अशी ही थट्टा
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
अशी ही थट्टा आज एकनाथ षष्ठी ( फाल्गुन कृ षष्ठी) . आजच्या तिथीला संत एकनाथ महाराजांनी देह ठेवला. आजच्या दिवसाच्या निमित्याने त्यांची एक मला आवडलेली विशेष रचना "अशी ही थट्टा" इथे देत आहेयातील मेसेज ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घ्यावा. समजायला तशी सोपीच आहे.बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टाभलभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टाब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधीथट्टेने हरवली बुद्धीकेली नारदाची नारदीअशी ही थट्टाथट्टा दुर्योधनानं हो केलीपांचाळी सभेत गांजिलीगदाघावे मांडी फोडिलीअशी ही थट्टाथट्टेने दुर्योधन मेलाभस्मासुर भस्म की हो झालावालीही मुकला प्राणालाअशी ही थट्टाथट्टा रावणाने त्या केलीसोन्याची लंका बुडविलीथट्टा ज्याची त्यास भोवलीबरी नव्हे थट्टाथट्टेतून सुटले चौघेजणशुक, भीष्म आणि हनुमानचौथा कार्तिकस्वामी जाणत्याला नाही बट्टाएका जनार्दन सर्वांलाथट्टेला भिऊन तुम्ही चालानाहीं तर नरककुंडालाअशी ही थट्टा//थोडं अवांतर: संत एकनाथ महाराजांनी ज्या अनेक रचना केल्यात त्या प्रत्येक रचनेत शेवटच्या कडव्यात ते स्वतःसाठी 'एका जनार्दनी' असा उल्लेख करतात. वरच्या रचनेतही तसा उल्लेख आहे. आणखी काहीउदाहरणे-माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद!यात शेवटी ते म्हणतातगोविंद हा जनीं-वनींम्हणे एका जनार्दनीं !//काया ही पंढरी ,आत्मा हा विठ्ठलनांदतो केवळ पांडुरंग!देखिली पंढरी देही-जनी-वनींएका जनार्दनी वारी करी!!//संत एकनाथ महाराजांना विनम्र ????????फाल्गुन कृ षष्ठी(नाथषष्ठी)२३/३/२२Kelkaramol.blogspot.com ????देवा तुझ्या द्वारी आलो ???????? Loading...