हाँ से ना तक ........!!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

मीरा आणि पियुष एक नोकरदार जोडपं. इतर नोकरी करणाऱ्या स्त्रियांप्रमाणेच मिराच्या मागे घर सांभाळून नोकरी सांभाळायची कसरत होती. सकाळी आठ वाजता घर सोडलं तरच वेळेवर कामाला जाता येई. रोजचा डबा बनवुन, छोट्या मुलीला सकाळी लवकर उठवून तिचं खाण पिणं आवरून पाळणाघरात सोडून जाता जाता तिची फार तारांबळ उडे.  ऑफिसमधल्या कामाचं प्रेशर ते वेगळंच. सगळीकडे वेळा गाठताना तिचीच वेळ निसटून चाललेली. येतानाही मुलीच्या ओढीने घर गाठण्यासाठी धावाधाव........ ट्रेन मधल्या तुडूंब गर्दीत कोंडलेला जीव, बाहेर पडताना अर्धमेला व्हायचा नुसता.पण कुठली उसंत. पोरीला घ्यायचं अन घराच्या दिशेने सुटायचं.नवऱ्यासाठी ताजा ताजा स्वैपाक करून वाढायचा. पोरीला गोष्टी सांगून तिचं मनोरंजन करून भरवायचं. आणि त्यांचं भागल्यावर आपल्या पोटात अन्न नुसतं ढकलायचं. कारण इतकं थकून गेल्यावर खायची इच्छाच नसायची तिला.कधी एकदा पाठ टेकते असं होऊन जायचं.  मुलगी कधी ती येईपर्यंत थांबायची तर कधी बाबांच्या कुशीत दमून झोपी जायची.आणि मग सारं आवरून ही हुश्य ss करून बेडवर आडवी पडायची.पण एवढ्यात कुठे विसावा तिच्या जीवाला.......ती टेकली रे टेकली की तिचा पती परमेश्वर तिला जवळ ओढायचा. अरे हे पण राहिलं होत नाही का???याचं बरं आहे सर्व हातात मिळतं, कामावरून घरी आल्यावर रिलॅक्स व्हायला वेळच वेळ!!!माझीच चुकी आहे म्हणा.....तिला फार वाटे, आता नाही... नको बोलावं पियुषला......सांगावं कंटाळा आलाय आज, थकलीये रे मीनाहीच बोलता यायचं तिला.....सोपवून दयायची ती शरीराला, स्वतःचा उरला सुरला त्राण काढून घ्यायची त्याच्याकडून....... आणि मग तळमळत घालवायची रात्र......का याला समजत नाही......का दिसत नाही माझी ओढाताण.......का माझ्यावरच सर्व सोपवून मोकळा झालाय हा.....घर दोघांचं मग साऱ्या जबाबदाऱ्या दोघांच्या नको का???आणि रात्री माझा मुड नसताना सुद्धा का करायचं हे सर्व????दोघांच्या राजीखुषीने झालं पाहिजे ना हे, हळू हळू फुलत गेलं पाहिजे ना सारं, माझ्याकडून तर यंत्रवत होतं कळत नाही का याला.....नाही आवडत मला हे आंबलेल्या शरीराने करायला. कसं नाकारू ???लग्नाचं लेबल लागलं की स्त्रीच्या मर्जीविरुद्ध होणाऱ्या संबंधांना काय नाव द्यायचं???? का तिने लेबलाखाली घुसमटतच रहायचं???अशावेळी दुसरं मन खळबळून उठायचं, बस सहन करत. जन्म घालवं यातच. अगं जरा शिक नाकारायला, शिक सगळ्या गोष्टीची योग्य सांगड घालायला....नको डोईजड करू जगणं स्वतःच.....तुलाही आहे तुझ्या मर्जीने जगण्याचा अधिकार...... धावपळ हेच जीवन नाहीये तुझं.....आधीच खूप गृहीत धरलं गेलंय तुला..... आता थांबवं हे सगळं......खरंच थांबवं आता सगळंतिलाही थांबवावसं वाटतच होतं सर्व........दुसरं मन जिंकलं यावेळी.........अती जे झाल होतं. आज मीरा मनाशी निर्धार करूनच उठली.हो, आजच.....आज नाही तर कधीच नाही.......... नेहमीप्रमाणे तिला पळापळ न करताना बघून पियुषने विचारलं, काय ग आज सुट्टी??मीरा म्हणाली मी घेतलीये आज सुट्टी.....कंटाळा आला मला धावण्याचा......थकलीये मी एकटीच संसार सांभाळून .......नाही जमणार आता मला सर्वांचे डबे चहा नाष्टा करून पोरीला सोडून जीवाची दमछाक करत ऑफिसला पोचायला. नाही जमणार घरी आल्यावर सारं एकटीनेच करून स्वतःला आणखी दमवायला.तुला पुढे यावं लागेल......नोकरी दोघे करतो, घर दोघांचं, मुलगी दोघांची मग धावपळ दोघांची का नाही?आजपासून सर्व गोष्टीत मला तुझी साथ गरजेची आहे.....मदतीची फिलिंग नकोय.......जबाबदारी आहे दोघांची.....हक्क आहे दोघांचा......संसार आहे दोघांचा.....तो दोघांनी मिळून फुलवायचा.....बोल जमेल तुला ......तू कधी विचारच नसशील केलास, सर्व बिनबोभाट होतंय ना?आणि हो रात्रीची साथ सुद्धा तेव्हाच मिळेल जेव्हा दिवसभर मला तू हात देशील......पिचलेल्या देहाने आणखी रात्री नाही उजळू देणार मी तुझ्या.खूप झालं आता......रात्री जे कुशीत शिरल्यावर "आय लव्ह यू" बोलतोस ना ते कृतीतून दाखव. नुसतं तोंड देखल बास झालं.आता मी पण मला जपणार आहे........मी आता न पेलवणाऱ्या गोष्टींना नाही म्हणणार आहे, हळूहळू का होईना पण मी आता सुधारणार आहे. बोलता बोलता अश्रूंचा पाट वाहू लागला डोळ्यातून, एवढा कणखरपणा तिचा तिलाच टोचू लागला....नवरा आला भानावर.....प्रेम होतं त्याचं; पण मनुष्य स्वभावाप्रमाणे चालतय ना तर चालू द्या यातला होता तो.आता अंगावर शेकलं गेल्यावर तो ही बिथरला. त्याला ही दोघांचं घर सावरायचं होतं. तो साथ दयायला तयार झाला, फक्त थोडा वेळ मागितला सारं काही नॉर्मल व्हायला......प्रॉमिस केलं त्यानं तिचं मन सांभाळायचं. मिराला मोकळं मोकळं वाटलं......दाटलेलं सर्व बाहेर पडलं.....मनाची ही अवस्था कितीतरी वर्षांनी अनुभवली तिने.......आज किती तरी दिवसांनी नाही महिन्यांनीच बहुतेक बेडवर लोळत फेबुवर स्टेटस अपडेट केला तिने......नाही म्हणण्याच्या कलेतील पहिली पायरी आज मी सर केली.......हळूहळू नैपुण्य मिळवायचंय मला त्यात......सख्यांनो तुमचं काय??©स्नेहल अखिला अन्वित
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!