सहेला रे....

By anaghaapte95 on from anaghaapte.blogspot.com

सहेला रे.... हा सहेला कोण तर सखा जीवलग ज्याच्याशी आपले सूर जुळलेत तो किंवा ती किंवा ते..... त्याच्या रूपाशिवाय, देहाशिवाय चा तो किंवा ती..... जे अस्तित्व मनाला व्यापून उरलंय, जे आपल्या श्वासातून जाणवतंय, जे नाव आपल्या कानात गुंजतय ते.....आ मिल गाये... काय  नक्की गायचं? आपल्या आयुष्याचे गाणे.... तर तुझ्या सुरांचे काही पेड माझ्या सुरांचे काही घेऊन एक सुरेख वेणी विणली आणि मिळून जे बनले ते आपण दोघांनी मिळून गायलेले, आपले बनून उमटलेले सूर जे तुझ्या माझ्या मनाला व्यापून उरले आहेत...... सप्त सुरन के भेद सुनाये....सुरांचे व्याकरण नाही, तुझ्या माझ्या गुण अवगुणांवर बोलूया, आपल्या आवडीनिवडी सांगूया, जाणून घेऊया, दोन वेगळ्याच व्यक्ती आहोत, सारे वेगळेच असणार आहे आपले आणि तरीही जीवास एक कोणता तरी सूर घट्ट जोडून ठेवेल, हे फरक ओळखून, जाणून एकमेकांसोबत जगूया .... आणि हे सारे आपण का करायचे ?तर जनम जनम का संग ना भुले.... अब के मिले सो बिछूड ना जाये, असे अद्वैत असणारे आपण... हा संग मनाचा,जाणिवांचा, संग स्पर्शाचा, गुणांचा अवगुणाचा एकमेकांच्या सहवासाचा, एकमेकांची सवय होण्याचा, संग नजरेचा, संग जन्मोजन्मीचा.... या वेळी मात्र कायमचे एकत्र येऊया सारे तुझे सूर तू घेऊन ये, सारे माझे मी घेऊन येईन, वादी संवादी सूर असतील, प्रयत्नपूर्वक तानपुरे जुळवून घ्यावे लागतील, थोडी जीवाची घालमेल होईल या साऱ्यात, पण शेवटी त्या सुरांची मैफल आयुष्याचे सोने करेल..... सहेला रेhttps://youtu.be/iTHO1N7FJDg
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!