संक्षिप्त शनिमाहात्म्य

संक्षिप्त शनिमाहात्म्य

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य '   ( श्लोक १ ते ९१)ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। गुरु संत श्रोते पाठका। अखिलांसी नमो नम : ।१मुळ कथा गुर्जर भाषेची। नवग्रहांच्या श्रेष्ठत्वाची। आणि महाराजी विक्रमांची। उज्जायिनी नगरिच्या।२एके दिवशी प्रभातकाळी। नवग्रहांची चर्चा रंगली। पंडितांनी महती वर्णली। स्वबुध्दीपरत्वे सभेमाजी।३राजा विक्रमाने प्रश्ण केला।ग्रहश्रेष्ठत्वाचा द्या दाखला।सांगुन स्थिती-गतीमतिला।रुप पूजा वर्णावी।४एकाच्या मते रवि महान ।दुजा म्हणे चंद्रमा गहन।तिस-याचे निश्चित वचन। मंगळ वरिष्ठ मानावा।५चौथा म्हणे बुध बळवंत।गुरु श्रेष्ठ पाचव्याचे मत।शुक्राचा महिमा त्रिलोकात। सांगे विद्वान सहावा।६पुढे राहू - केतू कथिला। अंती एकजण उटीला। शनि श्रेष्ठत्व सांगू लागला। साकल्ये करोन।७तो म्हणे शनि सर्वश्रेष्ठ। बलाढ्य एवं कोपिष्ठ। करितो कोणासही भ्रष्ट। दृष्टि चमत्कारे ।८भाविकांचे करितो रक्षण। दुर्जनास टाकतो ठेचून। जातीचा तेली पंगू चरण। कृष्ण वर्णी आहे जो.।९काळभैरव त्याचे दैवत। जयावरी करी दृष्टीपात। करितो नामशेष उदध्वस्त। जीवन तो त्या जीवांचे।१०रविराजाचा पुत्र शनि। पाहे पिता जन्मताक्षणी। उठतो कष्ट देही झणी। पित्याच्या सर्वांगी.। ११पितृरथीचां सारथी। पांगुळा झाला निश्चिती।अश्वांचिया नेत्रापती। आले पूर्ण अंधत्व।१२थकले उपाय अनंत। जाहले धन्वंतरी त्रस्त। कृपा दृष्टी होता समस्त। आरोग्य पावले। १३हे  ऐकोनी राजा विक्रम। हसून बोलला सप्रेम। हा नाही सुपुत्राचा धर्म। जनकास छळण्याचा। १४या समयी यानी बसोनी। चालले होते क्रोधी शनी। विक्रमाचे वचन ऐकोनी। तत्काळ सभेसी पातले। १५राजा अश्चर्यचकित जाहला। शनिचरणी प्रसादा धावला। परी शनिश्चरे अव्हेरिला। कठोर वाक् ताडनाने।१६यमग्राज म्हणे रे वाचाळा। निंदका खळा मस्त टवाळा। कन्याराशी आलो तुझ्या मुळा। करीन मी गर्वहरण। १७राजा झाला नतमस्तक। हरपला त्याचा विवेक। शनिदेव दावोनि धाक। सत्वर विमानकंपनीची बैसले। १८खिन्नवदने सभा भंगली I राजा विक्रमास ग्लानी  आली Iमानसी कृष्णछाया दाटली I अंतरंगी सर्वांच्या  I  १९एक मास उलटून गेला I  विक्रमा बारावा शनी आला Iसर्वत्र हाहाकार माजला I अभाविक गांजले I २०या समयी पंडिता सांगती  I शनैश्चर पूजन पध्द्ती  Iआग्रहे विक्रमास म्हणती  I व्रतपालन असे करावे  I २१प्रथम करावे अभ्यगस्नान  I मग करावे एकाग्रचितंन Iअश्वनाल प्रतिमेचे  जून पूजन I करावे विधीवत I २२मृत्तिकेचा कुंभ स्थापावा I तयावरी नाल ठेवावा Iतेलअभिषेक करावा I काळी फुले व्हावी I २३उडीद मीठ शनीस अर्पावे I सत्पात्रा-सोने-लोह-नील द्यावे Iवा काळे घोगडें दान करावे I किंवा अन्न -गुळ -तेल I २४निलाजनं समाभासम रवी पुत्रम यमाग्रजम Iछाया मार्तंड संभुतं तन्नमामी शनैश्चरम I २५हा जप करावा तेवीस सहस्त्र I प्रतिवारी वाचावे शनीस्तोत्र Iसंतुष्ट करावे धार्मिक सत्पात्र I एकभुक्त रहावे शनिवारी I २६राजाने उपदेश ऐकिला I अंतरी फार कष्टी जाहला Iशनी कृपेवरी विसंबला I उदास होऊन I २७पुढे एक दिनी दोन प्रहरी I व्यापारी सौदागर आला नगरी Iघोडे विकावया आणिले भारी I त्याने बहुलक्षणी I २८राजाही मैदानी प्रवेशाला I अभ्यास पाहून हरकला Iएका वारूवरी स्वार झाला I स्वतः च परीक्षा करावया I २९आरूढ नृप  दृष्टीआड झाला I तुरंग तात्काल  गगनी उडाला Iनिबीड दरी जाऊन उतरला I आणि जाहला अदृश्य I३०सौदागर वेशी शनीने I शोधावया लावली राने Iन मिळे राजा म्हणोनी त्याने I केला पैका वसुल I ३१राव चिंताग्रस्त घोर रानी I पश्चिमेस बुडे दिनमणी Iधरती ग्रासतसे रजनी I तेव्हा तो तेथेच विसावला I ३२रात्र सारे पसरे रवितमा I पाऊले नेती राजा विक्रमा Iपोहोचला तामलिंदा ग्रामा I अंत्यत थकून भागून I ३३त्या नगरी एक वैश्य होता I ज्याची अग्नीत मालमत्ता Iत्याची अलौकिका नामे दुहिता I इच्छांवर शोधतसे I ३४त्या धनिके देखाला अतिथी I राजलक्षणे मदनाकृती Iनाम ग्रामादि घेई माहिती I आणि सुस्वागत करितसे I ३५विसावला वैश्यगृही विक्रम I आवरी नित्यनैमित्यिक कर्म Iसेविली पंचपक्वांन्नी उत्तम I अति आग्रह अत्यादरे I ३६उज्जयिनी स्वामीस कन्या द्यावी I असा हेतू धरोनी मनोभावी Iही सुवर्ण संधी न दवडावी I एवं कथिले दुहितसे I ३७लाडक्या पुत्रीच्या इच्छेनुसार I सावकारे धाडीला नृपवर Iपार्कही युक्ती उपवर I राजास शयनमंदिरी I ३८पथिक निद्रागृही प्रवेशला I पाही सुशोभित रंगमहाल Iशृगांर साधने नटविलेला I नवदांपत्यासाठी I ३९विक्रम मनी संशय उपजला I  कोणे हेतू रसरंग सजविला Iसावकारे पाठविले येथे मला I कोणत्या कारणे I ४०नृपती सावधान अंतरी I गाढ निद्रेचे सॉंग पांघरी Iइतक्यात पावली सुन्दरी I सोळा शृगार करून I ४१अलौकिक भाषण चतुर I यौवन शिखरी उपवर Iमधुमीलना झाली आतुर I ऐतदर्थ  पुरुषा जागवी I ४२इशारे करून थकली I रंभा निद्राधीन झाली Iसन्मुख दृश्ये थरारली I चित्तवृत्ती राजाची I ४३भित्ती चित्रातील हंसांने I उड्डाण करोनि लीलेने Iहाराची मौत्यें चचुने I भक्षण केली सत्वर I ४४मदनिका जागी झाली I प्रेमभंगे संतापलेली Iखुंटीवरी पाहो लागली I ठेवलेला मौक्तिक हार I ४५भूमीवरी करोनी पद प्रहार I म्हणे अरसिका देई माझा हार I आणि आपुल्या पंथे जावे सत्वर I कृष्णमुख घेवोनि I ४६परी  तो उत्तरे हार लाभला नाही I ऐकून कोपली  लवलाही Iजनका सांगे तुम्ही स्वगृही I शर्विलक आणला I ४७सावकार अविचारे पेटला I नृपा वाक्ताडन करू लागला Iसेवकी निर्दयपणे ताडिला I हारप्राप्तीसाठी I ४८मारमारून चाकर थकले Iराजदरबारी घेऊन गेले Iचंद्रसेन राजाने ऐकिले I सर्व कथन वैश्याचे I ४९चंद्रसेने  पथिका आज्ञा केली I मुक्ताहार डावी याच पाउली Iनहून सांभाळी त्वचा आपली I चौर्यकर्म शिक्षा म्हणून I ५०विक्रम सांगे वास्तविकता I राजा कोपे कथा न ऐकिता Iआणि दूता म्हणे तोडा आता I हातपाय याचे सत्वरी I ५१हस्तपादरहित शरिर। भुमिशैय्या निलाकाशावर। जलासाठी तळमळे फार। तुषार्त राजा विक्रम। ५२या घटनेस उलटला मास। सोशी अनंत व्यथा प्रार्थीप्रहार। दयार्द्र शनिने चंद्रसेनास। द्रवविले अन्नोदक देण्या। ५३अन्नोदक मिळतसे विक्रमा। मनी स्मरे तो उज्ज्ययिनी महिमा। एके दिनी दिसे स्नुषा उत्तमा। तेलीयाची त्या मार्गी।५४तिचे माहेर नगरी उज्जयिनी।शश्वुर गृहासी जातसे कामिनी। खंडीत देही नृपास ओळखोनी। व्यथित मने थांबली। ५५परस्परांच्या संभाषणातून। अघटीत घडलेले जाणून। आधरे भरपाई यानी बैसवून। आणिले तिने स्वगृही। ५६तया ठका पाहोनी शश्वुर। राज भये कांपे थरथर। हा विक्रम राजा नरवर। स्नुषा सांगे निश्चये.। ५७ऐकोनी दावे चंद्रसेनाकडे। म्हणे आणू कां तस्कर बा पुढे। अनाथा पाहोनि ह्दय रडे। माझे धर्मबुध्दीने। ५८भक्तीचा हुंकार ऐकोनी। तेलकट परतला तिष्ठत मनी। चौरंगी बसोनि हाके घाणीं। सांगे विक्रम राजाला। ५९चंद्रसूर्य उगवतो मावळती। सप्त संवत्सरे उलटून जाती। लीलया दीपराग स्वर स्फुरती। एकदा विक्रम कंठातून। ६०अहो तो सायंकाळ शुभसमय। पेटवून लक्ष ओळी दीप वलय। उचंबळे राजकन्येचे हृदय। जाज्वल्य संगीत ऐकोनी। ६१चंद्रसेन कन्या पद्मसेना। पाठवी शोधावया दासींना। तया पुरुषासी झणी आणा। पतीरुपे पुजीन मी। ६२एकस्तंभाच्या राजमहाली। रंगती संगिताच्या मैफली। तेल्याघरची सेवा संपली। येथे विक्रम राजाची। ६३रागरंग ऐकोन निशीदिनी। चंद्रसेन म्हणे यावे पाहोनी। उधळतो रंग कोणे करणी। कन्येच्या प्रासादी। ६४दासी म्हणती हे राजराजेश्वर। आम्हास न कळे कन्येचे अंतर। बोले राजन समजेल प्रकार। आणि निद्राधीन जाहला। ६५इकडे विक्रममन चिंताग्रस्त। केव्हा उज्जायिनी होईल प्राप्त। त्याचवेळी शनिदेव अकस्मात। दिसले साडेसात वर्षांनी.।६६शनीदर्शने विक्रम हरपला। प्रणाम करण्या पुढे सरकला। विनवी न छळे मानवाला। अति असह्य होतसे। ६७उत्तरी ग्रहस्वामी बोलले। मी अनेक गर्विष्ठां छळिले। गुरुग्रहा सुळापाशी नेले। अभिमान करताच.।६८म्या भिवविले शिवशंकरा। धाडी वनी राजा रामचंद्रा। पाठविली सिता लंकापुरी। दशानन मारिला। ६९कौशिके छळीले हरिश्चंद्रा। पिडीली दमयंती सुंदरा। भगें पडली  इंद्रशरीरास। कलंकीत झाला चंद्रमा।७०आणि माझी दृष्टी पडता।क्षय झाला वशिष्ठपुत्रा। केली पराशरे भ्रष्टता। मस्यगंधे कारणे। ७१श्रीकृष्ण कौरव पांडव। कितीतरी देव दानव। त्रासिले मी महामानव। एकाच दृष्टिक्षेपात.। ७२विक्रम विनवू ग्रहश्रेष्ठा। न देई मानवा  देहाला कष्टा। नको नकोत हाल अपेष्टा। कोणाही प्राणीमात्रास.।७३शनैश्वरे ठेविले वरदहस्त। नृप झाला दिव्यदेही पुर्ववत। म्हणे नाही छळणार मी समस्त। व्रतधारक मानवा। ७४शनिदेव गेले निजस्थानास। चंद्रसेन आला कन्या गृहास। पाही सन्मुख तेजस्वी नरास। जणु मदन अवतरला। ७५चंद्रसेन विचारी विनयप्रभावे। महाराज आपण कोण वदावे। कोणता देश नामगोत्र सांगावे। कोणत्या प्रयोजने या स्थानी। ७६विक्रम हासून उद्गारला। तुम्ही होता जो तस्कर दंडिला। बोलवावे श्रीपती वैश्याला। मज ओळखण्यासाठी। ७७ऐक माझे नामगोत्रादि आता। मी असे उज्जायिनी भाग्यविधाता। क्षत्रिय कुलीन जनीन पिता नाम माझे विक्रम। ७८ऐकोनी घालतसे दंडवत। म्हणे केवढा घडला अनर्थ।कोणते महत्तम प्रायश्चित्त।  घ्यावे मी चंद्रसेनाने। ७९अहो महासमर्था दंडक पामरा। कोणत्या शासने तयाचा उध्दार। क्षमा मागण्या निरलस अधिकार। गहन गती कर्माची। ८०यावरून विक्रम सांत्वन करी। राजन चंद्रसेना अवधारी। शनीची कृपा झाली आम्हावरी। म्हणोनि घडले अघटित हे.। ८१चंद्रसेन पाचारी सावकार। हस्त जोडीने आला सामोरा। खिन्नवदने करी मुजरा। आर्जवी स्वगृही चलण्यास। ८२मनी ना ये विक्रमाच्या। सार्वभौम नृपतीच्या। चंद्रसेन वैश्य आघवे। दास आणि पौरजन.। ८३प्रवेशले अलौकिकेच्या मंदिरी। चित्रीचा हंस होता निर्जीव जरी। उगाळी मोतीहार सर्वांसमोरी। स्वमुखातून लीलेने।८४सकळजण आश्चर्य पावले । म्हणती श्रेष्ठा दूषणे लाविले। शनिच्या अवकृपेने सोसले। भोग साडेसात वर्ष। ८५असे पद्मसेना राजकन्या। आणि अलौकिका रुपांगना। अर्पिती विक्रमाच्या चरणा। जीवन सर्वस्व आपुले । ८६चंद्रसेन आणि सावकार। विवाही ओतती  भारंभार। मोत्ये, पोवळी, रत्नें अपार।जामाता तुष्ट कराया। ८७राजा विक्रम त्या तेलियास। देतसे एक संपन्न देश। आणि दाने देई याचकांस। सर्वांच्या इच्छा पूर्ण करी.।८८पुढे आजन्म शनिव्रत। पाळी विक्रम सज्ज नीत। श्रोते हो तुम्हीही समस्त। शनिव्रत आचरावे.।८९तात्याजी महिपतीची मुळकथा। शनिदेवचरणी ठेवोनी माथा। संक्षिप्तरुपे निवेदिली तत्वता। सर्वांच्या कल्याणासाठी.।९०द्विजवंशी जिचा जनक। ती संक्षेपी हे कथानक। सुखी व्हावा हा तिहीलोक।*शनैश्वरार्पणमस्तु* ।।९१इति श्री शनैश्वर माहात्म्य समपूर्णम्। शनिमहाराज की जय ।-----------------------------------------देवा तुझ्या द्वारी आलो 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!