वलयांकित विकास सबनीस

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

विकास सबनीस गेल्याची बातमी आल्याने मला धक्का बसला! निवृत्त झाल्यानंतर त्यांचा माझा संबंध जवळ जवळ तुटलाच होता म्हणा ना!  लोकसत्तासारख्या मोठ्या पेपरमध्ये पोलिटिकल कार्टूनिस्ट नव्हता हे आम्हाला खटकत होते. तो काळ लक्ष्मणचा काळ होता ह्या पार्श्वभूमीवर लोकसत्तेतील राजकीय व्यंगचित्राची उणीव भरून काढणे मुळीच सोपे नव्हते. पण पॉकेट कार्टूनच्या बाबतीत मात्र लोकसत्तेची श्रीमंती होती. लोकसत्तेत फार पूर्वी मनोहर सप्रे ह्यांची पॉकेट कार्टून्स येत होती. ते लोकसत्तेच्या कार्यालयात मात्र फारसे येत नसत. त्यांची कार्टून्स बंद झाल्यानंतर पॉकेट कार्टूनिस्ट विकास सबनीसचा लोकसत्तेला शोध लागला. संपादक स्वतः बाहेर आले आणि त्यांनी विकास सबनिसांचा मला परिचय करून दिला. जे चीफसब ड्युटीवर असतील त्यांच्याकडे तुम्ही कार्टून देत जा, असे सांगून संपादक निघून गेले. विकास सबनीस खुर्ची ओढून माझ्या पुढ्यात बसले.‘आजचं कार्टून तर संपादकांनी सिलेक्ट केलंच आहे. व्यंगचित्रांचं तुम्ही सिलेक्शन करणार असाल तर मी उ विकास सबनिसांबरोबर त्यांच्यातल्या विनयशील स्वभावाचाही मला परिचय झाला! द्यापासून दोनतीन कार्टून आणत जाईन,’ विकास ‘ सिलेक्शन वगैरेची काही जरूर नाही. तुम्ही जे कार्टून आणून द्याल ते आम्ही छापू.’ मीकार्टूनिस्टलाही स्वातंत्र्य असतं अशी माझी भूमिका होती. आठवडाभर रोज मला अकरासाडेअकराच्या सुमारास कार्टून देण्याच्या निमित्ताने सबनीस मला भेटत असत. रात्रपाळीत मात्र त्यांची माझी भेट होण्याचा प्रश्नच नव्हता. ते माझ्या सहका-यांपैकी कुणा कुणाला भेटत. कार्टून सुपूर्द करून निघून जात. का कुणास ठाऊक, माझ्याकडून मात्र, ते हक्काने चहा आणि दाद वसूल करून मगच उठायचे. चहा येईपर्यंत ‘कार्टून कसं आहे? ‘ ‘आवडलं का?’ हळुच प्रश्न विचारायचे! खरं तर कामाच्या धबडग्यात कार्टून बघायला कुठल्याही चीफसबला वेळ मिळत नसे. ब्लॉक तयार झाल्यावर त्याचे प्रऊफ येईल त्यावेळीच त्यांचे कार्टून पाहात असे. दुसरे म्हणजे मी स्वतः लक्ष्मणचा फॅन होते.पोलिटिकल कार्टूनच्या बाबातीत तर बाळासाहेब आणि लक्ष्मण ह्यांची बरोबरी करणारा व्यंगचित्रकार कुणी नव्हता. लक्ष्मण तर पॉकेट कार्टूनमध्येही सिक्सर मारायचे. मराठात लोकमान्य नावाचे तमिळभाषिक कार्टूनिस्ट होते. लोकमान्य हे त्यांचे टोपण आहे असा समज होता. पण एकदा गप्पांच्या ओघात लोकमान्य मला म्हणाले, माझा जन्म १९२० साली टिळकांचे निधन झाले त्या दिवशीचा. म्हणून वडिलांनी माझे नाव ‘लोकमान्य’ ठेवले! सबनिसांना मी ही किस्सा सांगितला तेव्हा ते खळाळून हसले. त्यांना जरा आश्चर्यही वाटले. उठताना सबनीस एवढंच म्हणाले, बघतो माझंही नाव बदलता येतं का!‘नाही नाही! तुम्ही मुळीच नाव बदलू नका. विकास सबनीस चांगलं नाव आहे’, थोडं थांबून मी म्हटलं, शेवटी नावाला असं स्वतःचं वलय नसतं. तुम्ही नावाला वलय प्राप्त करून देतां’पोलिटिकल कार्टूनिस्ट म्हणून नाव मिळवावं अशी सबनिसांची मनातली इच्छा होता. ती तर पुरी झालीच. त्यांच्या नावाला वलयही प्राप्त झालं. पुढील काळात थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याशीही त्यांचा संबंध आला. व्यंगचित्रकारांसाठी त्यांनी अनेक शिबीरंही आयोजित केली. ह्यापुढील काळात वलयांकित विकास सबनीस ह्यांची चित्रे दिसणार नाहीत. त्यांच्या नावाची माझ्या मनातली आठवण मात्र कधीच पुसली जाणार नाही.रमेश झवरज्येष्ठ पत्रकार
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!