लोकशाही आणि स्वातंत्र्य

By ramataram on from https://vechitchaalalo.blogspot.com

(’सुंदर मी होणार’ - पु. ल. देशपांडे)महाराज: कोणी कुणाच्या यातना कमी करु शकत नाही. कुठे होतो आम्ही आणि काय करून ठेवलंय आमचं- लोकशाही म्हणे!दिदी: लोकशाहीचा काय संबंध आहे तुमच्या यातनांशी पपा-महाराज: सांगितलं ना तुला दिदी, अनेक गोष्टींचा आहे. परवांचीच गोष्ट घे. आपल्या नंदनवाडीतून असेंब्लीत कोण निवडून आलाय ठाऊक आहे तुला? बंडा सावंत! -हा नंदनवाडीचा प्रतिनिधी! हा बंडा सावंत!दिदी: बंडा! -बंडा म्हणजे आपल्याकडे शिदबा सावंत होता त्याचा मुलगा?महाराज: त्याचा मुलगा! शिदबा मोतद्दाराचा मुलगा- हा नंदनवाडीचा प्रतिनिधी!दिदी: हुशार होता लहानपणापासून-महाराज: म्हणून हा राज्यकर्ता? -नंदनवाडीचा प्रतिनिधी! काय वाईट केलं होतं आम्ही नंदनवाडीचं? मुलांना फुकट शिक्षण होतं, अन्नछत्रं होती, पाठशाळा होत्या, शिल्पशाळा होत्या- आमच्या आश्रयावर शिकून नंदनवाडीच्या मुलांनी चार ठिकाणी नाव मिळवलं होतं. गावात तालमी होत्या, आखाडे होते, --काय नव्हतं?दिदी: स्वातंत्र्य नव्हतं पपा-महाराज: स्वातंत्र्य? कशासाठी हवं असतं स्वातंत्र्य? सगळ्या सुखसोयी मिळाव्यात म्हणूनच ना?दिदी: म्हणून नाही पपा- स्वातंत्र्य--- केवळ स्वातंत्र्यासाठी हवं असतं.महाराज: उगाच कवींच्या भाषेत बोलू नकोस.दिदी: पण पपा, लोकांना जे हवं ते मिळालं. त्यांना राज्य करावंसं वाटतं ना, करू द्यावं त्यांना ते!महाराज: आणि खड्ड्यात पडू द्यावं- काय चाललंय हे? लोकशाहीच आहे ना जगभर आता? मग कशाला ही युद्धं आणि लढाया? कशाला इतके पक्ष, उपपक्ष, निवडणुका, मारामार्‍या, दंगेधोपे?दिदी: असा महापूर येतो पपा नेहमीच. गंगेला पूर येतो ना, तसा लोकगंगेलाही येतो- त्यात ताठर युद्धखोर उन्मळून जातील. आणि गरीब, दीन लव्हाळ्यासारखे वाटणारे शांतताप्रिय लोक हळूहळू वर येतील- आणि तांडवानंतर शांतर झालेल्या प्रलयंकर शिवशंकराला म्हणतील, ’शंभुनाथ, आता तुमचं शांत नटेश्वराचं स्वरूप दाखवा. मग मूर्तिकार मूर्ती घडवतील, गायक गातील, कवी काव्य लिहितील-महाराज: काव्य! हं! फावल्या वेळात करमणूक म्हणून ठीक आहेत ह्या कविता!दिदी: पपा- (सात्विक त्वेषाने) कुणी सांगितलं तुम्हाला हे? कविता ही फावल्या वेळांतली करमणूक? जी दृष्टी आल्यामुळे पांगळ्याला देखील विराट विश्वाचं दर्शन बसल्याजागी होतं, ती कविता म्हणजे फावल्या वेळातील करमणूक?महाराज: डोंट गेट एक्सायटेड माय् चाईल्ड! --पण ज्या रस्त्यातून आम्ही आणि आमचे पूर्वज हत्तीवरून मिरवीत गेलो, तिथून बंडा सावंताची- एका मोतद्दाराच्या मुलाची मिरवणूक जावी?दिदी: महान भाग्याचा आहे बंडा! हत्तीच्या मिरवणुकी भाडोत्री सरंजाम मिरवीत जायचे पपा... बंडाला लोक डोक्यावर घेऊन नाचले असतील. सुवासिनींनी त्याला ओवाळलं असेल. शाहिरांनी त्याचे पोवाडे गायले असतील. त्याच्या आईनं- शिदबा मोतद्दाराच्या सावित्रीनं बंडाला मीठ-मोहर्‍या ओवाळल्या असतील. योगेश्वराच्या पुजार्‍यानं नारळ देऊन आशीर्वाद दिला असेल...महाराज: तुला कुणी सांगितलं हे दिदी? अगदी शब्दन् शब्द खरा आहे यातला.दिदी: मला दिसलं सगळं-महाराज: तू कधी गेली होतीस वाड्याबाहेर?दिदी: वाड्याबाहेर कशाला जायला हवं? स्वतंत्र नंदनवाडीचा पहिला प्रतिनिधी, त्याचं कौतुक होणार नाही तर काय गावाबाहेर महारोग्यासारखं राहिलेल्या महाराजांचं आणि राजपुत्र-राजकन्यांचं?-oOo-पुस्तक: 'सुंदर मी होणार'लेखक: पु. ल. देशपांडेप्रकाशक: श्रीविद्या प्रकाशनआवृत्ती आठवी (१९९५)पृ. २२ ते २४
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!