सहल छत्रीची

सहल छत्रीची

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

" अरे अरे अरे हो हो जरा हळू ...पण छे ! आपले ऐकणार ती ही माणसे कसली ?सकाळपासून इथे काय सुरु आहे कोण जाणे ! सारखे इकडच्या गोष्टी उचलून तिथे टाक आणि तिथल्या इथे. माझा सभोवताल पूर्णपणे अस्ताव्यस्त करून टाकला होता या मुलीने . एवढे काय विशेष शोधत होती कधीपासून कपाटात देव जाणे ! असा विचार मी करत असतानाच चांगले खेचूनच मला बाहेर काढले हिने. तिने एकदाचे हुश्श केले पण मी मात्र बाहेर पडताच आ वासला. डिसेम्बर महिना सुरु आहे चांगला थंडीचा , हवेत बऱ्यापैकी गारवाही जाणवतोय, या काळात खरे पहिले तर ना पाऊस असतो ना ऊन ... मग हिला कशी बरे माझी म्हणजे छत्रीची इतकी आठवण झाली असेल. इतके जोरात ओढले मला कि त्या हिसक्याने अंगच दुखायला लागले. मला उघडून , फिरवून वैगरे पाहून झाले आणि पुन्हा काही विचार करत ती कपाटात शोधाशोध करू लागली. मला तर काही उमजेच ना ! काय सुरु आहे हिचे ते. मग पुन्हा एक हिसका देत ओढतच तिने एक गुलाबी रेनकोट बाहेर काढला. गुदमरलेल्या अवस्थेत तो बिचारा कपाटात एका कोपऱ्यात निपचित पडून होता. त्यालाही तिने चांगलेच जागे केले. माझ्यासारखाच तो देखील बाहेर आला तो चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊनच. आम्ही दोघे कधी एकमेकांकडे तर कधी खोलीत इतस्ततः पाहत उभे होतो. टापटीप खोलीत सगळीकडे दिसत होते ते रंगीत स्वेटर्स , उबदार शाली आणि  गोधड्या... हे सर्व असताना आमचे इथे काय काम? हा आम्हा दोघांनाही प्रश्न. खरंच सांगते त्या सर्वांच्यात आम्ही खूप निराळे वाटत होतो. पण आम्ही काही भावना व्यक्त करणार इतक्यात पुढच्याच क्षणी तो या मुलीच्या बॅगेत कोंबला गेला आणि मी तिच्या मुठीत. " आई मी येते गं "म्हणत ती घराबाहेर पडली. आणि सोबत मीही हिवाळ्याच्या सुट्टीची मज्जा अनुभवण्यासाठी बाहेरच्या दिशेला वळली. पण कसला हिवाळा न कसली सुट्टी! एव्हाना सकाळचे ८.३० झाले होते पण आकाशात सूर्याचा मागमूसही दिसत नव्हता. पहाटे ५ वाजेचे गार वातावरण दिवसाच्या नको त्या वेळी सर्वत्र जाणवत होते. धुक्यामुळे सर्वच अगदी धूसर... आणि हे काय या अशा धुक्यात चक्क पाऊस. तेच थेंब ... त्याच धारा. आत्ता समजले का आपले असे परत इतक्या लवकर स्वागत झाले ते. आता माझा तिच्यावरचा राग बऱ्यापैकी निवळला पण पावसावर खूप रागावले मी खरेच. चांगली आराम करत होते ना मी ! उगाच हा मध्येच असा कसा येऊ शकतो बरे... स्वतःही असा ना सांगता आला आणि आम्हालाही कामाला लावले. पण आपले परमकर्तव्य लक्षात घेऊन मी तो राग दूर केला. आणि आभाळातुन कोसळणारे गार थेंब जसे अंगावर जाणवले तसे मी लगबगीने पुढे आले. आपला लाल पोपटी रंग दिमाखात मिरवत मी ऐटीत माझ्या मालकिणीच्या डोक्यावर स्थानापन्न झाली. कोंदटलेले सारे श्वास आता मोकळे झालेसे वाटले. इतक्या लवकर अशी अंघोळ पुन्हा मिळेल असे वाटले नव्हते पण या वर्षी ही देखील जादूच. मी जरा वाकून माझ्या बाईसाहेबांच्या कानात पुटपुटले," आता ना मान्सून ना पावसाळ्याचे आसपासचे दिवस. मग हा पाऊस कसला?"यावर ती लगेच उद्गारली ," हा पाऊस 'ओखी' वादळाचा."'वादळ ?'...बापरे ! मला वादळाची तर खूप भीती वाटते. मागच्या वेळी जराश्या हवेत सुद्धा मी पार उलटी होऊन गेली होती. आणि खूप हाल होतात मग माझे. कधी कधी हाडे खिळखिळी होतात तर कधी एखादे फ्रॅक्चर... त्यात यांना वेळ मिळाला तर थोडे उपचार तरी होतात नाहीतर असतेच मी तसेही सोसत.तशी मी शरीराने नाजूकच, पण हे वर्षानुवर्षे इतके उन्हाळे- पावसाळे झेलून फारच सोशिक बनलेय मी.बरे झालेय बाबा, या बयेने रेनकोटदादालाही सोबत घेतले आहे ते. म्हणजे ऐन वेळी माझ्या मालकिणीचे हाल नकोत व्हायला. तशी मागच्या अनुभवानंतर तीही चांगलीच सतर्क झालेली दिसतेय. ते काही असो... पण या ओखीच्या निमित्ताने या वर्षी आमची लवकर ही अशी मनासारखी आंघोळ झाली ते विशेष.एखाद्या सुट्टीच्या दिवसांत नव्या ऋतूच्या देशात मस्त सहल होते आहे असा फील येतोय मला तर... त्या ओखीच्या वादळाचीच कमाल आणखी काय . पण अरे पावसा , असे सारखे सारखे पावसाळे नको रे दाखवूस. कन्फ्युज व्हायला होते मलापण. अजून खूप वर्षे जगायचे आहे मला.त्यासाठी योग्य झोप हवी ना ! तेव्हा वर्षावर्षाला ये पण तुझ्या वेळीच. आता जरा आराम करू दे मला. "- तुमचीच प्रिय विश्वासू ,   एक छत्री. - रुपाली ठोंबरे .
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!