समिक्षा

समिक्षा

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

लग्न करून नवी नवरी नव्या घरात येते. नव्या माणसांमध्ये स्वतःला मिसळू पाहते. तेव्हा विविध स्वभावाची आणि विविध प्रकारची नाती आणि त्यांच्यासोबत होणारा पहिला संवाद , पहिला सहवास हा एक कुतूहलाचा आणि विशेष भाग असतो... अगदी नव्याने त्या कुटुंबात प्रवेशलेल्या वधू साठी आणि तिचे आनंदाने स्वागत करणाऱ्या परिवार सदस्यांसाठीसुद्धा. या यजमान मंडळींमध्ये सर्वच वयाचे आणि विविध प्रकारचे सारेच जण सामील असतात. अगदी ८५ वर्षांचे आजोबा पण असतात आणि अगदी नुकतीच जन्मलेली एखादी परीदेखील. आणि अशा या कुटुंबात जेव्हा ही नववधू आतुरतेने प्रवेशते तेव्हा तिची नजर शोधत असते एखादी अशी मैत्रीण जिच्यासोबत ती अगदी मनमोकळेपणाने संवाद साधू शकते. मी फार भाग्यवान होते जिला अशा बऱ्याच मैत्रिणी सासरच्या गोतावळ्यात मिळाल्या. पण त्यातली सर्वात जवळची वाटणारी आणि जिच्यासोबत वेळ घालवायला, बोलायला कधीही आवडते ती म्हणजे या कुटुंबातल्या बच्चेकंपनीतली एक खास मैत्रीण. खरेतर प्रत्येक घरात ही बच्चेकंपनी म्हणजे नव्याने त्या घरात येणाऱ्यांसाठी सहज संवाद करण्यासाठी जागा निर्माण करणारी महत्त्वाची पिढी. यांच्याशी लगेच कोणीही मिसळून जातं आणि तेही अगदी सहज या नव्या पाहुण्याच्या रममाण होतात. अशीच एक नात्याने माझी पुतणी असणारी पण एका मैत्रिणीसारखी असणारी समीक्षा या जीवनात आहे. नाते काही जरी असले तरी मनापासून तिच्यामध्ये मी नेहमी एक छान मैत्रीणच पाहिली. कुटुंबातील कार्यक्रमांच्या निमित्ताने कधी कधी होणाऱ्या भेटी असोत किंवा एकत्र होणाऱ्या सहली...आम्ही कायम एकत्र. एक वेगळ्याच गप्पागोष्टी सुरु असायच्या आमच्यात. प्रत्येक गणपतीत सजावट करताना येणारी धमाल तर कधीच विसरता येणार नाही. मुंबई-पुणे असे दूरचे अंतर असले आणि आपापल्या काम-अभ्यासाच्या किती जरी गडबडी असल्या तरी व्हाट्सअँप वर का होईना पण कायम आम्ही सहवासात असतो. या बालमैफिलीच्या सहवासात आपणही बालविश्व् जगू लागतो ते खरोखर कितीदातरी अनुभवले. थोडीशी शांत , मनमिळावू , कधी खट्याळ , जितकी इतर गोष्टींत चपळ तितकीच अभ्यासात चाणाक्ष...अशी ही सखी म्हणजे एक समीक्षाच, एका नात्यातल्या सुंदरतेची. समिक्षा, जशी आहेस तशीच कायम हसत रहा, आनंदी राहा. दिवसामागून दिवस जात राहतील पण तू मात्र कणाकणाने का होईना पण कायम प्रगती करत राहा. कधी चुकून अपयश जरी पावली आले तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असे समजून त्या क्षणांना सतर्कतेने ओलांडून तू नव्या आनंदात सहभागी हो. हरणे आणि रडणे याचा स्पर्श मात्र कधीही आसपास होऊ नये. कायम प्रयत्न करत राहा... उत्साहाने जगत राहा...फुटणाऱ्या इवल्याशा पंखांतील बळ एकवटून नव्या क्षितिजाशी झेप घे पण सतर्कतेने.. आणि मग बघ तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची जागा कशी त्यांच्या पूर्ततेने घेतली जाईल. पण या सर्वासाठी गरज आहे ती प्रयत्नांची, मोठ्यांच्या आशीर्वादाची आणि देवाच्या कृपेची. हा आशीर्वाद आणि प्रयत्न करण्याची शक्ती आणि बुद्धी तुला नेहमी आजन्म मिळत राहो हीच आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि भवितव्यातील पुढच्या अनेक टप्प्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. ही प्रार्थना आणि ही शुभेच्छा हीच तुझ्या वाढदिवसादिवशी तुला माझ्याकडून भेट. ही भेट सदा तुझ्या संगे नक्कीच राहील.पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा !!!- रुपाली ठोंबरे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!