आंबेडाळ ~ कैरीची डाळ
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
चैत्र. शु. तृतीया ते अक्षय तृतीया असे महिनाभर चैत्रागौरीचे पूजन केले जाते. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनी व कुमारिकांची भिजवलेल्या हरबर्यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांना कैरीची डाळ व पन्हे देतात. कर्नाटकात व महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागात चित्रान्न केले जाते. तर पाहू या कैरीच्या डाळीची रेसिपी. Read this recipe in English. Click here.साहित्य: कैरी, किसून- १/४ कप (कमी आंबट असेल तर जास्त घ्यावी.) चणा/ हरबरा डाळ- १/२ कप हिरव्या मिरच्या- २ ते ३ (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात) आल्याचा तुकडा- १/२ इंचखोवलेले ओले खोबरे- १/४ कप साखर- चिमुटभर मीठ- चवीप्रमाणे कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून तेल- २ टीस्पून मोहरी- १/२ टीस्पून हिंग- १/२ टीस्पून हळद- १/२ टीस्पून लाल ब्याडगी मिरची- १ कढीपत्ता- ३ ते ४ पाने (ऐच्छिक)कृती:चणा डाळ सध्या पाण्यात कमीतकमी ४ तास भिजत घालावी. कैरीची साल काढुन खिसुन घ्यावी. हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत, आल्याची साल काढुन त्याचे पण तुकडे करावेत.भिजवलेल्या डाळीतील सर्व पाणी काढून टाकावे व मिक्सरवर आले व मिरचीसोबत भरडसर वाटून घ्यावी. (कैरी खिसली नसेल तर मिक्सरमधे डाळीसोबत वाटली तरी चालते.)ओले खोबरे, मीठ व साखर घालुन सगळे एकत्र नीट मिसळुन घ्यावे.कढल्यात किंवा छोट्या पॅनमध्ये तेल तापवून मोहरी, लाल मिरची तोडून घालावी. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद, कढीपत्ता घालुन खमंग फोडणी करुन डाळीवर घालुन अजुन एकदा नीट मिसळुन घ्यावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.