भाग -१० गीताची शॉपिंग
By shejwalabhay on तंत्रज्ञान from https://www.softwarefukat.in
गाडी हळूवार पणे पुढे जात होती .. आकाशात पाऊसाचे ढग चागलेच गर्दी करून होते . हो ना हो आज पाऊस येणार याची मला खात्रीच झाली होती. गीता मात्र निर्धास्त मोबाइलमधे फेसबुक बघत होती आणि मी बाहेर कन्नड मध्ये लिहालेल्या पाट्या वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. फेसबुक वर आहेस का ? गीता ने कुहुतुल्या नजरेने बघत विचारलं. आता सांगू काय ? कारण आधीच मी बरच काही तिच्या बद्दल फेसबुक वर लिहून बसलोय