in

नक्षत्रांचे देणे ५३ (शेवटचा भाग)

 ”मैथिली शुद्धीवर आली आहे? कशी आहे ती?” भूमी त्यांना विचारत होती.

 

”मी अगदी व्यवस्थित आहे. फक्त चालत येत नाही. एवढंच. पण ती माझ्या कर्माची फळ आहेत. क्षितिजला फसवलं होत, आता भोगतोय.” म्हणत व्हील चेअर वर बसून एक मदतनिसांच्या साहाय्याने मैथिली आतमध्ये लग्न मंडपात येत होती. तिला बघून क्षितीज आणि भूमी दोघेही स्टेजवरून उतरून तिच्या जवळ आले.

 

”तू बरी झालेस. विश्वास बसत नाही.” भूमी

 

”मैथिली पुन्हा तुला बोलताना पाहून माझ्या मनातील गिल्ट कमी झालाय. लवकर स्वतःच्या पायावर उभी राहा.” क्षितीज

 

”होय, नक्कीच. सॉरी क्षितीज. सॉरी तुझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक करण्यासाठी. तुला फसवण्यासाठी, आणि कंपनी म्हणशील तर ती भूमीने तुझी तुला परत केली आहे. तुझ्या आई जवळ सगळे पेपर्स आम्ही रिटर्न केले आहेत.” बोलताना मैथिलीचे डोळे पाण्याने भरले.

 

”तू तुझी काळजी घे, सगळ्यांच्या काही नाकाही चुका झाल्या होत्या. सगळ्यांनी एकमेकांना समजावून घेऊ आणि पुढे जाऊ.” क्षितीज

 

‘आता इथे तुमच्या दोन्ही कुटुंबाचे सगळे नातेवाईक जमा झाले असतील तर सप्तपदी राहिल्या आहेत. त्या पूर्ण करूया का? म्हणजे कस आहे,लग्न पूर्ण होईल आणि तुम्ही गप्पा मारायला मोकळे.”  साठे काका मध्येच हसत हसत म्हणाले. आणि सगळे हसायला लागले.

आणि पुन्हा भूमी क्षितिज स्टेजवर आले. सप्तपदीला सुरुवात झाली. सप्तपदी पार पडून क्षितिजने भुईच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. सगळ्यांनी त्यांच्यावर सुमनांचा वर्षाव केला आणि खऱ्याअर्थाने आज दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने हा विवाह सोहळा पार पडला होता.

 

रिसिप्शन पार पडले आणि किर्लोस्कर कुटुंब भूमी क्षितिजला शुभेच्छा देऊन घरी परतले. नाना आणि माई सुद्धा त्यांच्या सोबत घरी परतले. क्षितिजच्या आईने त्याला त्यांच्या राहत्या घरी परतून येण्याचा खूप आग्रह केला पण त्याने नकार दिला. त्याला भूमीचा गृहप्रवेश त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरात करायचा होता. त्याने तशी व्यवस्थाही केली होती. उलट त्याने आई आणि पप्पाना काही दिवसासाठी त्याच्या बंगल्यावर राहायला बोलावले. आणि नवीन सुनेचे स्वागत करण्यासाठी ते दोघे क्षितिजच्या घराकडे निघाले. मागच्या गाडीने क्षितिज भूमीला घेऊन त्याच्या घरी निघाला. फुलांनी सजलेली गाडी समोर आली. ड्राइव्हरने दार उघडले आणि भूमी आत जाऊन बसली. क्षितीज दुसऱ्या बाजूने आत बसला आणि गाडी घरच्या दिशेने निघाली.

 

 क्षितिजच्या बंगल्यावर गेल्यावर मेन गेटमधून आत प्रवेश करताना भूमीला फार आनंद झाला. कारण त्याचा संपूर्ण बंगला संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता. एवढी लाइटिंग केली गेली होती. ठिकठिकाणी फुलांची सजावट केली गेली होती.

क्षितिजच्या आईने तिची आरती केली. दारात पोहोचताच घरातील काकू पुढे आल्या, त्यांनी फुलांच्या नक्षीच्या मधोमध एक मोठे मापं भरून धान्य दारात ठेवले. आणि भूमीने माप ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. आरती करून तिला आत घेण्यात आले.  तिची पाऊले खाली लादीवर उठली होती. तर हातचे निशाण संपूर्ण घराच्या भिंतीवर छाप छाप म्हणून उठवले गेले. एवढे मस्त स्वागत होईल याची तिला अपेक्षा हि नव्हती.  ती खूपच खुश होती. अखेर तिचा एकटीचा  वनवास संपून तिला तिच्या प्रेमाची साथ मिळाली होती. आणि तिला मिळालेलं हे नक्षत्रांच देणं तिला तिच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत जपून ठेवायचं होत.

 ”ताई वरती रूममध्ये तुमचे सामान नेऊन ठेवलेले आहे.  करा.” काकू येऊन सांगून गेल्या आणि भूमी वरच्या रूमकडे वळली. क्षितिजचा बेडरूम… जो आजपासून तिचा सुद्धा बेडरूम असणार होता. तिने वर येऊन रूमचा दरवाजा उघडला. आतमध्ये खूपच काळोख होता. आता लाईटचे बटन कुठे असेल ते ती शोधू लागली. पण तिला बटन सापडले नाही. एवढ्या काळोखात तिला भीती वाटू लागली. आणि काहीतरी वस्तू पायाला लागून ती धडपडून खाली पडली. आता आपल्याला मार लागणार या भीतीने तिने डोळे मिटून घेतले. पण… पण ती बेडवर पडलेली होती. आणि ती पडताच क्षणी रूमची लाइट लागलेली होती. फुलांनी सजवलेल्या बेडवर पडल्यापडल्या तिच्यावर वरून फुलांचा वर्षाव झाला. गुलाबाच्या असंख्य पाकळ्या तिच्या डोक्यावर, अंगावर आणि बेडवर सगळीकडे पडलेल्या होता. ती बघतच राहिली. रूममध्ये लावलेल्या नाजूक लाइटिंग मधून तिने पहिले क्षितीज तिच्याच दिशेने येत होता. तो येऊन तिच्या बाजूला बसला. आणि त्याने तिच्या हात हातात घेतला.

”कस वाटलं सरप्राइज?”

 

”क्षितीज थँक्स, तू अजून किती सरप्राइज करणार आहेस मला? आधीच काय कमी केलस का माझ्यासाठी.” भूमी त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.

 

”माय प्लेजर. तू एवढ्या मोठ्या कंपनीची पार्टनरशिप एक मिनिटात सोडू शकतेस, तर मी सुद्धा तुझ्या आनंद साठी काहीही करू शकतो.”

 

”ते गरजेचं होत, नाहीतर तुझ्या आईला माझ्यावर विश्वास बसला नासता, आणि त्यांच्या गैरहजेरीत आपलं लग्न होऊ शकाल नसत. तेव्हडा तर मी नक्कीच करू शकते.”

 

”लव्ह यु हनी.” म्हणत त्याने मैत्रीला मिठी मारली.

 

”लव्ह यु टू. आणि असाच आयुष्यभर माझ्यासोबत राहा. आज मी खरच खूप खुश आहे.  विभासने दिलेल्या दुःखापेक्षा तू केलेलं प्रेम कितीतरी पटीने मोठं आहे, माझ विखुरलेलं आयुष्य तू पुन्हा मार्गी लावला आहेस.”

 

”बाय द वे, तू आज खूप छान दिसतेस. आणि नवरीच्या वेशात तर अगदी सुंदर. मिसेस भूमी क्षितीज सावंत.”

 

”एस, आज मी खऱ्या अर्थाने तुझी झाले. माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे हा क्षितीज.”

 

”खऱ्या अर्थाने नाही म्हणत येणार हा. अजून काहीतरी बाकी आहे ना?” म्हणत क्षितिजने तिला आपल्याकडे ओढले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव सुरु केला. ती लाजून अगदी चूर झाली होती.

 

”आपल्या नात्याला पूर्ण करायचं का मग? काय म्हणते? अर्थात तुझी परमिशन असेल तर?” तिला डोक्यावर ओठ टेकवत तो म्हणाला. आणि तिने डोळ्यांनीच त्याला होकार दिला.

 

त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ अलगद टेकवले आणि एक दीर्घ चुम्बन घेतले. पाण्यात खडीसार विरघळावी तशी ती हळूहळू त्याच्या मिठीत विरघळत गेली. तिच्या ओठांवर, मानेवर, कमरेवर त्याने आपल्या ओठांनी किस करायला सुरुवात केली. अगंणावरील वस्त्रांचा अडसर दूर झाला होता. श्वासाची अडखळती लय दर सेकंदाला वाढू लागली. आणि तिच्या गोर्यापान देहाला तिने क्षितिजच्या स्वाधीन केले. दोन्ही शरीर खऱ्या अर्थाने तन आणि मनाने एक झाली होती. प्रणयाच्या शेवटच्या क्षणी एक अस्फुट हुंकार तिच्या ओठातून बाहेर पडला. आणि तो तिच्यापासून दूर झाला. एक थंडीची लाट खिडकीतून आत आली. आणि थंडीने कुडकुडून ती तशीच विवस्त्र शरीराने क्षितिजच्या कुशीत शिरली. अंगावरच ब्लँकेट तिच्या भोवती गुंडाळून क्षितिजने ”लव्ह यु हानी” म्हणत तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं.

बाहेरचा चंद्रमा आणि त्याच्या संख्या सोबती त्या तारका म्हणजेच भूमीचे आवडते नक्षत्र आत बेडरूममध्ये डोकावून पाहत होते. कारण आज ते दोघेही एक झाले होते. कायमचे. एकमेकांपासून कधीही विलग न होण्यासाठी. तिच्या नक्षत्रांनी तिच्या साठी पाठवलेला राजकुमार आज तिचा झाला होता आणि ती त्याची. या देण्यासाठी ती त्या नक्षत्रांनची नेहेमीच ऋणी असेल.

 

 

कथा वाचकांचे मनापासून आभार.कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

 इथे मी आज या कथेचा शेवट करत आहे. पर्व २ च्या विचारात आहे. वाचकांनी कळवावे, आपल्याला वाचायला आनंद होत असेल तर मी पर्व दोन अवश्य लिहायला घेईन आणि रोज तुम्हाला नवीन भाग वाचायला मिळेल.

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by siddhic

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

प्रकाश-शलाखा- भंडारदर्‍याचा काजवा मोहोत्सव

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

नक्षत्रांचे देणे ५२