घरभेदी!
सध्या अमेरिकेत जी तथाकथित चळवळ सुरू आहे, त्यामागील कारणे शोधली पाहिजेत, कारण काही काळाने असाच असंतोष भारतात पसरवला जाणार आहे याची मला खात्री आहे. आता यामागे कोण आहे हे पाहू. यामागे आहेत अमेरिकेतील पॅलेस्टाईन नागरिक आणि अशा वातावरणाचा फायदा उठवणारे कम्युनिस्ट. अशा वेळी ही लाल मंडळी जिहादींना जाऊन मिळतात, हे आजवर आपण पाहिले आहे, कारण दोन्ही लोक अराजकवादी आहेत आणि जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटस पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की ते देश, समाज मानत नाहीत. इस्लाम फक्त मुस्लीम उम्मा मानतो तर कम्युनिस्ट फक्त लाल झेंड्याला मानतो. विद्यार्थ्यांच्या या निदर्शनात म्हणूनच पॅलेस्टाईनच्या झेंड्यांबरोबर लाल झेंडे फडकत होते. सोरोस आणि मंडळीनी या हमासच्या पाठिराख्यांच्या निदर्शनांना भरपूर पैसा त्यांच्या फाऊंडेशनमार्फत पुरवला. असे म्हणतात की १६ साला पासून हमासच्या विविध संघटनांना सोरोस आणि त्याच्या बगलबच्च्यांनी १५० लाख अमेरिकन डॉलर्स दिले. याचा उपयोग कसा केला जातो हे आपल्याला आज दिसतेय. या पॅलेस्टाईन वंशाच्या नागरिकांबरोबर जे गोरे अमेरिकन आहेत ते ‘‘उपयुक्त शतमूर्ख’’ आहेत. (Usefull Idiots) ज्या लोकांवर प्रभाव पाडून, त्यांची बुद्धी भ्रष्ट करून आपल्या बाजूला सहज वळवता येते त्यांना कम्युनिस्ट उपयुक्त शतमूर्ख म्हणतात. हे वर्णन शितयुद्धाच्या काळत केले गेले. ही जी गोरी अमेरिकन मुले आहेत त्यांना गाझा कुठे आहे माहीत नाही, गाझा आणि इस्राएलचा संघर्ष काय आहे, याची कल्पना नाही. इतिहास माहीत नाही. एका मुलाला एका वार्ताहराने विचारले, की तुम्ही जी घोषणा देत आहात ‘‘फ्रॉम द रिव्हर टू द सी’’ याच्यातील नदी कुठली आहे आणि समुद्र कुठला आहे? याचे उत्तर त्या शतमूर्खाला देता आले नाही. हा बुद्धीभेद इतका टोकाचा केला गेला आहे की ही मुले नुसती बेंबीच्या देठापासून बोंबलण्यासाठी गोळा झाली आहेत की काय अशी मला शंका येते. या मुलांनी अमेरिकेचा ध्वज खाली उतरवला आणि त्याजागी पॅलेस्टाईनचा ध्वज चढवला. (भारत तेरे तुकडे होंगे इन्शाल्ला इन्शाल्ला सारखेच) जॉर्ज वॉशिंग्टनच्या पुतळ्याची विटंबना केली. कॉलेजमध्ये ‘‘लिबरेटेड झोन’’ तयार केले आणि ज्यू व इतर मुलांना, ज्यांची वर्गात जायची इच्छा होती त्यांना वर्गात जाण्यापासून रोखले. प्रसंगी त्यांना मारहाणही केली गेली. ही सगळी मुले श्रीमंत घरातील आहेत आणि मध्यमवर्गातील मुले त्यांच्यामागे फरफटत चालली आहेत. आता परिस्थिती अशी आहे, की मुले हमासला पाठिंबा देत आहेत तर त्यांचे आईबाप हताश झाले आहेत, कारण त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोठमोठी कर्जे काढली आहेत.
काय घोषणा देत आहेत ही मुले?
१ फ्रॉम द रिव्हर टू द सी –
खालील नकाशा पहा यात जॉर्डन नदीपासून ते भूमध्य सागरापर्यंत जी काही जमीन दिसते आहे तो आम्ही पॅलेस्टाईनच्या कब्जात आणू. येथे आमच्याशिवाय राहायचा कोणालाही हक्क नाही. थोडक्यात इस्राएल नष्ट करण्यात येईल.
२ खेबा खेबा या याहूद.
तुम्हाला माहीत असेलच की मुहमदाने जे काही त्याच्या आयुष्यात केले ते ते करणे हा प्रत्येक मुसलमान स्वतःचे कर्तव्य समजतो. मुहमद हा त्यांचा एक आदर्श आहे. केबाचे युद्ध मुहमदाने लढले व विजय मिळवला. त्याचे वर्णन खाली येणारच आहे.
३ NYPD KKK! NYPD KKK!
क्लुक्लक्स क्लान नावाची एक अति उजव्यांची अतिरेकी संघटना होती. हे काळ्यांवर अत्याचार करत असत. (मिसिसिपी बर्निंग हा चित्रपट पाहिलात तर हे काय करत आणि यांचे निर्दालन कसे केले गेले हे आपल्याला समजून येईल) हे विध्यार्थी पोलिसांनाच क्लुक्लक्स क्लान असल्याचा आरोप करत आहेत.
४ वी आर द पिपल.
अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात या वाक्याने होते, जशी आपल्या संविधानाची ‘‘वी द पिपल ऑफ इंडिया…’’ या वाक्याने होते. याचा थोडक्यात अर्थ होतो, या देशाचा राज्यकारभार आम्ही नागरिक चालवतो इ. इ.पण सध्या त्याचा अर्थ असा लावला जातोय की आम्हीच लोक आहोत आणि आम्ही म्हणतो तसा कारभार होईल. (नाहीतर होणार नाही)
५ वी आर हमास! पिग!
जेव्हा या निदर्शकांचा तेथे असणाऱ्यांनी निषेध केला तेव्हा त्यांनी ही घोषणा दिली – आम्ही सगळे हमास!. जशी आपल्याकडे ‘‘मी अण्णा’’ अशी घोषणा दिली गेली.
६ आमचा लोकशाहीवरचा विश्र्वास उडाला आहे असे स्पष्टपणे सांगितले गेले.
७ अजून एक लोकप्रिय घोषणा होती – इन्टिफादा! इन्टिफादा…
हा एक अरेबिक शब्द आहे ज्याचा हल्लीचा अर्थ होतो – क्रांती, बंड चळवळ. कम्युनिस्टांना अत्यंत जवळचा वाटणारा हा शब्द आहे. याचा मुळ अर्थ आहे – भूकंप, झटकून टाकणे इ.इ. पॅलेस्टाईनच्या संदर्भात बोलायचे झाल्यास १९८७ – १९९३ या काळात पहिला इंटिफादा झाला इस्राएलविरुद्ध. दुसरा झाला २००० ते २००५ या काळात. आता हे अमेरिकेतील मूर्ख तिसऱ्या इंटिफादाची हाक देत आहेत.
८ फ्री गाझा! – गाझा स्वतंत्र करा कोणापासून? गाझा बेचिराख होण्याआधी स्वतंत्रच होता.
९ डिवेस्ट नाऊ.- यांचे म्हणणे आहे की सर्व शैक्षणिक संस्थांनी इस्राएलमध्ये जे काही पैसे गुंतवले आहेत ते काढून घ्यावेत. थोडक्यात इस्राएलला वाळीत टाकावे.
१० बिगेस्ट थ्रेट टू द वर्ल्ड टूडे, इस्राएल अँड द यु एस ए.
या सारखी विनोदी घोषणा जगात नसेल.
या दोन देशांचा धोका असेल जगाला, पण सगळ्यात जास्त धोका मुसलमानांचा आहे. ५७ मुस्लीम देश आज आहेत ज्यांच्यात लोकशाही नाही. हुकूमशाही आहे. परत चीन सारखे कम्युनिस्ट देश आहेतच. जगाला खरा धोका यांच्यापासून आहे. अजून एक गंमत आहे. या सर्व पॅलेस्टाईन मुलांना काही करून अमेरिकेतच राहायचे आहे, कारण ते जर गाझामध्ये परत गेले किंवा कुठल्याही मुस्लीम देशात परत गेले तर त्यांना ठारच मारण्यात येईल. त्यांनी सौदी अरेबियामध्ये जाऊन निदर्शने करून दाखवावीत, लोकशाही असणाऱ्या देशातच यांच्या गमजा चालतात. यांचे आईबाप तिकडे पैसे खातात आणि मुलांना अमेरिकेत पाठवतात. हमासचे नेते क्वातारमध्ये अलिशान हवेल्यात राहातात. उदा. हमासच्या तीन नेत्यांच्या संपत्तीची एकत्रित किंमत आहे ११ बिलियन डॉलर्स. यांची नावे आहेत – इस्माईल हानिये, मुसा अबू मार्झूक, आणि खलीद माशाल. हमासची वार्षिक उलाढाल १ बिलियन डॉलर आहे. असो.
वर दिलेल्या घोषणांमध्ये एका घोषणेने माझे लक्ष वेधून घेतले आणि मी खिलापतवर (कॅलिफेट) एक पुस्तक लिहिणार होतो, (अर्धवट पडले आहे) त्यावेळी वाचलेल्या एका युद्धाची कथा आठवली. यात मुसलमान ज्युंचा व काफिरांचा इतका द्वेष का करतात हे समजते. कारण एकच प्रे. महंमद त्यांचा द्वेष करायचा आणि त्याने जेजे केले तेते करणे प्रत्येक मुसलमानांचे अबाधीकालापर्यंत कर्तव्यच आहे.
घोषणा आहे – खेबा खेबा या याकुद. (khaybar ! khaybar! yaa yaakud)
मराठीत खेबा! खेबा लक्षात ठेवा ज्यूंनो
या युद्धात ज्यूंचा फार मोठा दारूण पराभव झाला होता. लुटालुट तर झालीच, पण स्त्रियांची विटंबनाही करण्यात आली. अनेक सुंदर स्त्रियांना गुलाम बनवण्यात आले आणि कित्येक स्त्रिया ठार मारण्यात आल्या. पुरुषांची, जे पुरुष वयात आले होते त्या सगळ्यांची कत्तल करण्यात आली. ज्यू जमातीच्या प्रमुखाची (बानू नादीर) एक सुंदर मुलगी होती, सफिया, तिला एका सरदाराने (आता नाव आठवत नाही) बटीक बनवली, पण मुहंमदाला ती आवडल्यावर त्याने ती त्याच्याकडून घेतली व तिच्याशी विवाह केला… या युद्धाची आणि ज्यूंच्या पराभवाची ज्यूंना आठवण करून देण्यासाठी ही घोषणा तयार करण्यात आली आणि आजही ती वापरात आणली जात आहे..
यावरून काय शिकण्यासारखे आहे?
१ सर्व परदेशी देणग्यांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे.
गेली ५० वर्षे काय काय झाले असेल देवाला माहीत.
२ शक्यतो त्यावर बंदी आणली पाहिजे.
३ यात फक्त पैसे येतात आणि अतिरेक्यांमध्ये वाटले जातात एवढेच एक कारण नाही.
६ अराजक तत्त्वांमध्ये हे पैसे वाटून अराजक माजवले जाते. आपल्याला अनुभव आलाच आहे,
७ सगळ्यात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित मुद्दा हा आहे की हा पैसा संस्थांमध्ये आला, की उपयुक्त शतमूर्ख प्राध्यापकांचा पगार वाढवला जातो, किंवा नवीन प्राध्यापक नेमले जातात जे डाव्या विचारांचा विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव पाडत राहतात. त्यांचा बुद्धिभेद करत राहतात… वर्षानुवर्षे…
क्रमशः
– जयंत कुलकर्णी.
GIPHY App Key not set. Please check settings