श्रावणधारा

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

('हातात आल्याचा गरमागरम चहा...खिडकीबाहेर यथेच्छ भुरभुरणारा अल्लड पाऊस... आणि माझी ही, एकूण चार भागांची प्रेमकथा, 'श्रावणधारा' तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.')’यार तिला बघून माझे फ्रेंड्स काय म्हणतील? अगदी टिपिकल...केवढी आऊटडेटेड आहे. शीट्टsss, शॉनला सांगत होतो एकटाच गाडी घेऊन ये. त्या निक्याला घेऊन येऊ नकोस, तर सोबत अजून पॅम. सो ऑकवर्ड. सगळ्यांसमोर हसे होणार? राघवच्या मनात एक ना हजार प्रश्न उभे होते. अखेर ईन्टरनॅशनल एअरपोर्ट सेकंड गेटने मीरा बाहेर पडली. आपली बॅग सावरत तिने दुरुनच हात दाखवला, इकडे पट्ठ्या पाच मिनिटे फुल टू कन्फ्युज.‘हिच का ती? काय वेडसर दिसत होती लग्नात… हिरवागार चमकीचा चापुन-चोपून नेसलेला शालू... ती आजी-पणजीच्या काळातली नाकापेक्षा जड भली-थोरली नथ... डोक्यात उजवीकडे खोचलेली ढिगभर गुलाब-मोगर्याची फुल. पण तरीही मला ती आव???’"रघु! तिचं का रे मीरा?" निक्याच्या प्रश्नाने राघव भानावर आला आणि त्याच्या मनातलं अर्धवट वाक्य मनातच विरून गेलं."ह... हो!" मिनिटभर तो तिच्याकडे टक लावून उभा होता, आणि तोपर्यंत ती अगदी त्याच्या समोर येऊन उभी. पिचक्रिम निलेन्थ कोट. केसाचा मस्त हायबन. कानात व्हाईट स्टोनचे रिंग, चेहर्‍यावर मात्र नेहमीचीच अतीव शांतता. पॅम, आणि निक्याच आत्तापर्यन्त शेकहॅन्ड देखिल करुन झाल होत. राघव मात्र अजूनही थोडा साशंक."निघायच का?" त्याच्याकडेच बघत मीराने विचारले, आणि हाय-हॉलो अशी जुजबी फॉर्मालिटी करुन ते निघाले.'लग्नामध्ये… त्याआधी दोनदा पाहिलेली आणि आपण आत्ता पाहतोय ती मिरा, केवढा तरी फरक आहे.' घरी येईपर्यंत हाच विचार त्याच्या मनात ठाणं मांडून होता.*****एक वन बिएचके, पण अगदी आलिशान फ्लॉट. बर्‍यापैकी स्वच्छता होती. मोजकेच साहित्य, निटनेटकी ठेवलेली एक-एक गोष्ट मीरा निरखून पहात होती. पहिल्यादा इथे आली होती. तिच्यासाठी हे सारं काही नविन."गुडमॉर्निग! कॉफी?" एक कॉफीमग समोरच्या टेबलावर ठेवत राघव खुर्चीवर येऊन बसला."हो. आले." ओल्या केसांवरचा टॉवेल तिथेच बाजूच्या खुर्चीवर टाकत मीराने कॉफीमग हातात घेतला."काल इथे पोहोचेपर्यंत फारच रात्र झाली होती, म्हणुन काही विचारता आल नाही. कसा झाला प्रवास? " राघवने तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात विचारले."हं... छान. कॉफी छान आहे." बाजूच्या खुर्चीवर बसत मीरा उत्तरली."थॅक्स. ब्रेकफस्टसाठी काय ऑर्डर करु. ऑक्चुअली मिसेस फेलीस चार दिवस येणार नाही आणि मला फारस काही जमत नाही, इथे तेवढा वेळ सुद्धा नसतो म्हणा. सो बाहेरुन मागवतो. वेज या नॉनवेज, केक्स मफिन्स वगैरे काही? ""वेज काहीही चालेल. घरी कुकीज किवा बिस्किटस असेल तर ते ही चालेल... म्हणजे ऑर्डर करण्याची गरज नाही." हातातल्या कपच्या काठावर बोट फिरवत मीरा वरती न बघताच म्हणाली.'काय फॉरमल डिस्कशन चाललय... नॉनसेन्स, आणि ही तर एक-एक शब्द एवढा विचार करुन बोलते की बास रे बास! बोर होणार घरी आज, त्यापेक्षा ऑफिसमध्ये गेलो असतो. ' राघवच्या मनात अनेक विचार येऊन गेले आणि ते क्षणार्धात कुठल्या कुठे वीरूनही गेले. कारण तोपर्यंत मीराने बॅगमधून काढलेला जाडजूड पेपर्सचा एक बंच त्याच्यासमोर ठेवला होता."हे बाबांनी दिलेले सगळे लिगल डॉक्युमेन्टस, आणि बाबांनी जाण्याआधीच काही दिवस हे लेटर माझ्याकडे दिल होत. तुम्हाला द्यायला."एक पॅकबंद खाकी लेटर त्याच्याकडे करत ती परत येऊन खुर्चीवर बसली. लेटर हातात घेतल्या क्षणी राघवच्या डोळ्यात जमा झालेले पाणी तिच्या नजरेतून सुटले न्हवते. खरं तर तिची ही अवस्था वेगळी नव्हती, पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरण्याचं तंत्र तिला चांगल अवगत होत."त्यादिवशी मला अचानकच त्यांचे आवडते उकडीचे मोदक आणि लाप्शीची खीर करायला सांगितली... पोटभर खाऊन ही झाल, आणि…आणि अचानक हसत खेळत त्यांनी निरोप घेतला... कायमचाच. अगदी अनपेक्षित. आयुष्य असावं तर असं. कोणी म्हणणार सुद्धा नाही, की त्याना कधी पॉरालिसिस होता. फक्त सारखी तुमची आठवण काढायचे. तरिही अजिबात अट्टाहास नाही की तुम्ही त्यांना पहायला यावंच."ती मिनिटभरात सार काही बोलून गेली होती, जे ऐकण्यासाठी राघव अगदी आतुर होता."मी खुप प्रयत्न केले, पण या ऑफिसच्या फॉरमेलीटीज काही केल्या संपेनात. हे लोक सोडायला तयार न्हवते. इकडे सगळचं प्रॉक्टीकली... इमोशन्सना काहीच जागा नसते. त्यामुळे मी शेवटच्या क्षणी सुद्धा पोहोचू शकलो नाही." बोलता-बोलता राघवचे डोळे भरले."इट्स ओके. जवळचे सगळेच नातेवाईक आले होते, त्यामुळे सगळ्यांचा आधार मिळाला, सार काही व्यवस्थित पार पडल आणि तुमचा सुद्धा नाईलाज होता म्हणा. काही गोष्टी अटळ असतात हेच खरं. "तिच्या नकळत तिने राघवच्या हातावर आपल्या उजव्या हाताने थोपटले, आणि तोच हात हातात घेऊन तो ही मनसोक्त रडला. पुरुषासारखा पुरुष असं ओक्साबोक्सी रडताना पाहून मीराला गहिवरुन आलं होत."मीरा थ्यॅक्स. अ‍ॅटलिस्ट तू तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत होतीस. " तो थोड स्थिर होत कसबस बोलला."माय प्लेजर." बोलत मीरा त्याच्या हातातील आपला हात अलगद सोडवून तिथून उठली, रिकामे कॉफीमग हातात घेऊन किचनकडे जायला वळली. दोन क्षण तिने आपल्या हाताकडे पाहीले. दुखर्‍या नसेवर कोणी बाम लावावा, आणि तिथे एक असह्य्य कळ उठावी तशी तिची अवस्था झाली होती. अश्या वेळी बरही वाटत असत आणि त्याबरोबर होणारा तो दाह सहनही होत नाही.इकडे ते पेपर्सच बंडल हातात घेऊन कितीतरी वेळ राघव बाबांच्या आठवणी आळवत बसला होता. लहानपणी पासून ते अगदी इथे येई पर्यंत... शेवटची भेट झाली त्याला जेमतेम एक वर्ष सरत आले होते. त्यानंतर भारतात जाणे झालेच नाही. मीराने नकळत त्याच्या आत दाबलेल्या मुक अश्रूंना वाट करुन दिली होती. एवढं मनसोक्त रडायला सुद्धा त्याला कधी मिळाल नाही."अरे हो मीरासाठी ब्रेकफस्ट ऑर्डर करत होतो ना. विसरलोच." म्हणत राघव उठला आणि तो ही किचनकडे वळला."सॉरी मीरा थोड लेट होईल, ते ऑर्डर करायच राहुन गेल. लगेच कर..." पण वाक्य पुर्ण करायची देखिल गरज उरली नाही. मसाला नुडल्सचा दरवळ किचनमध्ये पसरला होता. आणि मीरा खिडकीतल्या पावसाकडे एकटक लावून उभी होती. राघव जवळ येऊन तिच्याशी काहीतरी बोलतोय याचे देखिल तिला भान न्हवते. उतू जाऊ पाहणाऱ्या कॉफीचा गॅस बंद करुन राघव बाजूला शांत उभा होता. जणू बाहेरचा पाऊस मोजणारी मीरा आणि तोच पाऊस तिच्या डोळ्यात मोजणारा राघव दोघे कितीतरी वेळ तसेच उभे होते. दोन मिनिटे...पाच मिनिटे... दहा मिनिटे झाली असतील."मीरा!" गॅसकडे आणि तिच्याकडे आळीपाळीने पाहत त्याने पुन्हा आवाज दिला."ह. हो. विसरलेच." म्हणत तिने गॅस बंद करत, लगोलग दोन नुडल्स डिश आणि सोबत कॉफीचे मग भरायला सुरुवात केली."ते मघाशी ऑर्डर करायच राहून गेल." कॉफीमग हातात घेत तो ही तिच्यामागून टेबलकडे वळला."हो ते माझ्या लक्षात आल होत. मी देखील लगेचच बाबांचा विषय काढायला नको होता. मग हे नुडल्स पॅकेटस फ्रिजमध्ये पाहीले, आणि करायला घेतले. चालेल ना? " मीरा एक डिश त्याच्याकडे सरकवत म्हणाली."हो. अ‍ॅक्चुअली पळेल." म्हणत तोही समोर बसला."बाय द वे, यु आर सो मच चेंज्ड, आय मीन, या आधी पाहिलं ते फक्त साडी वगैरे मध्ये, तेव्हा तू खूप वेगळी दिसत होती.""आधी म्हणजे फक्त हळद, साखरपुडा आणि लग्नात...अश्या प्रसंगी अजून तरी आपल्याकडे साडीच घालतात हं. सगळं पारंपरिक असत ना. संस्कृतीला प्राधान्य दिल जात अश्या वेळी. त्याआधी आणि त्यानंतर आपण परत केव्हा भेटलोच नाही.""होय. ते आहेच." राघव आपला चेहेरा अगदीच गंभीर करत म्हणाला."तेव्हा कुठे असं वनपीस आणि शॉर्टड्रेसेस घालणार? लोकं हसले असते ना." म्हणत मीराने ती गोष्ट हसण्यावर घेतली. त्यामुळे निर्माण झालेले गंभीर वातावरण देखील खेळीमेळीत परिवर्तित झाले होते.त्यापुढे मात्र राघवला कोणताही विषय वाढवण्याची इच्छा होईना, आणि मीराही कॉफी एन्जॉय करत शांतपणे तिच्या रिकाम्या आणि पोकळ भूतकाळात गढून गेली. नुकताच पडून गेलेल्या पावसाने एक छानसा उल्हास आणि किंचितसा गारवा हवेत पसरला होता.' तिच्या केव्हाच न पाहिलेल्या नानाविध रंगछटा अगदी जवळून पाहताना तिच्या त्या ओल्या केसात गुंतलेली त्याची नजर...आणि याला एवढ्या जवळून केव्हा पाहीलेलच नाही, खरंतर कधी हिम्मतही झाली नाही, म्हणून उगाच काहीतरी शोधण्यात कॉफीवर झुकलेली तिची नजर... एक अव्यक्त, जुनीच कहानी घेऊन आली होती... पण पुन्हा नव्याने.'************************************************************"लंचसाठी बाहेर जाऊया? की काही ऑर्डर करु?""मी लंचसाठी नसेन कदाचीत. ईन्स्टिट्युटला थोड काम आहे, वेळ आहेच तर तिथे जाऊन येईन म्हणते.""ओके... थॅक्स. तू हे सगळ घेऊन इथे आली त्यासाठी, आय मीन बाबांच्या भेट वस्तू आणि ते पेपर्स वगैरे...""त्यांनी तसं बजावलच होत मला, स्वतः घेऊन जा म्हणून. तेव्हा मी म्हणाले होते, कुरिअर करते. बापरे! केवढे रागवले होते ते माझ्यावर. म्हणाले होते, 'अगं एवढ्या महत्वाच्या जपून ठेवलेल्या वस्तु आणि ते पेपर्स कुरिअर मध्ये गहाळ झाले तर? परत आणून देणार आहेस का! तू स्वतः जा आणि दे त्याला.' खर सांगायच तर, गारवानला माझ देखिल महत्वाच काम आहेच. दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. नाहीतर मी एवढ्या लांब येण कठीण, आणि बाबांची तेवढीच शेवटची इच्छा अपूर्ण रहायला नको."बाबा हे म्हणायचे... असे रागवायचे... त्यांना हे आवडायच आणि हे नाही... वगैरे-वगैरे कितीतरी गोष्टी. तो प्रसंग अगदी समोर घडत असावा अश्या हावभावात मीरा बाबांच्या आठवणी सांगत होती."बाकी तिथे काय चालू आहे? सदाकाका वगैरे कोणी येतात का? " विषयांतर म्हणून राघवने सहजच प्रश्न केला."कोणीही येत नाही...कोणी जात नाही. एवढं मोठं घर सांभाळायला कोणीतरी पाहिजे ना, म्हणून भागिताईंना कामाला ठेवून घेतलू, आणि मी आहेच... दोघी असतो. बाबा होते तेव्हा त्यांच्या एकट्याच्याच आवाजाने घर नुसतं गजबजलेल असायच, आणि आता फक्त भयान शांतता... "बोलता बोलता ती अचानक स्तब्ध झाली.“मी निघते, ते सेशन चालू व्हायच्या आत पोहोचल पाहीजे, नाहीतर लेट होईल, एवढ्या लांबून येऊनही काही फायदा होणार नाही. आणि महत्वाच म्हणजे ते प्रॉपर्टी पेपर्स वगैरे वाचून घ्या. जमेल तसं सह्या सुद्ध्या करुन ठेवा. लवकरच परत जायला निघेन म्हणते, तेव्हा गडबड व्हायला नको ना म्हणून.” उसण हसू चेहर्‍यावर आणून ती तयारीला सुद्ध्या लागली होती. इकडे राघव परत विचारात पडला.'ही लवकरच परत जाणार तर. थांबवलं तर थांबेल का? तिच्याशी खूप काही बोलायच आहे. सगळ्यात आधी सॉरी म्हणायच आहे. मी जे वागलो...ते चुकीचच होत, एक्सेप्ट कराव लागेल. सार सार काही एक्सेप्ट कराव लागेल. जमल तर तिला मुक्त कराव लागेल, किंवा तिच्या माझ्या नात्याला एक नवीन वळण द्यावं लागेल अर्थातच तिच्या इच्छेनुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. या सगळ्यामुळे तिच्या आयुष्याची झालेली फरपट आता पुरे.' काहीतरी मनाशी पक्क करुन तो ऊठला."मीरा मी ड्रॉप करतो तुला. रेडी झाली की सांग.""थँक्स, पण मी एकटी जाऊ शकते." म्हणत मीराने पर्स आणि मोबाईल उचलला, पाहते तर समोर राघव. हातात गाडीची चावी घेऊन उभा... आता नाही किवा हो म्हणण्याचा प्रश्न उरला नाही. त्यामुळे काहीही न बोलता ती ही त्याच्या बरोबर निघाली.*****हातातल्या घड्याळाकडे पाहत पाहत राघवने तिसऱ्यांदा फोन डाईल केला होता."मीरा इट्स ११:३०... स्टील आय एम वेटिंग. यु आर लेट. ""ते मला अजून लेट होईल बहुतेक. इकडे खुप पाऊस आहे. तुम्ही डिनर करून घ्या मी इथून काहीतरी खाऊन येते.""मी येतो तिथे, तुला पीक करायला? मग बाहेर जेवून घेऊयात. लोकेशन पाठव. ""नाही...नको... मी इथेच समोर आहे… येते मी. येते." पुसटसे कसेबसे दोन शब्द मीराच्या तोंडून बाहेर पडले."मीरा बाहेर पाऊस आहे. निघालोच मी, लोकेशन पाठव." म्हणत राघवने फोन ठेवला आणि तो तडक निघाला. मीराचा फोनवरचा आवाज अगदी हळवा आणि कापरा आला होता. त्या वरुन त्याने ओळखले होते की, काहीतरी प्रॉब्लेम आहे.आता त्याला लोकेशनची वाट पाहण्याची सुद्ध्या उसंत नव्हती. पाच-एक मिनिटे गाडी चालवली नसेल एवढ्यात करकचून लावलेल्या ब्रेकने गाडी जागच्या जागी उभी केली होती. हेड लाईट आणि कर्कश हॉर्नच्या आवाजाने गाडीसमोरच उभी असलेली मीराही कावरीबावरी झाली. तिच्यापेक्षा जास्त शॉकमध्ये असलेला राघव गाडीमधून विजेच्या वेगाने तिच्या दिशेने पळत सुटला."मीरा वॉट हॅपन्ड?"तिचा तो व्हाईट ड्रेस पार भिजून गेला होता. हातातली एवढीशी पर्स सुद्धा तिचाने व्यवस्थित सांभाळता येईना. नीटसं उभही राहण्याची ताकद नव्हती. राघवला काहीही समजेनास झालं. दोन मिनिट तर तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतच राहिला. तिची नजर मात्र तिच... तिच्यासारखीच आरपार भिजलेली आणि अगदी खाली झुकलेली."काय झाल मीरा? " एव्हाना राघवच लक्ष तिच्या पायाकडे गेल होत आणि तुटलेल्या चप्पलचा बंद बर्‍याच गोष्टी सांगून गेला. तश्याच अवस्थेच बराच वेळ चालत राहील्याने बोटाला इजा होऊन त्यातून थोड रक्त ही येत होतं."मी सेशन संपल्यावर निघाले तेव्हा अचानक पावसाला सुरुवात झाली. जवळपास टॅक्सी वगैरे काही सुद्धा न्हवते. त्यामध्येच माझी सॅन्डल तुटली त्यामुळे भिजले. पण... पण ठिक आहे मी. " एवढा वेळ आठवून-आठवून ठेवलेल एक वाक्य त्याचं थरथरत्या आवाजात मीरा कसबस बोलून गेली होती.अजुनही खालीच झुकलेली तिची नजर मात्र खरं-खॊटं सार काही न बोलताच सांगत होती. तिची हनुवटी आपल्या दोन्ही हाताने वरती करत पावसा एवढ्याच थंडगार नजरेने राघवने पुन्हा एकदा प्रश्न केला."मीरा! सॅन्डल तुटली म्हणून भिजली? का खुप वेळ भिजत होती म्हणून सॅन्डल तुटली? "पण तिची ती अव्यक्त नजर त्याला सहन झाली नसावी. त्याने लगेच आपली मान दुसरीकडे वळवली. आत्तापर्यंत बरसणाऱ्या रिमझिम पावसाने तो ही पार चिंब झाला होता, पण पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातला तो असंख्य भावनांचा केविलवाणा पाऊस पाहून आज तो पार गारठला. नेहमीप्रमाणेच अबोल असूनही आज ती नजर बरच काही सांगून गेली.काही क्षण असेच निघून गेले असावे, शेवटी काहीही न बोलता मीराने चालण्यासाठी असफल धडपड केली, पण पायाच्या बोटाला बर्‍यापैकी लागल्याने तिला धडसे चालता येईना. गाडीचा हेड लाईट चालू असल्याने काळ्याकुट्ट अंधारातही ही गोष्ट राघवच्या लक्षात यायला वेळ लागली नाही."ओके.... वेट." म्हणत त्याने तिला तशीच आपल्या दोन्ही हातांवर अलगदपणे उचलून चालायला सुरुवात केली.'आतापर्यंत फक्त स्वप्नातच ज्याच्या जवळ जाता आलं होत. तो प्रत्यक्षात आपल्या एवढ्या जवळ असणे, हे ही जणू स्वप्नवत वाटणारी ती.... आणि स्वतःच्याच बायकोच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत एकवटू न शकलेला तो... दोघांचीही त्या बेभान पावसात भिजलेली नजर… एक अव्यक्त जुनीच कहानी घेऊन आली होती पण पुन्हा नव्याने.'************************************************************"मीरा कॉफी?""हो! नक्कीच." बाल्कनीत टाकलेल्या मॅटवर बसल्या-बसल्या मीराने कॉफीसाठी हात पुढे केला."पाय ठीक आहे का? हे घे." कॉफी बरोबर दुसर्या हाताने एक बॉन्डेज तिच्या समोर ठेवत राघव ही त्या मैफिलीत सामील झाला."होय ठीक आहे, आणि थॅन्क्स.""एवढ्या रात्री कॉफी म्हणजे मी आधी विचार करत होतो, तुला चालेल की नाही? पण खूपच भिजली होती म्हणून शेवटी घेऊन आलो.""कॉफी छान करता. त्यामुळे नाही म्हणूच शकत नाही. आणि भिजण्याच म्हणाल तर आपल्याकडे सुद्ध्या आता श्रावण सुरु आहे. मस्त पाऊस असतो. अश्या श्रावणधारा सुरु झाल्या की मग भिजल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे मला तरी सवय आहे याची.""पण एवढं भिजत का कोणी? त्यामुळे तुझ्या बोटाला बर्यापैकी लागलं... लाव ते बॉन्डेज नाहीतर जखम चिघळेल.""मी आधीच सांगितलं ना तुम्हाला, माझी सॅन्डल तुटली त्यामुळे भिजले, जवळपास टॅक्सी वगैरे काही सुद्धा न्हवते.""मीरा... मीरा.... होय. समजलं." जे समजायच ते तर राघव केव्हाच समजला होता. दीर्घ श्वास घेत तो मिश्किल हसला स्वतःच्याच असहाय्यतेवर."काय झालं? का हसताय?" मीरा त्याच्याकडेच बघत आच्छर्याने उदगारली, एकीकडे तिची पायाला बॉन्डेज लावण्याची धडपड चालू होती.“नथिंग, दे लावतो!" म्हणत हो ना ची प्रतीक्षाही न करता, तिच्या हातून बॉन्डेज घेऊन ते लावण्यासाठी तो सरळ शेजारी बसला होता."थॅक्स." म्हणत मीराने त्या बॉन्डेज लावलेल्या बोटाकडे क्षणभर पाहिले, मग मागच्या भिंतीचा आधार घेत ती ही टेकून बसली. एव्हाना कॉफी संपवून राघवही तिथेच मॅटवर सरळ-सरळ आडवा झाला होता.चिंब भिजून बरसणारे काळेभोर आभाळ, सोबतीला बर्यापैकी अंधारलेली शांत रात्र... लॉपटॉपला वाजणाऱ्या 'रिमझिम गिरे सावन' गाण्याची धून ऐकत, एकही शब्द न बोलता दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. आयुष्यात काही क्षण असतातच एवढे सुंदर की, काहीही न बोलता आपल्या माणसाबरोबर अगदी शांततेत घालवलेले दोन क्षण देखील आयुष्यात कधीही न मिळालेले सुख-समाधान मिळवून देतात.*****दोन चेअरच्या मधोमध एक छोटस गोलाकार काचेच टेबल आणि त्यावर तिचा आवडता मिक्स फ्रुटस केकवर "हॅपी मेरीज ऍनिव्हर्सरी" चा संदेश... बाजूलाच एक पिंक गुलाबाची छोटीशी कळी... अगदी तिच्या एवढी गोड आणि स्वतःमधेच गुंतलेली. आजूबाजूला अस्ताव्यस्त पसरलेले शंभरएक कलर-कलर चे बलून्स त्या छोट्याश्या टेरेसची शोभा अजूनच वाढवत होते. हे सार टेरेसच्या दारातून पाहणारी मीरा त्या बलून्स मधून वाट काढत टेबला पर्यंत पोहोचली. तिच्यासाठी हे अनपेक्षित पण सुख:दच... 'म्हणजे याला लक्षात आहे तर, आपल्या लग्नाचा आज पहिला बाढदिवस. एक वर्ष सरले आज.' तिने बाजूची एक कँडल उभी करून त्यावर माचिसची एक जळती काढी टेकवली. त्या मंद प्रकाशात अगदी समोरच्या भिंतीला टेकून तिच्याकडेच पाहत उभा असलेला राघव तिच्या नजरेतून सुटला नाही."हॅपी मॅरिज ऍनिव्हर्सरी." म्हणत तो ही टेबलापाशी पोहोचला होता."हॅपी ऍनिव्हर्सरी. अँड नाईस डेकोरेशन. " तिने वरती न पाहताच विश केले."ऐक्च्युअली बाहेर जायच प्लानिंग करणार होतो, बट डाउट होता, तू येशील की नाही.""हं. ते एक बर केलं." कट केलेला केकचा एक बाइट राघवच्या समोर धरत आपल्या थंडगार नजरेने मीराने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. कधी नाही एवढी खोल आणि मनाचा ठाव घेणारी ती नजर पाहून तो ही क्षणभर स्तिमित झाला होता."हॅपी मॅरिज ऍनिव्हर्सरी वन्स अगेन, अ‍ॅन्ड सो लकी ना? बीकॉज वी आर सेलिब्रेटिंग आवर फर्स्ट अण्ड लास्ट मॅरिज अ‍ॅनिव्हर्सरी टुगेदर."तिच्या त्या शब्दांबरोबर एखादी धारदार सूरी कोणीतरी काळजात खुपसावी अशी राघवाची अवस्था होती."शटअप मीरा प्लिज." तो जवळ जवळ ओरडलाच."नो. आय एम सिरिअस आणि या सगळ्यासाठी थॅन्क्स. वन्स अगेन." म्हणत ती तिथून उठणारच होती, एवढ्यात राघवने तिला आडवले होते."मीरा थोडं बोलायच होत. थोडा वेळ आहे कि लगेचच झोपणार आहेस?""हं, पुन्हा केव्हातरी. उद्या मला निघायच आहे, सकाळची फ्लाईट आहे ना. सो लवकर झोपते.""उद्या. एवढ्या लवकर?" राघव आच्छर्याने चक्क उठूनच उभा राहिला."होय. उद्या निघते मी. तिकीट बुक आहे.""थोडे दिवस थांबू शकतेस का? किंवा कायमचंच. तसही तिथे आता कोणीही नाहीय."अक्षरषा केविलवाणा चेहरा करत राघवने तिचा डावा हात आपल्या हातात घेतला होता. उजव्या हाताने तिच्या गालाला ओझरता स्पर्श करत तो कसेबसे चाकपडत दोनच शब्द पुटपुटला. "एक्सट्रीमली सॉरी मीरा." इतके दिवस गोळा करून ठेवलेले शब्द-शब्द आणि वाक्य यातले काही आठ्वेना झाले. बर्याच गोष्टी बोलायच्या होत्या. तिला अपेक्षित असलेली आणि नसलेली अशी बरीच स्पष्टीकरण द्यायची बाकी होती. पण सॉरी च्या पलीकडे तो जाऊच शकला नाही. तिच्याही नकळत दोन्ही हातानी अलगद मिठीत घेत त्याने आपले ओठ तिच्या डोक्यावर टेकवले होते आणि उभ्या उभ्या डोळ्यातून ओघळलेले काही थेंब तिच्या केसातून घरंगळत खाली उतरले."आय एम सॉरी राघव. खरच नाही थांबू शकत... माझी एक्झाम जवळ आली आहे, आणि खरं सांगायच तर आता या गोष्टीला काहीच अर्थ नाही. असं समजा मी इथे आलेच नाही, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच आयुष्य जगा आधीप्रमाणे... मी माझी माझी ठीक आहे. तसही बाबांच्या इच्छेसाठी आणि त्यांच्या आग्रहाखातर, त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करून तुम्ही आधीच तुमच्या आयुष्याच एक वर्ष वेस्ट केलंत. आता बाबाही हयात नाहीत. त्यामुळे अजून हा दोर ताणण्यात काही अर्थ नाही."काही ओझरत्या मिनिटाचा तो क्षण सरतो न सरतो तोच मीरा त्याच्या हातातील आपला हात सोडवत दोन पावले मागे घेत तिथून निघाली देखील. तिचे शब्द मात्र त्याला बाणासारखे छेदून गेले."मीरा तुला वाटत तस खरंच नाही, आणि बाबांच्या आग्रहाखातर असले तरी यात माझी सुद्धा इच्छा होतीच ना. खरच मनापासून आवडली होतीस तू मला... त्यांची देखभाल करण्यासाठी मी तुझी फसवणूक केली असं वाटतं तुला? तुला खूप काही सांगायचं देखील आहे, आणि मुख्य म्हणजे जगायच राहून गेलय, तुझ्या सोबतीने... सुरुवात करूया पुन्हा एकदा. चूक माझी आहे, मान्य आहे, पण मी कुठेतरी बांधील होतो. यापुढे खरंच मी काहीही एक्सप्लेन नाही करू शकत. ट्राय टु अण्डस्टॅण्ड मीरा प्लिज.""मला खरच काही स्पष्टीकरण नको आहे. त्याची अपेक्षाच नाही. बाय द वे एवढी बांधीलकी कुठे आणि कुणाशी ? खूप दिवस विचारेन-विचारेन म्हणत होती. कोण आहे ती ?"हताश होत त्याने जमेल तेवढे स्पष्टीकरण देण्याचा निष्फळ प्रयत्नही केला. पण फक्त तेवढे आज पुरेसे नव्हते की काय म्हणून मीराने खोचक प्रश्न केला."तस खरंच नाहीय. कोणीही 'ती' आपल्यामध्ये कधीच नाही. मी फक्त कोणाला तरी नकळत दिलेला शब्द पाळत होतो. दिला शब्द मोडणं माझ्यासाठी खरंच अशक्य होत. कारण नसताना तुला खूप काही सहन कराव लागल, मला देखील त्रास झाला, पण तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्याय न्हवता. त्या वेळेस जे योग्य वाटलं ते ते मी करत गेलो आणि तीच माझी सर्वात मोठी चुक ठरली.""जे झालं ते झालं. आता गोष्टी वेगळ्या आहेत, आणि मला माझं एक वेगळं जग सुद्ध्या आहे. तुम्ही दिलेल्या शब्दाला जागत राहिलात यात मी मात्र कायम दुय्यम स्थानी राहिले. म्हणून या वेळी मी मला आणि माझ्या भावनांना प्राधान्य द्यायच ठरवलंय. ज्याची कधी सुरुवात झालीच नाही ते नातं यापुढे असच आशेच्या झुल्यावर झुलवत ठेवण्यापेक्षा सार काही इथेच थांबवूया. आय होप, यु रिस्पेक्ट माय फीलिंग्स."विषयाला कायमचा पूर्णविराम देत मीरा तिथून तडक हॉलच्या दिशेने निघाली. बोलण्यासारखं काहीही उरलं नाही. हताश आणि निराश आपल्याच एकटेपणाला गोंजारत राघवही उभ्या जागी खाली बसला. अगदी होपलेस आणि हैल्पलेस.************************************************************'तिचे-त्याचे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच एकमेकांत अडकलेले काही आनंदाचे क्षण होते. लग्नापूर्वीचे आणि लग्न होईपर्यंतच. त्यानंतर मात्र त्या नात्याला न सांगताच जणू वाळीत टाकलं गेलं. फक्त नावापुरतं... आज खरच त्याचाही शेवट झाला होता? तेच ते… अव्यक्त आणि अबोल असलेलं गुपित, ज्याची भनक देखील मीराला केव्हाच लागली नाही. सर्वस्वी सगळा दोष राघव वरती टाकून तिने आपला मार्ग मोकळा केला होता का?'*****अगदी धावपळीत ऑटोने राघवने एअरपोर्ट गाठले, पण फ्लाईट केव्हाची निघून गेली होती. आणि मिराही?'तिला सांगितलं होत, मी बँकेचं काम उरकून येईपर्यंत थांब. पण शेवटी नाही ऐकलं.'मनाला चुटपुट लागली होती. तसाच हताश होऊन तो फुटपाथवर एका बाकड्याचा आधार घेत त्यावर बसला.आपल्याकडे कोणीतरी बघतंय याची जाणीव होऊन राघवने सहज आपली उदास नजर वर टाकली. बॅग एका बाजूला कलंडलेली, पर्स दुसऱ्या हातावरून ओघळत होती. त्यातून काही पेपर्स बाहेर पाण्यात पडून ओले झाले होते. या अवस्थेत त्याची मीरा त्याच बाकड्याच्या दुसऱ्या टोकाला त्याच्याकडेच नजर लावून बसली होती.बाकड्यावरून थोडं सरकत तोही तिच्या जवळ जाऊन बसला. "फ्लाईट चुकली की चुकवली?""चुकली. ते बाबांनी तुम्हाला दिलेलं लेटर...ते माझ्याकडेच राहील होत. कदाचित त्या पेपर्सच्या बंचमधून आलं असावं. तुम्ही येतोय म्हणालात म्हणून इथेच थांबले. ते लेटर देण्यासाठी. आणि फ्लॅइट निघून गेली वाटत.""ओके. कुठे आहे लेटर?" तोही तिची खिल्ली उडवत सहजच इकडे तिकडे शोधू लागला."ते...भिजलं. ते... ते... मी माझ्या हातातच घेऊन उभी होती. मग... पाऊस..." समोर पाण्यात भिजून पार गोळा होऊन पडलेल्या कागदाकडे बोट दाखवत मीराने खाली मन घातली."ओके आणि याच काय? याला पण तुझ्यासारखं पावसात भिजायला आवडत का?" समोर उघड्या पडलेल्या तिच्या पर्स मधून तेच ते रात्री दिलेलं गुलाब बाहेर डोकावत होत.क्षणाचाही विचार न कारता मीराने अक्षरशा ते पर्समध्ये कोंबलं, आणि त्याच क्षणी "सॉरी" म्हणत राघवने तिला जवळ घेतल होत."मीरा गेले काही दिवस मी इथल्या सगळ्या फॉर्मेलिटीज कम्प्लिट करत होतो. तुझ्याबरोबर येण्यासाठी... तो फ्लॅट, गाडी वगैरे सगळ्याच कंपनीच काँट्रॅक्ट असत. काही गोष्टी मार्गी लावल्या, तर काही अजूनही बाकी आहेत. ते सगळं एकदा संपवतो मग जाऊया?"होकारार्थी मान हलवत त्याच्या नकळत गुपचूप मीराने आपले डोळे पुसले. आपण ते लेटर वाचलं, हे मीराने राघवला सांगितलं नाही. आणि राघवने बाबांना दिलेलं वचन ही अबाधित राहील.'एकटेपणाला कंटाळलेल्या बाबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा सेवेसाठी म्हणा, हक्काचं माणूस असावं म्हणून मीराला राघव पासून दूर केलं होत. ‘लग्नानंतर मीराला इथेच ठेवायचं' असं त्यांनी वचन घेतलं, आणि नकळत ‘हो‘ म्हणून गेलेला राघव या वचनात अडकला गेला. याचा कबुली जबाब असलेले बाबांचे ते लेटर चिंब भिजत पाण्यात विलीन झालं होते.''तुरळक रिमझिम पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. त्यांच्या विरहाची फ्लाईट केव्हाच निघून गेली होती. आता बरसत होत्या फक्त श्रावणधारा... त्याच्या आणि तिच्या प्रेमाच्या. त्याच तिच्या आवडत्या श्रावणधारा एन्जॉय करत, मीरा आणि तिचा राघव दोघेही हातात हात घालून घरच्या रस्त्याला लागले.'समाप्त©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!