सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

By Purva on from marathifoodfunda.blogspot.com

गोरी पान करंजी नावेसारखी दिसते,पोटातले खाताच आणखी खावी वाटते!Read this recipe in English, click here.साहित्य:रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप, तळण्यासाठी- आवश्यकतेनुसारपारी-मैदा- १ कप (२ वाट्या)बारीक रवा- १/२  कप (१ वाटी) मीठ- चिमुटभर गरम रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप (मोहन)- ५ टेबलस्पून दुध किंवा दूध+पाणी- अंदाजे १/२  कप  सारण/चुरण-बारीक रवा- १/२ कप (१ वाटी)सुके खोबरे, बारीक खिसुन- १/२ कप (पाऊण वाटी ते १ वाटी)पिठीसाखर- अंदाजे ३/४ कप (१ वाटी) ~ आपल्या चवीप्रमाणे थोडे कमी-जास्त घ्यावे पण सारण जास्त गोडच हवे, कारण नंतर करंजी खाताना ते बरोबर लागते.खसखस- १ टेबलस्पून (ऐच्छिक)चारोळी- १ टेबलस्पून वेलची पूड- १ टीस्पूनजायफळ पूड- १/२ टीस्पूनसाजूक तूप- १ टीस्पूनकृती :प्रथम खोबरे चुरचुरीत भाजून घ्या व हाताने बारीक चुरा, खसखस भाजून त्याची भरड पुड करावी, नाही केली तरी चालेल. १ टीस्पून तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. नंतर दिलेले सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवावे. रवा-मैदा एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे व मोहन घालावे. थोडं थंड झाल्यावर सर्व पीठ हाताने चोळून घ्यावे म्हणजे सर्व पीठाला मोहन लागते. दुधाने घट्ट पीठ भिजवावे व झाकून ठेवावे. २ तासानंतर पीठ कुटून घ्यावे किंवा फूडप्रोसेसरला बारीक तुकडे करून फिरवावे. भिजवलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करावे. त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको. सारण भरून घ्यावे व पुरीच्या कडेला बोटाने जरासं दूध लावून घडी करून दाबावे म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातण्याने कापून घ्यावे. अश्या प्रकारे करंज्या तयार करून घ्याव्यात.  तयार कारंज्यावर ओले (भिजवून घट्ट पिळलेले) फडके ठेवा म्हणजे त्या सुकत नाहीत. कढईत तेल/तूप चांगले तापवून घ्यावे. मात्र करंज्या मध्यम ते मंद आचेवरच तळाव्यात. तळताना करंजीवर तेल घालत घालत तळावे. तळलेल्या करंज्या टिशु पेपर किंव्हा कोऱ्या पेपरवर पसरून ठेवाव्यात.करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भराव्यात. टीप:आम्ही सारण जरा जास्तच करून ठेवतो. कारण तुळशीच्या लग्नाच्या वेळेला पुन्हा करंज्या कराव्या लागतात. सारण उरले तर फ्रिज मध्ये ठेवावे, ६ महिने टिकते. पुन्हा करंज्या करायचा कंटाळा आला तर कणकेचे लाडू किंवा मेथीचे लाडू मध्ये घालावे.   
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!