Panage ~ पानगे / पानगी

Panage ~ पानगे / पानगी

By Purva on from marathifoodfunda.blogspot.com

कोकणात पानगे/पानगी आणि पातोळे हे दोन पदार्थ केले जातात. हे दोन्ही पदार्थ पूर्णपणे वेगळे आहेत. पानगे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.एक प्रकार म्हणजे केळ किंवा काकडी वापरून बनवलेले गोड पानगे, दुसरा प्रकार म्हणजे  जिरे, मिरची, आलं चे वाटण लावून बनवलेले तिखट पानगे आणि तिसरा प्रकार म्हणजे भाकरीप्रमाणे  ना गोड ना तिखट, चटणी किंव्हा कुठल्याही रश्यासोबत खायचे.आज मी त्यातला गोड प्रकार दाखवणार आहे. गौरीचे आगमन झाल्यावर त्या संध्याकाळी नैवेद्यात हे पानगे आमच्याकडे बनवतात.     केळीच्या पानात भाजल्याने पानग्यांना एक छान सुवास येतो.Read this recipe in English, plz click here.साहित्य:तांदूळ पीठ- १/२  कपरवा- १ टेबलस्पूनगुळ- १/४  कप किंवा आवडीप्रमाणे कमीजास्तजायफळ पूड- चिमूटभरपिकलेली केळी- २मीठ- एक छोटी चिमूटभरसाजूक तूप- १ टेबलस्पूनकेळीची पाने- गुंडाळण्यासाठीकृती:गुळ हाताने मोडून किंवा किसून घ्या.  आणि अगदी थोड्याश्या पाण्यात विरघळून घ्या.केळ कुस्करून घ्या.त्यात रवा, तांदुळाचे पीठ , मीठ घालून व्यवस्थित कालवून घ्या.  नंतर त्यात गुळाचे पाणी टाकून मळून घ्या. तूप टाकून पुन्हा मळून घ्या. कणिक फार घट्टही नको आणि सैलही.अर्धा तास हे कणिक झाकून ठेवा.अर्ध्या तासानंतर पुन्हा मळून त्याचे ३ ते ४ गोळे करा.पाण्याचा हात लावून केळीच्या पानावर भाकरीप्रमाणे थापून घ्या. खुप जाड थापू नका. (माझ्या सासूबाई फार पातळ थापत नाहीत पण तुम्ही आमच्या पानगीपेक्षा पातळ थापले तरी चालेल.)पानगा थापून झाला कि पण दुमडून त्याचे पाकीट बनवावे.हे पाकीट गरम तव्यावर झाकण ठेवून २-३ मिनिटे भाजून घ्यावे.नंतर दुसऱ्या बाजूने २-३ मिनिटे भाजून घ्यावे. केल्याचा भाजून झाल्यावर पानातून हलकेच सोडवावे.गरम गरम पानगे साजूक तूप आणि दुधाबरोबर खायला द्यावेत.  टीप: आम्ही एकदा तांदुळाच्या पीठाऐवजी गव्हाचे पीठ आणि चिमूटभर बेकिंग पावडर वापरून पानगे केले होते. छान झाले होते.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!