतिषाचा अभ्यास करून ठेवलेला आहे. ज्यामुळे आपल्याला आयुष्यात पडणाऱ्या अनेक गूढ व अगम्य प्रश्नांची उत्तरे या अंशात्मक कुंडल्याच्या माध्यमातून मिळतात. हे सगळं ज्योतिषांच्या अभ्यासासाठी आहे. तुम्हाला हे सगळं माहिती असण्याची आवश्यकता नाही. महर्षी पराशर आणि जेमिनी यांनी रचलेल्या 'बृहत पराशर होराशास्त्र' व 'जेमिनीसूत्र' यांसारख्या महान ज्योतिषीय ग्रंथांमध्ये हि माहिती सविस्तर उपलब्ध आहे. षोडषवर्गमधील १६ कुंडल्या, त्यांची नावे व त्यातून कुठल्या प्रकारची माहिती मिळते हे पुढीलप्रमाणे: राशी कुंडली (D1): हि आपली नेहमीची जन्मकुंडली.  यातून आपण आपले व्यक्तिमत्व, शरीराची एकूण ठेवण, चेहरा, वगैरे ढोबळ गोष्टी पाहतो.होरा कुंडली (D2): कुटुंब, बँकेतील ठेवी, दागिने, पैसा, इत्यादी.   द्रेष्काण कुंडली (D3): बहीण-भावंडं, अंगभूत कलागुण-कौशल्य,  शेजार-पाजार, छोटे प्रवास,इत्यादी.    चतुर्थांश कुंडली (D4): स्वतःचे घर, जमीन, इतर प्रॉपर्टी, आई, सुख-समृद्धी, इत्यादी.  सप्तमांश कुंडली (D7): गरोदर राहणे, मुलगा-मुलगी कधी होईल? अपत्यसुख व त्यासंबंधी रोग-आजार आणि उपाय, दत्तक मूल घेण्याचा योग आहे का? संततीयोग उशिरा आहे का? लग्नाआधी मातृत्व, लग्नाशिवाय मातृत्व, गर्भपात, इत्यादी.   नवमांश कुंडली (D9): सगळ्यात महत्त्वाची, सर्वाधिक लोकप्रिय व जास्त अभ्यासली जाणारी अंशात्मक कुंडली. लग्नासंबंधित प्रश्नासाठी हि कुंडली पाहतात. विवाहसौख्य कसे असेल? लग्नाला उशीर का होतो? परजातीत-परधर्मात लग्न होईल का? लग्न होणारच नाही का? आजन्म ब्रह्मचर्य तर घ्यावे लागणार नाही ना? घटस्फोट, अनैतिक संबंध, व्यभिचार, इत्यादी.    दशमांश कुंडली (D10): नोकरी, व्यवसाय, व उद्योगधंद्यासंबंधित सगळे प्रश्न. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून होणारा त्रास, बढती व बदली, शासकीय कामे, कर्मदोष, इत्यादी. द्वादशांश कुंडली (D12): आई-वडील, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा, घरातील पूर्वजांविषयी, इत्यादी. षोडशांश कुंडली (D16): वाहनसौख्य, प्रवास सुख, इत्यादी. विशमांश कुंडली (D20): अध्यात्मिक प्रगती. गुरु भेटेल का? त्यासाठी काय करावे? कुठल्या देवाची उपासना धार्जिण आहे? कुठल्या प्रकारची उपासना करावी? अध्यात्मिक मार्गातील अडथळे, इत्यादी.   चतुर्विशमांश कुंडली / सिद्धांश कुंडली (D24): शिक्षण, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, पदवी, शैक्षणिक मान-सन्मान, शाळेनंतर कुठल्या शाखेचे शिक्षण घ्यावे? निवडलेल्या शाखेत यश मिळेल का? सारखा नापास होतो, पास होण्यासाठी काय करावे? अभ्यासात मन लागत नाही? शिक्षण सोडून द्यावे का? इत्यादी.  सप्तविशमांश कुंडली (D27) : बलस्थानं व कमकुवत स्थानं, इत्यादी.   त्रिशांश कुंडली (D30) : नकारात्मक शक्ती, संकटे, वाईट विचार, दुष्कर्म, इत्यादी.  खवेदांश कुंडली (D40): आयुष्यातील महत्त्वाच्या शुभ व अशुभ घटना, इत्यादी.  अक्षवेदांश कुंडली (D45):  एकूण चरित्र, इत्यादी. षष्ट्यांश कुंडली (D60) :  सर्वसाधारण विचार वर दिलेल्या १६ कुंडल्यांशिवाय आणखी ४ अंशात्मक कुंडल्या असतात. त्या पुढीलप्रमाणे: पंचमांश कुंडली (D5) : प्रसिद्धी, प्रेमप्रकरणे, इत्यादी. षष्ठांश कुंडली (D6) : सर्व प्रकारचे रोग-आजार, शत्रू, भीती, इत्यादी.  अष्टमांश कुंडली (D8) : अनपेक्षित अडचणी, अपघात, गुप्तधन, भूमिगत गोष्टी,  इत्यादी.  रुद्रांश कुंडली (D11) : सर्वप्रकारचे लाभ, ईच्छापूर्ती, मित्रपरिवार, समाज-समुदाय, इत्यादी.  तर अशाप्रकारे जेव्हा तुम्ही ज्योतिषीय मार्गदर्शनाकरता माझ्याकडे येता तेव्हा तुमचा प्रश्न यापैकी कुठल्या प्रकारात मोडतो हे पाहून जन्मकुंडलीच्या जोडीने त्या संबंधित अंशात्मक कुंडलीचा देखील सखोल अभ्यास करावा लागतो. ज्यामुळे आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळतं आणि कामं वेळेवर होतात. अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!