सून ठरावी भाग्यवान.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

हे बघा ताई, काल माझ्या सासूनं मला मोबाईल घेऊन दिला. बघा तर कसला भारी आहे तो. एक त्यांच्या पोरीला अन् एक मला घेतलाय, अगदी सारखेच आहेत दोघींचे, यशोदा खूपच आनंदाने सांगत होती. चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी असं काहीतरी झालं होतं तिचं.अनुताईंनी फोन हातात धरून न्याहाळून बघितला, सुरू करून बघितला, त्याचं कौतुक करून पुन्हा तिच्या हातात दिला आणि म्हणाल्या, भाग्यवान आहेस खरी, अशी सासू सर्वांंनाच नाही मिळत.यशोदा म्हणाली, मग?आहेच मी भाग्यवान!! धा हजाराला पडलाय एक, माझ्या सासूनी तरीपण घेतला दोघींना. अशी कुठली सासू घेती का काय सूनेला?पुढे कितीतरी वेळ ती आपल्या सासूचं गुणगाण गातच बसली होती. अनुताई तिच्या सासुला काय ओळखत नव्हत्या? थोडीथोडकी नव्हे वीस वर्ष दिलेल्या वेळेला दारात असायची ती. आता वय वाढलं, पायाचं दुखणं मागे लागलं, म्हणून सूनेला पाठवायला लागली होती.अनुताईंच नाही तर अख्खा गाव तिच्या सासूला, गंगुबाईला चांगलाच ओळखत होता. सगळ्यांना वाटायचं गंगुबाई आपल्याकडे कामाला असावी.पण गंगुबाई कितीजणांकडे जाणार होती. दहा घरं होती पहिल्यापासूनची, ना त्यांनी तिला सोडली ना ती तिथून हलली.यशोदा काम करून गेली, तशा अनुताई बाहेर झोपळ्यावर येऊन बसल्या. पण यशोदेचा आनंदी चेहरा काही यांच्या डोळ्यासमोरून जाईच ना!!त्यांना फार कौतुक वाटलं गंगुबाईचं, बघितलं तर अडाणी, धुणीभांडी करणारी बाई, पण मनाचा मोठेपणा तो किती असावा? बरेचदा म्हणायची आपल्याला, माझी लेक, तशीच माझी सून!!दुसऱ्याच्या घरून आलेली पोर, खूष राहिली पाहिजे बा आपल्या घरात. आता तर रोज पाहतेय ना मी, मोबाईल घेतला ते सोडलं तरी यशोदेच्या तोंडी नेहमी कौतुकच असतं गंगुबाईचं. तिची दोन बाळंतपणं देखील गंगुबाईनेच  काढली. अगदी मुलीसारखा आराम दिला होता, सारखं तोंडात असतच की यशोदेच्या. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); अनुताईंना वाटलं, खरंच कमाल आहे या गंगुबाईची!! नवऱ्याने घराकडे कधी बघितलंच नाही. सदानकदा पिऊन पडलेला असायचा कुठेतरी. या बाईनी लोकांची धूणी-भांडी करून पोरांना वाढवलं. साथ कोणाची तर घरी असलेल्या अपंग नणंदेची. ही कामाला जायची, तर पोरांचं सगळं नणंद बघायची. पायाने अधू होती, पण मानसिक बळ मोठं होतं. दोघींनी एकमेकींच्या आधारे सगळं निभावून नेलं. अजूनही आहेत एकमेकीला धरून.तरी दुःखाने कुढलेलं, कधी पाहिलच नाही मी या गंगुबाईला. मजेत गाणी गुणगुणत काम करतानाच दिसली बरेचवेळा!! कुठं नेऊन टाकत असावी सगळी दुःख ती?त्यातून या बाईला पैशाची हावही नसावी? अशी कशी माणसं असतात एकेक?खरंच ही गंगुबाई सर्वांत कमी पैसे घेऊन काम करायची. कुणाला माझा पगार वाढवा, हे सांगायचीच नाही कधी. काही लोकं स्वतःहून वाढवायची. काही लोकं मात्र फायदा घ्यायची. अनुताई किती सांगायच्या, अगं बाई तोंड उघडून सांगत जा लोकांना. पण तिला ते कधी जमलंच नाही. तशी थोडीफार जमीन होती, ती त्यावरच समाधानी होती.कोणाशीच कुठल्याही गोष्टीसाठी वाकड्यात जाणं, तिला जमलंच नाही कधी. नवराही होता तसाच झेलला, त्याने जबाबदारी अर्ध्यातच सोडली, पण हिने मात्र कष्ट घेऊन पूर्ण केली. सगळं आहे तसं मनापासूनच स्वीकारलं, त्यामुळे मनात कोणाबद्दल राग उरलाच नसावा तिच्या.यशोदेचा, गंगुबाईचा विचार करता करता, अनुताईंंची गाडी आपल्या सूनेवर येऊन थांबली.त्यांची सून शहरात राहायची. राग नव्हता, पण विशेष सख्यही नव्हतं दोघींच्यात. दोन वर्षच झाली होती तशी मुलाच्या लग्नाला. अनुताईंंच्या मनात आलं, या अडाणी बाईचे सूर जुळू शकतात सूनेशी, तर माझं का असं होतंय? काय शिकले मी इतक्या वर्षात गंगुबाईकडून? सुशिक्षितपणाचा शिष्टाचार आड येतोय का मध्ये आपल्या? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); आपण तर फोनवरही परक्यासारखे दोन शब्द बोलतो आणि मुलाला मात्र सगळं इत्थंबूत विचारत बसतो. बरचसं त्याला माहितीही नसतं. सण सोडून सहज मनात आलं म्हणून काय घेतलं आपण तिच्यासाठी? उलट तिनेच स्वतःहून आपल्यासाठी पर्स आणली होती. तिने हात पुढे केलेला, आपणच आपला आखडता घेतला.आज यशोदेचे आनंदाश्रू पाहून खरंच वाटतय, आपणही पुढाकार घेतला पाहिजे आता. ठरलंच, आज रात्री मी तिच्याच मोबाईलवर फोन करेन, आणि तिच्याशीच बोलेन, हळूहळू मोकळं व्हायला सुरुवात केलीच पाहिजे आता. अशिक्षित गंगुबाई सूनेशी इतकं छान नातं फुलवू शकते, तर माझ्यासारख्या शिकलेल्यांनी ते इतकं क्लिष्ट का करावं?आज हात मी पुढे करेन, नंतरही करत राहीन, मलाही आवडेल बघायला, माझ्यासाठी तिच्या डोळ्यात पाणी तराळलेलं, कुणी माझ्याही सुनेला यशोदेसारखं भाग्यवान म्हणलेलं.........!!ही गंगुबाई माझ्या मावशीच्या घरी येत होती, आता तिची सून येते. माझ्या मावशीला वाटलं, मी तिच्यावर लिहावं. तिचं अडाणी असून सुनेशी असलेलं नातं खूप कौतुकास्पद आहे आणि एकंदर जीवनही. मावशीने खूप अभिमानाने तिची सगळी माहिती पुरवली आणि मी कथा गुंफली...........©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!