स्त्रीमधली मादी न पाहणारा पुरुष ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

हे सगळं वाटतं तितकं साधं सोपं नसतं. इथल्या प्रत्येक बाईची कथा वेगळी असते. त्यांचा इतिहास, त्यांची सुख दुःखे सगळं जगावेगळं असतं. हे जीवन नुसतं कठीण नसतं तर भयंकराच्या दारावरचं रोजचंच मरण असतं. इथल्या बायकांत गुंतून पडलेली अनेक माणसं मी पाहिलीत अन अजूनही पाहतो आहे. हरेक कथेचा पदर भरजरी आहे पण ती जर सोनेरी नसून बाभळीहून तीक्ष्ण टोकदार काटेरी आहे...रेड लाईट एरियातील तमाम माता भगिनींना आणि मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा मी कधीच देत नाही कारण महिला असल्यानेच त्यांची ही अवस्था झालेली...इथल्या बायकांत मादी न शोधता स्त्रीत्व शोधणार्‍या पुरूषांना मात्र मनःपूर्वक शुभेच्छा..इथे पोस्टसोबत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन'मधले दोन व्हिडिओ दिलेत. पहिल्या प्रसंगात त्यांच्यातलं प्रेम दिसतं आणि दुसर्‍या प्रसंगात रखरखीत वास्तव दिसतं....आपण केंव्हाही लग्नाला तयार आहोत असं तिच्यापुढे म्हणणारे बरेच सापडतात मात्र सार्वजनिक रित्या बोलताना तिची माझी फक्त ओळख आहे नातं नाही इतकंच सत्य रामोर येतं. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी कमी माणसं हे हलाहल पचवू शकतात, हे हलाहलच आहे कारण या बायकांच्या नावापुढे आपण आणि आपल्या समाजानेच विषवलयांचे लेपन केलं आहे...दिगूचं शांतावर प्रेम असतंच मात्र आईच्या इच्छेसाठी तो कळ सोसून असतो. दरम्यान ती मरणासन्न होते तेंव्हा डॉक्टरसमोर तो आपलं नातं सांगू शकत नाही. ही 'सिंहासन'मध्यल्या दिगू टिपणीसची हतबलता नसून आपल्या समाजाची हताशा आहे. कारण या बायकांनाच मुळात आपण माणूस मानत नाही मग यांच्याशी नातं जोडणारा साहजिकच बदनामीची शिकार होतो...#woMAN's day- समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!