वेगवेगळी फुले उमलली
रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले गेले…
ते दिन गेले…
भ. श्री. पंडितांची ही कविता जेव्हा केव्हा ऐकते, तेव्हा तेव्हा गेल्या दिवसांविषयीची माणसाच्या मनातली हुरहूर किती सार्वत्रिक आहे, हे जाणवून मी नवल करीत राहते. अगदी लहान असताना रानात एकट्या पडलेल्या लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट मी ऐकली होती. एक लहानगा सुंदर पक्षी त्याला मित्र मिळाला आणि न पाहिलेल्या जगाविषयीची किती
GIPHY App Key not set. Please check settings