वेळ फिरली तेव्हा ........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

हॅलो, ऐक ना मला पंचवीस हजार पटकन ट्रान्सफर कर जरा........दहा मिनिटानंतर ....हॅलो, नमिता, मी तुला पैसे ट्रान्सफर करायला सांगून दहा मिनिटं झाली. मला जरुरी आहे तुला कळत नाही का?, निखिल जरा ओरडूनच म्हणाला.मी मुळीच करणार नाहीss, नमिताने प्रत्येक शब्दावर जोर देऊन प्रतिउत्तर दिलं.का पण? मला तातडीने लागणार आहेत आत्ता, पाठव पटकन, डोकं फिरवू नकोस उगाच, निखिल त्रस्त होऊन म्हणाला.तरीही नमिताने थंडपणे फोन ठेऊन दिला.......तिच्या अपेक्षेप्रमाणे निखिलचा पुन्हा फोन आलाच. काय चाललंय काय नमिता तुझं? आता नाही कमवायला लागली तर माज चढला का तुला लगेच? एवढ्या वर्ष तर माझ्याच पैशावर राहत होतीस. मीच पोसत होतो तुला कळलं.हेच, हेच निखिल. बायको पोरांचं करणं म्हणजे उपकार नव्हे. तुझं कुटुंब होतं ते. आपल्या कुटुंबासाठी काही केलं तर त्याचा हिशोब नाही काढत कोणी!!आणि तसा काढायचाच झाला, तर माझा हिशोब खूप मोठा होईल मग. मला यापुढे काही बोलायचं नाहीये, तू घरी आल्यावर संध्याकाळी बोलू आपण,असं म्हणून नमिताने रागाने धुसपुसत फोन बंद करून टाकला.कुठल्या तोंडाने मागतोय हा पैसे? का देऊ मी?माझ्या कमाईत याचा पाठींबा किती होता? शून्य, अगदी शून्य!!नमिताला एकेक डोळ्यासमोर दिसत होतं सर्व!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); लग्नानंतर लगेचच दिवस राहिलेले तिला. मुलगी लहान, घरी सांभाळायला कोणी नाही. तिचे हाल नको म्हणून तिने नोकरीचा विचारच केला नाही. आणि निखिलचा पगार काही कमी नव्हता. गरज असती तर केलीही असती तिने नोकरी.पण घरचं प्रत्येक काम ती अगदी व्यवस्थित करायची. छोट्या मुलीसकट घर अगदी छान संभाळायची ती.नेहमी नाही पण कधी काही बिनसलं की निखिल बोलून जायचा, मी एकटा कमावतोय त्याचं भान ठेवा जरा. ती काही उधळी नव्हती. पण गरजेच्या गोष्टीला पण निखिल पटकन असं बोलून जायचा. नमिताला खूप लागायचं ते. मग मुलगी थोडी मोठी झाल्यावर नमिताने विचार केला, आपण घर बसल्या काही तरी करू. तेवढेच पैसे सुटतील. आपल्या लागणाऱ्या गोष्टी तरी आपल्या आपण घेऊ.तिने त्यावर विचार करायला सुरुवात केली. तिच्या एका मैत्रिणीने विमा एजंट होण्याबद्दल तिला सुचवलं. त्या मैत्रिणीचा भाऊ ते काम करत होता. घरबसल्या ते काम सहजशक्य होतं. फोनवरून लोकांशी संपर्क साधायचा होता. आणि गरज वाटली तर आपल्या वेळेप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन माहिती द्यायची होती.बोलण्यात तर नमिता एकदम पटाईतच होती. लग्नाआधी तिने मार्केटिंगच्या क्षेत्रात तीन वर्षे कामही केलं होतं. व्यवस्थित मुद्देसूद बोलून लोकांना पटवणं तिच्यासाठी सोप्प होतं.तिने ठरवलं, आपण विमा एजंटच बनायचं. तिने निखिलचा मूड बघून त्यालाही सागितलं, तर तो म्हणाला, झेपणार आहे का तुला? उगीच भलत्या उड्या मारू नकोस. खायचं काम नाही विमा एजंट बनणं. लोकं काही पटकन कुठली पॉलिसी घेत नाहीत काही. पैसे झाडाला लागलेले नसतात कुणाकडे. तुझ्यासारख्या नवीनच उगवलेल्या एजंटकडून पॉलिस्या काढायला. निखिलचं खचवणारं बोलणं ऐकून तिला, त्याला चांगलं झापावं वाटत होतं. पण तिने विचार केला, आपण याला करून दाखवू मग बोलू. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); दुसऱ्या दिवशीच तिने मैत्रिणीच्या भावाला फोन लावून त्याच्याकडून सगळी माहिती घेतली. त्याने तिला हातचं काही न राखता अगदी सविस्तर मार्गदर्शन केलं. विमा एजंट बनण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व प्रक्रिया त्याच्याच मदतीने तिने पूर्ण केल्या.मुलगी साडेतीन वर्षाची होती. दिवसभर खेळतच असायची. नमिताला सगळ्या पॉलिसींची डिटेल वाचायला रात्रीच वेळ मिळायचा. तर त्यावेळी हिच्या मोबाईलचा उजेड त्याच्या झोपेमध्ये व्यक्त्यय आणायचा म्हणून तो ओरडायचा. टेबल लॅम्प लावून पुस्तकातले संदर्भ बघायची तर बातच नव्हती. बाहेरच्या खोलीत बसलं तर मुलगी आई जवळ नाही म्हणून सारखी चुळबुळ करत उठायची. शेवटी तिने त्यासाठी पहाटेची वेळ निवडली, साडेचार वाजता निखिल आणि मुलगीही गाढ झोपेत असायचे, मग ती बाहेरीच्या खोलीत जाऊन सगळं समजावून घेऊ लागली.सुरुवातीला प्रोत्साहन म्हणून नातलगांनीच शुभारंभ केला. लग्नापूर्वी जिथे काम करायची त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर होते, त्यांना फोन करून हिने माहिती दिली. त्यातल्याही काही जणांनी अगदी सहज हिच्याकडून पॉलिसी काढली. हळूहळू तिला बोलण्याचा अंदाज आला. ह्याच्या त्याच्या ओळखी काढून तिने संपर्काचा विस्तार केला. जीव ओतून काम केलं तिने. फक्त पैशासाठी नाही स्वाभिमानासाठीही.या सगळ्यात निखिलने काय केलं तर, जेव्हा तिला एखाद्या ग्राहकाच्या घरी भेटायला जायचं असेल तर, घरी असूनही मुलीला संभाळायचं नाकारलं. संध्याकाळी तो आला आणि कुणाचा फोन आला, तर प्रत्येकवेळी, काय कटकट आहे, आवरतं घे पटकन, असं मागे भुणभुणत बसायचा. शिवाय पैसे बियसे मिळणार आहेत ना की असंच चाललंय सगळं, म्हणत डिवचायचा ते वेगळंच. कामाच्या गडबडीत काही घरचं राहीलं तर, तुझं दिड दमडीचं काम ठेव बाजूला पहिले घर बघ, असं अनेकदा ऐकवलेलं त्याने.सुरुवातीला कमी पैसे मिळायचे तिला, तेव्हा तर तुझे हे चार आणे कोणाच्या नाकाला पुरणार? करत सतत खिजवायचा. पण तरीही धीर न सोडता ती दटून राहिली, पहिली तीन वर्ष जेमतेम कमावणारी ती स्वकष्टाने, घरातून मानसिक आधार, प्रोत्साहन नसताना त्याच्याच तोडीचं कमवू लागली. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  पण मग मात्र तिने ठरवलं, मी पैसे कमावणार ते बचत म्हणून ठेवणार. माझ्या मुलीच्या गरजेसाठी वापरणार. उद्या माझ्यासारखं माझ्या मुलीला कुणाचही ऐकायला नको. मी पैसा तिच्या शिक्षणासाठी वापरणार. मी पैसा तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठेवणार. निखिलचा याच्यावर काही हक्क नाही. त्याने दोन शब्द जरी बोलून मला प्रोत्साहन दिलं असतं ना, तर अगदी अर्धा अर्धा घरखर्च हसत स्वीकारला असता मी. पण त्याच्या नजरेत तर सदैव हिला कसलं जमतंय, हेच होतं. कितीतरी लहान मोठ्या सर्व कंपन्यांशी, बँकांशी टायअप केलं मी, पण स्वतःच्या कंपनीत जेव्हा गरज होती, तेव्हा मला याने मुद्दाम विचारलं, कोणी चांगला प्रोफेशनल एजंट माहिती आहे का तुला? प्रत्येकवेळी फक्त उसकवण्याचं काम केलं, आणि आता आता कुठल्या तोंडाने पैसे मागतोय तो?एक छदाम देणार नाही मी, माझे प्रॉब्लेम मी सोडवले, त्यानेही त्याचे सोडवावेत. संध्याकाळी निखिल घरी आला तोच तणतणत. प्रत्येक गोष्टीतून राग व्यक्त करू पाहत होता तो. नमिता मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. ते बघून त्याचा संयम सुटला, आणि मोठ्या आवाजात ओरडून तो म्हणाला, घरात येणारे पैसे दोघांचे असतात नमिता. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); अन् त्यावर नमिता, त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून म्हणाली, बरोबर. पण पुरुष काम करतो तेव्हा बाई त्याच्या पाठीशी असते. भावनिक आधार कायम देत असते ती. कितीही कमी पैसे कमवून आणा, ती कधीच हिणवत नाही नवऱ्याला. ती त्या कमावणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या कमावलेल्या पैशाचा मान ठेवते. त्याला सगळं हवं नको ते बघते, तो कसा प्रसन्न,आनंदी राहील ते बघते.आणि तुम्ही काय करता? बाकीचे जाऊ दे तू सांग, तुझा किती सपोर्ट होता मला? तुझ्या तर गिनतीतीच नव्हते मी. इतक्या वर्षात पैशांचे कुठले व्यवहार मला सांगून केलेस कधी तू? मग आता का पैसे दिसतात तुला माझे? चार आण्याचे लाख झाल्यावर तुझे डोळे बरोब्बर फिरले, नाही का?नमिताने निखिलला शब्दात पकडलं होतं, त्याच्याकडे त्यावर काही उत्तर नव्हतं. वाद घालू शकता होता तो, पण त्याला इच्छा नव्हती. नमिता आता काहीही झालं तरी ऐकणार नाही हे तो समजून चुकला, आणि त्याने पैशाच्या जमवाजमवीसाठी इतर ठिकाणी फोन करायला सुरुवात केली........©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!